Home >> International >> Other Country

Other Country News

 • मनिला: 1.9 फूट उंचीचा जुनरे बलाविंग याने काल 18 व्या वर्षात पदार्पण केले आणि जागतिक विक्रमाचा तो धनी ठरला. जगातील सर्वात बुटका माणूस म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या जुनरेच्या या विक्रमाबाबत त्याच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. वयाच्या दुसर्या वर्षीपासून जुनरेची वाढ थांबली. तो फक्त वयानेच वाढला. शारीरिक उंची मात्र 59.93 सेंमी म्हणजे 1.9 फूट राहिली. तो 18 वर्षांचा नसल्याने त्याची गिनीज बुकात नोंद होऊ शकली नव्हती. गेल्या ऑक्टोबर महिन्यात नेपाळचा खगेंद्र थापा...
  June 13, 03:02 AM
 • वॉशिंग्टन: माझा माझ्या सरकारवर काडीचा विश्वास नाही. मी प्रखर राष्ट्रभक्त अमेरिकी नागरिक आहे. म्हणूनच लादेन मेला की नाही हे माझ्या डोळय़ाने मला पाहायचे आहे अशा शब्दात एक अमेरिकी नागरिक अरबी समुद्रात डुबकी घेऊन ओसामा बिन लादेनचा मृतदेह शोधणार आहे. समुद्र तळाशी गेलेल्या जहाजांचा शोध घेण्याचे काम करणारे बिल वॉरेन यांनी हा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी आपली टीमही तयार केली आहे. लवकरच ही मोहिम सुरु होणार आहे. पाकिस्तानात अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनचा अमेरिकी जवानांनी खातमा केल्यानंतर...
  June 13, 02:56 AM
 • बीजिंग: ग्वांगझू परिसरात स्थानिक रहिवासी आणि पोलिसांत झालेल्या हिंसक चकमकींनंतर 25 जणांना अटक करण्यात आली आहे.हय़बेई प्रांतात लिशुआन येथे एका नागरिकाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी सरकारी कार्यालयांवर हल्लाबोल करुन वाहनांना आगी लावल्या. त्यानंतर पोलिसांच्या वाहनांनाही पेटवण्यात आले. यामुळे तातडीने अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली. या सुरक्षा दलांनी प्रतिहल्ला चढवत जमावाला काबूत आणण्याचा प्रयत्न केला. नंतर 25 जणांना अटक करण्यात आली. चीनमध्ये भ्रष्टाचार आणि...
  June 13, 02:52 AM
 • बैरुत: वायव्य सिरियातील बंडखोरांवर सिरियाच्या फौजांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सिरियन सैन्य आणि रणगाड्यांनी बंडखोरांच्या प्रमुख केंद्रावर हल्ला करून बंड चिरडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरियन लष्कराच्या दोन तुकड्यांनी दक्षिण आणि पूर्व बाजूंनी एकाच वेळी हल्ला चढवला.चिलखती गाड्या आणि रणगाड्यांच्या मदतीने या तुकड्या चाल करुन आल्या. तुर्कस्तानच्या सीमावर्ती भागात अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात बंड पुकारणायांचे केंद्रस्थान आहे. हे बंडखोर...
  June 13, 02:49 AM
 • कॅनबेरा: चिलीमधील ज्वालामुखीच्या राखेने पार आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विमानसेवांना मोठा फटका दिला आहे. आॅस्ट्रेलियन विमान कंपन्यांनी मेलबर्न, टास्मानिया आणि न्यूझीलंडमधील विमानसेवा काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण अमेरिकेतील चिलीमधील पुहू ज्वालामुखीमुळे आकाशात राख पसरत चालली आहे. या राखेचे ढग वातावरणात 50 हजार फुटांवर गेले असून, ही राख आता आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत पोहोचली आहे. क्वांटास कंपनीने 14 उड्डाणे रद्द केल्याने 8 हजार प्रवासी अडचणीत आले, तर...
  June 13, 02:46 AM
 • सिंगापूर: नजीकच्या काळात ४०,००० लोकांनी चोरीच्या पासपोर्टवर सुखरूप प्रवास केला असल्याचे इंटरपोलने जाहीर केल्यामुळे जगभरतील हवाई उड्डाणाच्या एकूणच सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दहशतवादी आणि खतरनाक गुन्हेगार चोरलेल्या, हरवलेल्या किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या पासपोर्टवर एका देशातून दुस-या देशात बिनदिक्कत विमान प्रवास करीत आहेत, असे इंटरपोलचे प्रमुख रोनाल्ड के. नोबल यांनी म्हटले आहे. हवाई वाहतूक उद्योगाला असलेला सर्वाधिक धोका आणि ह्यमुख्य लक्ष्यह्ण...
