Home >> International >> Other Country

Other Country News

 • शिकागो- पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला सहकार्य केल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेला तहव्वुर राणा याने आपल्याविरुद्धच्या खटल्याची नव्याने सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी शिकागोमधील विशेष न्यायालयाकडे केली आहे. या खटल्यातील सुनावणीत अनेक त्रुटी होत्या, असा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला आहे. या खटल्यात पोलिसांनी शपथेवर दिलेली जबानी साफ खोटी आहे. राणाविरुद्ध सादर करण्यात आलेले पुरावे खरे नाहीत. त्यामुळे या खोट्या पुराव्यांच्या आधारे न्यायदान करणे इष्ट होणार...
  July 27, 02:11 AM
 • सेऊल- पायाभूत क्षेत्रात दक्षिण कोरियासह इतर परदेशी गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो, असे भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे. आगामी काही वर्षांत एक खर्व अमेरिकन डॉलर्स एवढी गुंतवणूक केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपलब्ध निधीतून देशातील रस्ते, बंदरे, रेल्वे सेवेसह इतर पायाभूत गोष्टींच्या विकासकामावर भर दिला जाणार आहे. भारताने पायाभूत सुविधेवर लक्ष केंद्रित केले आहे. या क्षेत्राच्या विकासाठी भरीव अशा परदेशी गुंतवणुकीची देशाला गरज आहे. त्यामुळे दक्षिण...
  July 27, 02:04 AM
 • न्यूयॉर्क- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) माजी अध्यक्ष डोमेनिक स्ट्रॉस यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाया महिलेने पहिल्यांदाच तोंड उघडले असून कानला तुरुंगात पाठवण्याचा तिने निश्चय केला आहे.न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये काम करणाया पीडित नफिसातू डिएलोने न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मांडली. गिनीची नागरिक असलेल्या ३४ वर्षीय नफिसातूने १४ मे रोजीच्या काळ्या दिवसाची आठवण सांगितली. विशेष म्हणजे नफिसातूच्या हत्येबद्दल संशय घेतला जात असतानाच ही मुलाखत प्रसिद्ध...
  July 27, 02:00 AM
 • अफ्रिकेतील माऊंट निरागोंगो येथील ज्वालामुखीच्या अगदी जवळ पोहोचलेल्या वैज्ञानिकाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या खळबळ माजवत आहे. नेपल्स विद्यापीठाचे वैज्ञानिक डारिओ टेडेस्को हे काही दिवसांपूर्वी माऊंट निरागोंगो येथे ज्वालामुखीचा अभ्यास करण्यासाठी गेले होते.ज्वालामुखीचा अभ्यास करताना डॉ. डारिओ यांनी आपल्या जीवाची देखील पर्वा केली नव्हती. त्यांचे हे कर्तृत्व बघण्यातच जग गुंग झाले आहे.
  July 26, 06:09 PM
 • काठमांडू- १३ जुलैला मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी एका संशयिताला काठमांडू येथे अटक करण्यात आली आहे. मोहम्मद झहीर असे या आरोपीचे नाव आहे. भारत सीमेजवळील सरलाही जिल्ह्यातील तो रहिवासी आहे.गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनंतर नेपाळ पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ईकाईमधून अटक केली असे नेपाळी माध्यमांनी सांगितले आहे. नेपाळ पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील बालूवाटर परिसरात झहीर राहत होता. तेथूनच तो सूत्रे हालवत होता.झहीरला गेल्या आठवडयातच अटक करण्यात आली...
  July 26, 05:07 PM
 • जिनेव्हा- स्वीस बँकेत सर्वात जास्त भारतीयांचा काळा पैसा असल्याचे म्हटले जाते. पण तेथील बँक अधिका-यांच्या मते तिथे जमा असलेल्या विदेशी नागरिकांच्या पैशामध्ये भारतीयांचा फक्त ०.०७ टक्केच हिस्सा आहे. भारतीयांपेक्षा सर्वात जास्त पैसा हा पाकिस्तानाचा असल्याचेही या अधिका-याने सांगितले.स्वीस नॅशनल बँकेच्या मते भारतीय नागरिकांचे १,९४५ स्वीस अब्ज फ्रँक (११ हजार कोटी) रक्कम जमा आहे. तर पाकिस्तानचे १.९४७ स्वीस अब्ज फ्रँक इतकी रक्कम जमा आहे. ही रक्कम भारतीयांपेक्षा २० लाख स्वीस फ्रँक जास्त...
  July 26, 04:30 PM
 • शिकागो- दहशतवादाला खतपाणी देण्याच्या आरोपात दोषी ठरलेल्या तहव्वूर राणा याने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याची मागणी केली आहे. डेन्मार्क येथे दहशतवादी हल्ल्याचा कटात लष्कर ऐ तोयबाचा दहशतवादी डेव्हीड हेडली याला मदत करण्याच्या आरोपामध्ये राणाला दोषी ठरविण्यात आले होते. हा खटला शिकागो येथे सुरु आहे. राणाच्या वतीने त्याचे वकील पॅट्रीक ब्लेगन याने खटल्याचे न्यायाधीश हॅरी लिनेनवेबर यांना या खटल्याची पुन्हा सुनावणी करण्याची विनंती केली आहे. राणाला अटक करण्यासाठी ज्या आधारांवर वॉरंट...
