जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • कैरो- इजिप्तमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय कलर रन मॅरेथॉन स्पर्धा झाली. इतर स्पर्धांपेक्षाही आगळीवेगळी मॅरेथॉन होती. कारण या स्पर्धेत धावणाऱ्या स्पर्धकांवर चमकते रंग फेकण्यात आले. जगभरातून आलेल्या ४ हजार धावपटूंनी यात सहभाग घेतला होता. जगभरातील लोकांना एकत्र आणणे, त्यांना आनंदी व सुदृढ करणे हाच या स्पर्धेमागचा उद्देश होता. स्पर्धकांनी सांगितले, २०११ मध्ये प्रथमच याचे आयोजन करण्यात आले होते. चार विभागांत स्पर्धा विभागली जाते. त्यानुसार प्रत्येक विभागात धावपटूंवर फेकण्यात येणारे रंग...
  April 17, 10:45 AM
 • वॉशिंग्टन- नासाच्या ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज स्पर्धेत भारताच्या तीन संघांनी पुरस्कार जिंकले आहेत. यात गाझियाबादच्या काइट ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनने एआयएए नील आर्मस्ट्राँग बेस्ट डिझाइन अवॉर्ड जिंकला, तर मुंबईच्या मुकेश पटेल स्कूलने फ्रँक जो सेक्सटन मेमोरियल पिट क्रू अवाॅर्ड प्राप्त केला आहे. तसेच पंजाबच्या फगवाडा जिल्ह्यातील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने स्टेम एंगेजमेंट अवॉर्ड जिंकला. दरम्यान, नासाची अंतराळ प्रवासी सुनीता विल्यम्सने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना...
  April 17, 10:45 AM
 • पॅरिस- सोमवारी नॉट्रे डाम कॅथेड्रलमध्ये अग्नितांडव सुरू होते. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू होते. तेव्हा आपल्या प्राणाची पर्वा न करता फादर जीन मार्क फोर्नियर यांनी भगवान येशूचा (क्राऊन ऑफ थ्रोन्स) काटेरी मुकुट सुखरूप बाहेर आणला. हा मुकुट जगातील सर्वात अनमोल मानला जातो. फादर फोर्नियर मुकुटासोबत शुद्धीकरणाची सामग्रीदेखील वाचवू शकले. त्या वेळी त्यांना अग्निज्वाळांनी लपेटले होते. कॅथेड्रलमधील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी ते मुळीच घाबरले नाही. यापूर्वी फादर...
  April 17, 09:52 AM
 • हे छायाचित्र पाहून एखाद्या भक्कम गड-किल्ल्याची ही तटबंदी असावी, असे वाटते. पण या इमारती नसून उंच उंच चुनखडक आहेत. जर्मनीतील बस्तेई येथील हे खडक जमिनीपासून साधारण १९४ मीटर उंच आहेत. १० लाख वर्षांपूर्वी पाण्याच्या क्षरण प्रक्रियेमुळे खडकांना हे रूप प्राप्त झाले. या खडकांखाली इल्बे नदी वाहते. साधारण २०० वर्षांपासून हे खडक पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत. १८२४ मध्ये लाकडी पुलाद्वारे असे अनेक खडक परस्परांना जोडले गेले. १८५१ मध्ये लाकडी पुलाच्या जागी चुनखडीचा पूल बांधण्यात आला, १६८ वर्षांनंतर...
  April 17, 09:34 AM
 • अमेरिका- २००५ ची घटना आहे. अमेरिकी लष्करात परिचारिका म्हणून इराकमध्ये काम करत होते. जखमी अमेरिकी जवानांवर उपचार करणे हे माझे काम होते. मी अनेक अमेरिकी जवानांना अपंगत्व आल्याचे व मृत्युमुखी पडताना पाहिले. एक दिवस ताफ्यासोबत छावणीत येत होते. अचानक रस्त्याच्या बाजूला स्फोट झाला. सर्व रक्ताने माखले होते, एकाचा मृत्यू झाला. मी ताफ्यात नव्हते. असले असते तर त्याला वाचवले असते. त्या जवानाच्या अंत्यविधीवेळी खूप वेदना झाल्या. त्या दिवशी एका नव्या सत्याला मी सामोरे गेले. अहिंसेचे महत्त्व समजले....