  June 13, 02:43 AM
 • न्यूयॉर्क: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संगणक यंत्रणेला सायबर हल्ल्याचा झटका बसला. नाणेनिधीच्या वेबसाईटवरून हॅकर्सनी साया संगणकयंत्रणेत प्रवेश मिळवला. हॅकर्सच्या हाती काय माहिती लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अनेक देशांची आर्थिक माहिती लंपास झाल्याचा संशय आहे.आयएमएफचे प्रवक्ते डेव्हिड हॉले यांनी याबाबत सांगितले की, सायबर हल्ला झाला असला तरी कुठलेही काम ठप्प झालेले नाही. काही तांत्रिक अडचणी जरुर आल्या होत्या. पण त्यातून काही संवेदनशील माहिती बाहेर गेली असावी असे वाटत नाही....
  June 13, 02:35 AM
 • लॉसएंजिल्स- समुद्रील खारे पाणी आणि पृथ्वीवरील गोड पाण्याच्या प्रमाणाची माहिती प्राप्त करणे अधिक सोपे होणार आहे. अमेरिकेने अंतराळात पाठविलेला १.३ टन वजनाचा अॅक्वेरिअस हा उपग्रह ही सगळी माहिती चुटकीसरशी देणार आहे. कॅलिफॉर्नियाच्या तळावरून शुक्रवारी सकाळी या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार ७.२० वाजता डेल्टा रॉकेट सोडण्यात आले. हे रॉकेट या उपग्रहाला अंतराळात स्थिरावण्यासाठी आपल्यासोबत घेऊन उडाले. या मोहिमेत अमेरिका आणि अर्जेंटिनाच्या अंतराळ...
  June 12, 04:40 AM
 • लंडन- इंजिनिअर आणि पायलट यांनी दिलेल्या गुप्त अहवालानुसार आकाशात असलेल्या विमानातून मोबाइलवर एक कॉल जरी केला तर तो अपघाताला निमंत्रण ठरू शकतो. या अहवालानुसार गेल्या सहा वर्षांत झालेल्या ७४ विमान दुर्घटना केवळ मोबाइलवर कॉल केल्यामुळे झालेल्या आहेत.
  June 12, 04:19 AM
 • लंडन- सात सहेलिया खडी खडी, फरियाद सुनाये घडी घडी... सात मैत्रिणी अशाप्रकारे आपल्याकडे लोकगीतांतून डोकावतात. नव-याकडे दागिन्याचा हट्ट धरताना मला सात शेजारिणींना तोंड द्यावे लागते, असा बहाणाही घरोघरी डोकावत असतो. सात जणी...सात शेजारिणींचे बाळंतपण जवळपास एकाच वेळी झाले...असे मात्र कधी घडते का? कुणीही म्हणेल नाही...पण असे घडले आहे...साता समुद्रापार!लंडनच्या साउथ वेल्स उपनगरामधील मिस्किन परिसरात असे घडले आहे. या सातही शेजारिणी एकापाठोपाठ बाळंत झाल्या. तेही एकाच इस्पितळात! मिस्किनमध्ये एकाच...
  June 12, 04:15 AM
 • वॉशिंग्टन- आंतरराष्ट्रीय समुदायाचा विरोध असतानाही उत्तर कोरिया गेल्या दोन वर्षांपासून अवैधरीत्या आपला अणु कार्यक्रम रेटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका व्यावसायिक उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांमुळे उत्तर कोरियाची ही पोलखोल झाली आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान व आंतरराष्ट्रीय सुरक्षा या संस्थेने आपल्या अहवालात हे छायाचित्र दिले आहेत. सध्या विशिष्ट ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामाविषयी पॉंगयॉंगने स्पष्टीकरण दिले पाहिजे. दरम्यान, यापूर्वी कोरियाने हा प्रकल्प नागरी...
  June 12, 01:52 AM
 • तेहरान- इराण व अफगाणिस्तान यांच्यातील एका समझोत्यानुसार काबूलला ३ लाख टन इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेत इराणचे सरव्यवस्थापक अलेरेझा झिगमी व अफगाणिस्तानचे अन्वर-उल-अहदी हे सहभागी झाले होते. या करारानुसार इराण सुमारे ३ लाख टन इंधन निर्यात करणार आहे. या निर्यातीसाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यात ७० टक्के गॅस, जेट इंधन २० टक्के असणार आहे. दरम्यान, इराक, अफगाणिस्तान, आर्मेनिया हे देश इराणमधून इंधन आयात करतात.
  June 12, 01:49 AM
 • दुबई- यावर्षी सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत ५ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सरकारने अलीकडेच अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या त्याचा परिणाम प्रगतीवर झाल्याचे सांगण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ९३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर यांनी विकासदर सहा टक्क्यापर्यंत पोहोचेल असे म्हटले आहे. यापूर्वी तो ४.३ टक्क्यांवर जाईल असे म्हटले...