  July 26, 12:15 PM
 • न्यूयॉर्क- मॅनहॅटन येथील नियाग्रामध्ये हजारो समलैंगिकांचा विवाह सोहळा पार पडला. गेल्या महिन्यातच समलैगिंक विवाहाला सरकारने मंजूरी दिली होती. राज्यातील पाच वेगवेगळया शहरांमध्ये दिवसभर हा विवाहसोहळा चालू होता. लग्नासाठी आलेल्या जोडप्यांमध्ये अनेक जोडपे हे गेल्या चार-पाच दशकांपासून एकत्रित राहणारे होते. या जोडप्यांबरोबर त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार ही उपस्थित होते.न्यूयॉर्क व्यतिरिक्त कनेक्टिकट, मॅसाच्युसेटस, वेरमॉन्ट, न्यू हॅम्पशायर, इयोवा आणि वाशिंग्टन येथे समलैंगिक...
  July 26, 11:42 AM
 • सेऊल- भारताने सोमवारी दक्षिण कोरियासोबत अणू सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. यामुळे भारतातील अणुऊर्जा प्रकल्पात सहभागी होण्याचा कोरियन कंपन्यांचा मार्ग खुला होणार आहे. सध्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या कोरियाच्या दौयावर असून त्यांच्याच उपस्थितीत या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले. तत्पूर्वी प्रतिभाताई व कोरियाचे ली म्यूंग बाक यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. भारतासोबत अणू सहकार्य करार करणारा दक्षिण कोरिया हा नववा देश ठरला आहे. अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, मंगोलिया,...
  July 26, 12:56 AM
 • यागाँग- सुटकेनंतर लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांनी प्रथमच नवीन सरकारच्या मंत्र्यांशी सोमवारी चर्चा केली. दोन्ही बाजूने सकारात्मक बोलणी सुरूच राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने कामगारमंत्री आंग की यांनी सहभाग घेतला होता. देशातील कायदा व सुव्यवस्था, तणाव निवळण्यासाठी उपाय करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली, असे मोघम उत्तर कामगारमंत्र्यांनी बैठकीनंतर दिले; परंतु त्यांनी बैठकीतील ठोस निर्णयाचा तपशील देणे टाळले. मला काही योग्य असे बदल हवे आहेत,...
  July 26, 12:47 AM
 • काबूल- अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता सैन्य माघारी नेण्याची अमेरिकेला फार घाई नसल्याचे नवीन राजदूत रॅन क्रॉकर यांनी स्पष्ट केले आहे. क्रॉकर यांनी अफगाणिस्तानातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून सोमवारी पदभार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. १९९० मध्ये अमेरिकेने दुर्लक्ष केल्यामुळेच अफगाणिस्तानात गृहयद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. याच काळात तालिबान, अल कायदा या दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानचा हिंसाचाराच्या कारवायांसाठी वापर केला. यात ११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या...
  July 26, 12:45 AM
 • न्यूयॉर्क - हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझ ही अमेरिकन आयडॉलच्या नवीन सीझनमध्येही दिसण्याची शक्यता आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या दुसया हंगामात ती पुन्हा परीक्षक म्हणून दिसेल. काही दिवसांपूर्वी लोेपेझने याविषयीची शक्यता फेटाळून लावली होती. अलीकडेच लोपेझ व तिचा पती मार्क अँथोनी यांच्यातील काडीमोडाची बातमी आली होती. आता ती अमेरिकन आयडॉलमुळे चर्चेत आली आहे. सीझन दोनमध्ये तिच्या सहभागाविषयीचा करार जवळजवळ पूर्ण झाला आहे. दरम्यान, मागील सीझनमध्ये लोपेझ ही सिमन कॉवेल, एलन डेग्नर्स,...
  July 26, 12:38 AM
 • दुबई- नावात काय आहे ? असे म्हटले जाते. मात्र, दुबईतील एका महाशयाचे आपल्या नावावरील प्रेम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसेल. संयुक्त अरब अमिरातीतील एका अब्जाधीशाने एका बेटावर तीन किलोमीटरपर्यंत आपले नाव तयार केले आहे. या व्यक्तीच्या नावातील पहिला शब्द हमाद आहे. यातील प्रत्येक अक्षर इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये अर्ध्या किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत तयार केले आणि याच पद्धतीने सहा अक्षरांच्या नावातील पहिला शब्द तीन किलोमीटरपेक्षाही अधिक अंतराचा झाला आहे. विशेष म्हणजे समुद्राच्या...
  July 26, 12:29 AM
 • सेऊल- दक्षिण कोरीयासोबत भारताने नागरी अणूकरार केला आहे. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या सध्या दक्षिण कोरीयाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दक्षिण कोरीयाचे राष्ट्राध्यक्ष ली म्युंग-बाक यांची भेट घेतली. त्यांच्या बैठकीनंतर अणुकरारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानंतर आता तिथल्या कंपन्यांना भारतातील अणुउर्जा प्रकल्पांमध्ये सहभागी होता येणार आहे. दक्षिण कोरीयामध्ये 20 अणुप्रकल्प चालविण्यात येत आहेत. दक्षिण कोरीयातील एकूण वीज निर्मितीच्या 35 टक्के वीज ही अणुउर्जा प्रकल्पातून...