  April 17, 08:13 AM
 • नवी दिल्ली- भारताने स्वदेशी सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र निर्भय ची सोमवारी ओडिशाच्या चांदीपुरात यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे भारताचे संरक्षण क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत होणार आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) बनवले आहे. आतापर्यंत या क्षेपणास्त्राची सहा वेळा चाचणी झाली; परंतु केवळ एकदाच त्यात पूर्णपणे यश आले. डीआरडीओच्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र देशातच बनवले गेले आहे. या वेळेची चाचणी त्याचे बूस्ट व क्रूझ फेजच्या कमी उंचीवर दिशा...
  April 16, 11:40 AM
 • वॉशिंग्टन- दक्षिण अमेरिकेत शक्तिशाली वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. टेक्सास व डलासमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला, तर ८० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. उ.कॅरोलिना, मिशिगन, मिसिसिपी व मेरीलॅंडमधील १.७० लाख घरांची वीज गुल असून, २५०० हून अधिक उड्डाणे रद्द केलीत. हवामान विभागानुसार या वादळामुळे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व अटलांटातील ९ कोटी लोकांना फटका बसू शकतो. शिकागो, ह्यूस्टन, टेक्सास, पिट्सबर्ग व ओहियोसह डझनभर मुख्य विमानतळांनी उड्डाणे संचालन बंद केली आहेत. मिसिसिपी प्रशासनाच्या माहितीनुसार...
  April 16, 11:34 AM
 • लव्हलँड - अमेरिकेतील लव्हलँडमध्ये राहणाऱ्या ९२ वर्षीय रॉन रिडी यांचा दावा आहे की, ते दर २ महिन्यांनी रक्तदान करतात. गेल्या ६० वर्षांत ४०० वेळा रक्त देऊन १२०० लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. १८९ लिटर रक्तदान करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. लव्हलँड पोलिस व रक्तदान केंद्राकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकांना नेहमी मदत करणारे रॉन सांगतात, रक्तदान करण्यास १९६० पासून सुरुवात केली. सॅन दियागो येथील एका मित्रास पहिल्यांदा रक्तदान केले. तेव्हापासून आतापर्यंत हे कार्य सुरूच...
  April 16, 11:14 AM
 • लॉस एंजलिस -जगातील सर्वात मोठे विमान स्ट्रॅटोलाँचने शनिवारी कॅलिफोर्नियात पहिल्यांदाच यशस्वी उड्डाण केले. त्याची चाचणी सुमारे अडीच तास वाळवंटावरील आकाशात झाली. ताशी ३०२ किमी वेगाने हे विमान १७५०० फूट उंच उड्डाण करू शकत होते. आता विमानातून उपग्रह सोडले जातील, खर्चात घट हे विमान उपग्रहाला अंतराळात त्याच्या कक्षेत सोडण्यासाठी मदत करू शकेल. सध्या टेकऑफ राॅकेटच्या मदतीने उपग्रहांंचे प्रक्षेपण केले जाते. या यशानंतर उपग्रहांना कक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विमान आता अत्यंत चांगला...
  April 15, 12:07 PM
 • म्युनिच - भारतात सक्रिय राजकारणात राहण्याच्या वयावरून वादंग सुरू आहे. तेथे पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना सक्तीची निवृत्ती घेणे भाग पडत आहे. जर्मनीत नेमके उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथील लिसल हेज या क्रीडा शिक्षिकेचे वय १०० वर्षे असून त्यांनी आपल्या आयुष्याचा दुसरा डाव राजकारण प्रवेशातून सुरू केला आहे. त्या किरचॅम्बोलेंडेन शहर परिषदेसाठी निवडणूक लढवत आहेत. युवांना सर्व सुविधा देता याव्यात यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी आयुष्यभर यासाठी संघर्ष उभारला होता. भारतात...