  June 12, 01:46 AM
 • दुबई- यावर्षी सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत ५ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सरकारने अलीकडेच अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या त्याचा परिणाम प्रगतीवर झाल्याचे सांगण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ९३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर यांनी विकासदर सहा टक्क्यापर्यंत पोहोचेल असे म्हटले आहे. यापूर्वी तो ४.३ टक्क्यांवर जाईल असे म्हटले...
  June 12, 01:45 AM
 • खोस्ट (अफगाणिस्तान)- अफगाणिस्तानच्या जलद कृतीदलाचे कमांडर शनिवारी एका आत्मघाती हल्ल्यात ठार झाले. या घटनेत २३ जण जखमी झाले. यात आणखी एक अधिकारी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिस दलासमोर अज्ञात हल्लेखोर आला व त्याने स्वत:ला पेटवून घेतले, असे खोस्टचे पोलिस प्रमुख मोहंमद याकूब मॅन्डोझाई यांनी सांगितले. या घटनेत पोलिसांबरोबर जखमी झालेल्यात नागरिकांचा समावेश आहे.
  June 12, 01:43 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी पाकिस्तानच्या लष्कर आणि आयएसआय प्रमुखांना अतिरेक्यांच्या ठावठिकाण्याबद्दल दिलेली माहिती फुटली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करण्याआधीच अतिरेकी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही आठवड्यांत दोनवेळा अमेरिकेने अतिरेक्यांची ठिकाणे आणि बॉम्ब तयार करण्याच्या कारखान्याची गुप्त माहिती निश्चित स्थळांसह दिली होती. ही माहिती अतिरेक्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई होण्याच्या आतच सगळेच अतिरेकी...
  June 12, 01:35 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी पाकिस्तानच्या लष्कर आणि आयएसआय प्रमुखांना अतिरेक्यांच्या ठावठिकाण्याबद्दल दिलेली माहिती फुटली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करण्याआधीच अतिरेकी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही आठवड्यांत दोनवेळा अमेरिकेने अतिरेक्यांची ठिकाणे आणि बॉम्ब तयार करण्याच्या कारखान्याची गुप्त माहिती निश्चित स्थळांसह दिली होती. ही माहिती अतिरेक्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई होण्याच्या आतच सगळेच अतिरेकी...
  June 12, 01:34 AM
 • त्रिपोली- बंडखोरांचे प्राबल्य असलेल्या मिसरत शहरानजीक गद्दाफी सेनेने शुक्रवारी रात्री केलेल्या हल्ल्यांत २२ बंडखोर ठार झाले. मिसरतपासून जवळच असलेल्या दाफनिया भागावर गद्दाफी सेनेने रणगाड्याचा वापर करीत बॉम्बगोळे व रॉकेटने हल्ले चढवले. यात किमान ६१ लोक जखमी झाल्याचे हिकमा रुग्णालयात उपचार करणा-या डॉक्टरने सांगितले. दक्षिण लिबियातील मिसरतमध्ये गद्दाफी सेनेने बुधवारपासून नव्याने हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये नाटो फौजांचा सहभाग नव्हता, असे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे....
  June 12, 01:28 AM
 • कोलंबो- भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी श्रीलंका भेटीचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, विदेश सचिव निरुपमा राव आणि संरक्षण सचिव प्रदीप कुमार यांच्या पथकाने श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची भेट घेऊन पंतप्रधानांनी निमंत्रण स्वीकारल्याचे पत्र सुपूर्द केले, अशी माहिती राजपक्षे यांच्या प्रवक्त्याने दिली. पंतप्रधानांचा नियोजित दौरा कधी होणार हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. यापूर्वी २००८ मधील सार्क परिषदेत...
  June 12, 01:21 AM
 • मोगादिशू- महिलेने केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात सोमालियाचे अंतर्गत व्यवहार मंत्री अब्दी शकूर शेख हसन ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली.हसन यांच्या कारचालकाने सांगितले, की त्याने नियमितपणे हसन यांना भेटायला येणा-या महिलेला त्यांच्या खोलीत जाताना पाहिले. तिच्याभोवती स्फोटके गुंडाळलेले आहेत, ही बाब सुरक्षा कर्मचा-यांच्या लक्षात येताच तिने स्फोट घडवून आणला. कानठळ्या बसविणारा आवाज झाला. महिला बॉम्बच्या चिंधड्या झाल्या होत्या. मी आत जाऊन पाहिले तेव्हा शेख हसन जखमी होते.
  June 12, 01:17 AM
 
जाहिरात

RECOMMENDED