  July 25, 05:34 PM
 • जिनेव्हा- स्वीस बँकेत असलेला भारतीयांचा काळा पैसा देशात परत आणण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे. त्यामुळे स्वीस बँकेत पैसा ठेवणा-या भारतीयांनी आपले पैसे काढून घेण्यास सुरूवात केली आहे. हा पैसा ते सिंगापूर, मॉरिशस आणि आखाती देशांमधील बँकेत ठेवत आहेत. असे असतानाही भारतीयांचे ११ हजार कोटी रूपये अजूनही स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये आहे.स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षात भारतीयांनी २२५० कोटी रूपये दुस-या देशांमध्ये ट्रान्सफर केले आहे....
  July 25, 04:10 PM
 • न्यूयॉर्क- हॉलीवूड अभिनेत्री लिंडा क्रिश्चियन हिचे वयाच्या 87 व्या वर्षी आजाराने निधन झाले. बॉण्ड मालिकेतील पहिल्या चित्रपटाची ती पहिली बॉण्ड गर्ल होती. 1944 साली अप इन आर्म्स मधून लिंडा हिने आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती.बार्बीच्या जनकाचे निधनलॉस एंजल्स -अनेक पिढय़ांमध्ये लहान मुलांना निभ्रेळ आनंद देणार्या बार्बी डॉलचा जनक इलिएट हॅंडलर यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आपले अवघे आयुष्य खेळणी तयार करणार्या मॅट्टेल या कंपनीलाच सर्मपित केले होते. लॉज एंजल्स टाइम्सने...
  July 25, 04:59 AM
 • न्यूयॉर्क- उष्णतेच्या लाटेने अमेरिकेला चांगलाच तडाखा दिला असून विविध भागांत यामुळे किमान २४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या पूर्व तसेच मध्य भागातही उष्णतेचे प्रमाण वाढले असून तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे आर्द्रतेमध्येही कमालीची वाढ झाली आहे. यंदा प्रथमच न्यूयॉर्क शहर प्रचंड उकाड्याला सामोरे जात आहे. एक डिग्रीने तापमानात वाढ झाल्यानंतर तो विक्रम ठरणार आहे. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांच्या इलेक्ट्रिक सेवेच्या वापराच्या सवयी...
  July 25, 01:43 AM
 • लंडन, मुंबई - पाच ग्रॅमी पुरस्कार विजेती ब्रिटनची जगप्रसिद्ध गायिका अॅमी वाइनहाऊसचे अतिमद्यपान व अमली पदार्थाच्या सेवनाने निधन झाले. केवळ २७ वर्षीय अॅमिलाच्या पायाशी अल्पावधीत यश, पैसा, प्रसिद्धीने लोळण घेतले होते, परंतु तिची कारकीर्द अल्पायुषी शोकांतिका ठरली असून तिच्या निधनाने संगीत क्षेत्राची हानी झाली आहे. दरम्यान, तिच्या निधनाने पाश्चात्त्य तसेच बॉलीवूडमधील कलावंतही शोकाकुल झाले आहेत. अॅमीचे तिच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये शनिवारी निधन झाले. मद्य तसेच अमली पदार्थाचे प्रमाण...
  July 25, 01:41 AM
 • ओस्लो- हल्ला क्रूर असेल परंतु गरजेचा होता, अशा शब्दांत नॉर्वेत हल्ला करणाया माथेफिरूने आपल्या भयंकर कृत्याची कबुली दिली आहे. इस्लामचा कट्टर विरोधक असलेल्या या हल्लेखोराने दोन वर्षांपूर्वीच हल्ल्याची योजना बनवली होती. शुक्रवारी त्याने पंतप्रधान कार्यालयाच्या इमारतीत स्फोट व युवक शिबिरावर केलेल्या बेछूट गोळीबारात तब्बल ९२ निरपराध नागरिक ठार झाले. हल्लेखोराचे नाव आंद्रेस बेहरिंग ब्रेव्हिक असून या हल्ल्याचे षड्यंत्र आधीच रचण्यात आले होते, असेही त्याने सांगितले आहे. हल्ल्याची कृती...
  July 25, 01:23 AM
 • ओस्लो- नॉर्वेची राजधानी ओस्लो शहरात झालेल्या बॉम्बस्फोट आणि उटोआ बेटावर झालेल्या बेछूट गोळीबार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अँडर्स बेहरिंग ब्रीवीक (वय ३२) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताच्या वकीलाने नॉर्वे येथील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. या दुर्घटनेत ९२ जण ठार झाले होते.बेहरिंग ब्रीवीकला उटोआ बेटावरील लेबर पक्षाच्या युवक शिबिरात केलेल्या गोळीबारासाठी आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाशेजारी झालेल्या कार...
  July 24, 01:53 PM
 
जाहिरात

RECOMMENDED