  April 15, 09:32 AM
 • वॉशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांवर अजब तोडगा शोधून काढला. ट्विट करून शनिवारी त्याबद्दल माहिती दिली. यापुढे अशा लोकांची विरोधी पक्षाचे नेते राहत असलेल्या शहरांत रवानगी करणेच याेग्य ठरेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अशा शहरांना सँक्चुरी सिटी असे संबोधले जाते. उत्तर अमेरिका, पश्चिम युरोपीय देशांत अशी काही शहरे आहेत. तेथील प्रशासन केंद्र सरकारच्या स्थलांतरित धोरणांना मुळीच जुमानत नाही. ट्रम्प यांनी ट्विट करून या मुद्द्यावर कडक धोरणाचे...
  April 14, 11:23 AM
 • नॅपिता । म्यानमारचा पारंपरिक थिंगयान हा जल महोत्सव शनिवारपासून सुरू झाला. हा उत्सव १६ एप्रिलपर्यंत देशभरात साजरा केला जातो. १७ एप्रिलपासून येथे नूतन वर्ष (बौद्ध नववर्ष) प्रारंभ होते. वॉकिंग थिनयांग इव्हेंटमध्ये लोक शहरभरात भटकंती करतात आणि रस्त्याच्या कडेला मंडपातून लोक त्यांच्यावर पाण्याचे शिंपण करतात. यंदा उत्सवादरम्यान सुमारे ११ कोटी लिटर पाणी वापरले जाणार आहे. म्यानमारमध्ये १२ उत्सवांपैकी थिंगयानला जास्त मोठे मानले जाते. यात देशोदेशीचे पर्यटकही सहभागी होतात. ८ हजार सुरक्षा...
  April 14, 10:55 AM
 • काबूल -अफगाणिस्तानात १९९६ मध्ये तालिबान्यांनी सत्ता हिसकावून अफगाणी महिलांविराेधात युद्ध छेडून मुलींच्या शिक्षणावर बंदी लादली. तसेच महिलांचे विश्व घरापर्यंतच सीमित केले व त्यांचे काम करण्याचे अधिकार काढून घेतले. त्यांना अमानवी यातना देऊन अनेक महिलांचे प्राणही घेतले. लाखो अफगाणी नागरिकांसाठी या साऱ्या जिवंत अाठवणी असून, हा पुन्हा चिंतेचा विषयही बनला अाहे. कारण अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी तालिबान्यांशी समझाेता हाेण्यावर चर्चा करत अाहेत. मात्र, यामुळे तालिबानी अफगाणच्या सत्तेत...
  April 14, 10:46 AM
 • नवी दिल्ली -फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणात शनिवारी आणखी एक वाद समोर आला. राफेल करारानंतर भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांचा १०४४ कोटी रुपयांचा कर फ्रान्स सरकारने माफ केल्याचा दावा ली माँडे या वृत्तपत्राने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून २०१५ मध्ये ३६ राफेल विमाने खरेदीच्या घोषणेनंतर काही महिन्यांनी ही करसवलत मिळाली आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स अटलांटिक फ्लॅग फ्रान्स ही दूरसंचार कंपनी फ्रान्समध्ये सूचीबद्ध आहे. या कंपनीचा ११०० कोटी रुपये कर थकीत...
  April 14, 09:33 AM
 • वॉशिंग्टन -अमेरिकेने भारताच्या उपग्रहभेदी मोहिम अर्थात मिशन शक्तीचे समर्थन केले आहे. या प्रकरणात अमेरिकेच्या संसदेच्या सशस्त्र सेवा समितीची बैठक झाली. त्यात कूटनीतिची धूरा सांभाळणारे जनरल जॉन इ हितेन म्हणाले, अंतराळाद्वारे समोर येऊ पाहत असलेल्या भविष्यातील धोक्यामुळे चिंतीत आहे. ते पाहता अंतराळात उपग्रह पाडण्याचे भारताचे पाऊल योग्य ठरवावे लागेल. ही काळाची गरज आहे. भारताकडे अंतराळात आपला बचाव करण्याची क्षमता असली पाहिजे. लोकप्रतिनिधी टीम काईन यांनी हा मुद्दा उपस्थित केला....
  April 13, 12:07 PM
 • डीन अॅम्ब्रोज, व्यावसायिक मुष्टियोद्धा जन्म- ७ डिसेंबर १९८५ (सिनसिनाटी, यूएसए) शिक्षण- स्कूल ड्रॉपआउट पत्नी- रेनी यंग (डब्ल्यूडब्ल्यूई समालोचक) शरीराचे मोजमाप - उंची ६ फूट ४ इंच, वजन - १०२ किलो चर्चेत का- वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंटमधून (डब्ल्यूडब्ल्यूई) निवृत्तीची घोषणा केली... डीन अॅम्ब्रोज (जोनाथन डेव्हीड गुड) सिनसिनाटीच्या ज्या परिसरात राहायचे तेथे, अंमली पदार्थांचा व्यवसाय खुलेआम चालायचा. वडील पोलिस. आईही कामाच्या निमित्ताने घराबाहेरच असायची. अशावेळी डीन घरी एकटा पडायचा. त्यामुळे...
  April 13, 11:30 AM
 • मॉस्को- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील आणखी एका पुरस्काराने गौरवले जाणार आहे. रशियाने पंतप्रधान मोदींना आपला सेंट अँड्रयू अवॉर्ड सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे जाहीर केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही या प्रस्तावावर सही केली आहे. नुकतेच संयुक्त अरब अमिरातीनेही(यूएई) मोदींना जायद पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. रशियन दुतावासाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. 12 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा...
  April 12, 07:33 PM
 • वॉशिंग्टन -तुम्ही नाेकरी साेडण्याचा विचार करत असाल तर याबाबतची भविष्यवाणी आता एका साॅफ्टवेअरच्या माध्यमातून हाेणार आहे. जगप्रसिद्ध आयबीएम कंपनीने हे साॅफ्टवेअर तयार केले असून, ते कंपनीला कर्मचाऱ्यांबाबत सर्व माहिती देणार आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्सने परिपूर्ण असलेले हे साॅफ्टवेअर ९५ % अचूक निर्णय देत असल्याचा दावाही आयबीएमने केला आहे. कंपनी सध्या या तंत्रज्ञानाचा वापर कर्मचाऱ्यांनी नाेकरी साेडून इतरत्र जाऊ नये यासाठी करत आहे. न्यूयॉर्कमधील ह्यूमन रिसोर्स परिषदेत आयबीएमच्या...
  April 12, 11:34 AM
 • स्टॉकहोम -स्वीडनमध्ये एका महिलेने प्रत्यारोपित गर्भाशयाच्या मदतीने मुलास जन्म दिला आहे. या गर्भाशय प्रत्याराेपण प्रक्रियेत एका राेबाेटचे साह्य घेण्यात आले हाेते. त्यामुळे या तंत्रज्ञानाने मुलास जन्म देणाऱ्या पहिल्या मातेचा गाैरव तिला प्राप्त झाला आहे. सहलग्रेन्स्का युनिव्हर्सिटी-हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संबंधित महिलेचे नाव सांगितलेले नाही. याबाबत माहिती देताना डाॅक्टरांनी सांगितले की, यासाठीची प्रत्यारोपण प्रक्रिया २०१७ मध्येच पूर्ण करण्यात आले हाेते. त्या वेळी एका ब्रेन...
  April 12, 11:25 AM
 • इस्लामाबाद -पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात दोन हिंदू मुलींचे धर्मांतर व मुस्लिम पुरुषांशी बळजबरी विवाह झाल्याच्या प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी दोन्ही बहिणींना आपल्या पतींसोबत राहण्याची परवानगी दिली. डॉनच्या वृत्तानुसार या प्रकरणातील तपास आयोगाने अहवाल सादर केला. दोन्ही बहिणींचा बळजबरीने निकाह झाला नसल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. त्याचबरोबर धर्मांतरदेखील बळजबरीने झालेले नाही. या दोघींचा वैद्यकीय अहवाल आला असून त्यात दोघीही सज्ञान...
  April 12, 10:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात