Home >> International >> Other Country

Other Country News

 • गेल्या सहा महिन्यांपासून जॉर्डनमध्ये सुरू असलेल्या लोकशाही समर्थकांच्या आंदोलनाला अखेर यश प्राप्त झाले. जॉर्डनचे राजे शाह अब्दुल्ला यांनी सोमवारी लोकशाही प्रक्रियेला सुरुवात केली असून, त्यातील काही सुधारणांची घोषणाही त्यांनी केली. संसदेतील निर्वाचित सदस्य यापुढे पंतप्रधानांची निवड करतील, असे अब्दुल्ला यांनी जाहीर केले आहे. राजाच्या गादीवर बसून १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाह यांनी देशवासीयांना संदेश जारी केला. या वेळी जॉर्डनच्या भविष्यावर प्रकाश टाकताना त्यांनी संसदीय...
  June 14, 04:02 AM
 • यूजी-९९ हा विषाणू गव्हाच्या पिकावर हल्ला करण्याची शक्यता असून, त्यामुळे भारतातील गहू विषारी होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संशोधक अनेक दिवसांपासून या विषाणूचा शोध घेत असून, त्यापासून बचावाचा उपाय काढण्यात येत आहे. यूजी-९९ या विषाणूने पूर्व व दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. हा विषाणू आता कधी भारतावर हल्ला करेल हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. याचा धोका केवळ भारतापुरताच मर्यादित नाही, तर आॅस्ट्रेलिया, अमेरिका, पाकिस्तानला याची खबरदारी घ्यावी...
  June 14, 03:59 AM
 • २६/११ च्या मुंबई हल्ल्याशी आपला काहीएक संबंध नाही, असे पाकिस्तान कितीही सांगत असला तरी या हल्ल्याच्या कटात पाकच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेचाच हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. लष्कर ए तोएबाचा हस्तक डेव्हिड कोलमन हेडलीला हजारो सत्रांमध्ये लाहोरमधील आयएसआयच्या दोन मजली इमारतीत कडक बंदोबस्तात प्रशिक्षण देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हेडलीने आयएसआयकडून आपणास कशा पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले याची तपशीलवार कबुली दिली आहे. हे प्रशिक्षण केवळ जेम्स बॉण्ड स्टाईल नव्हते तर आपली ओळख लपवून...
  June 14, 03:55 AM
 • एडनबर्ग- रामदेव बाबांच्या मालकीचे स्कॉटलँड येथील बेट सध्या रिकामे पडले आहे. मागील दोन वर्षापासून बेटाची हीच स्थिती आहे. फक्त २ कर्मचारी या बेटाची देखरेख करत आहेत. रामदेव बाबांना येथे योग केंद्र बनवायचे आहे पण सध्या तरी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही.या बेटाची किंमत १६ कोटी रूपये आहे. सुनिता पोद्दार यांनी २००९ साली रामदेव बाबांना योग केंद्र सुरू करण्यासाठी बेट दान दिले होते. लिटिल कुंब्रे नावाच्या या बेटाला रामदेव बाबांच्या अनुयायांनी पीस आयलँड असे नाव दिले.
  June 13, 03:24 PM
 • माद्रिद: या जगात सनकी लोकांची कमतरता नाही. हे लोक कधी काय करतील काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना ! माद्रिदहून फ्रँकफर्टला जाणाया एका विमानात एक प्रवासी चक्क नग्न झाला. हे विमान आताच्या आताच्या आता खाली उतरवा, अशी त्याची मागणी होती. त्याने विमानात असा काही गोंधळ घातला की अखेरीस वैमानिकास ते विमान खाली उतरवावे लागले.लायबेरिया विमान कंपनीच्या वरील नियमित प्रवासी विमानात ही घटना घडली. हे विमान माद्रिदहून फ्रँकफर्टकडे जात होते. त्यावेळी अचानक विमानातील एक जर्मन प्रवासी उठून उभा ठाकला....
  June 13, 06:23 AM
 • ओहामा: जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेट यांच्यासमवेत जेवण करण्याची किंमत किती आहे ? तब्बल २३ लाख डॉलर्स (तब्बल १० कोटी ३५ लाख रुपये). ही सर्व रक्कम सामाजिक कार्यासाठी दान म्हणून खर्च केली जाते.गोरगरीब व बेघर लोकांसाठी काम करणाया ग्लाईड फाऊंडेशनने या संस्थेने हा उपक्रम आयोजित केला आहे. गतवर्षी बफेट यांच्यासोबत जेवण घेण्यासाठी इच्छुक असणायांनी या उपक्रमासाठी २६ लाख डॉलर्सची रक्कम मोजली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बोलीची रक्कम कमी आली. यावेळी वॉरेन यांच्यासोबत भोजनासाठी २३,...
  June 13, 06:10 AM
 • मनिला: 1.9 फूट उंचीचा जुनरे बलाविंग याने काल 18 व्या वर्षात पदार्पण केले आणि जागतिक विक्रमाचा तो धनी ठरला. जगातील सर्वात बुटका माणूस म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या जुनरेच्या या विक्रमाबाबत त्याच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. वयाच्या दुसर्या वर्षीपासून जुनरेची वाढ थांबली. तो फक्त वयानेच वाढला. शारीरिक उंची मात्र 59.93 सेंमी म्हणजे 1.9 फूट राहिली. तो 18 वर्षांचा नसल्याने त्याची गिनीज बुकात नोंद होऊ शकली नव्हती. गेल्या ऑक्टोबर महिन्यात नेपाळचा खगेंद्र थापा...
  June 13, 03:02 AM
 • वॉशिंग्टन: माझा माझ्या सरकारवर काडीचा विश्वास नाही. मी प्रखर राष्ट्रभक्त अमेरिकी नागरिक आहे. म्हणूनच लादेन मेला की नाही हे माझ्या डोळय़ाने मला पाहायचे आहे अशा शब्दात एक अमेरिकी नागरिक अरबी समुद्रात डुबकी घेऊन ओसामा बिन लादेनचा मृतदेह शोधणार आहे. समुद्र तळाशी गेलेल्या जहाजांचा शोध घेण्याचे काम करणारे बिल वॉरेन यांनी हा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी आपली टीमही तयार केली आहे. लवकरच ही मोहिम सुरु होणार आहे. पाकिस्तानात अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनचा अमेरिकी जवानांनी खातमा केल्यानंतर...
  June 13, 02:56 AM
 • बीजिंग: ग्वांगझू परिसरात स्थानिक रहिवासी आणि पोलिसांत झालेल्या हिंसक चकमकींनंतर 25 जणांना अटक करण्यात आली आहे.हय़बेई प्रांतात लिशुआन येथे एका नागरिकाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी सरकारी कार्यालयांवर हल्लाबोल करुन वाहनांना आगी लावल्या. त्यानंतर पोलिसांच्या वाहनांनाही पेटवण्यात आले. यामुळे तातडीने अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली. या सुरक्षा दलांनी प्रतिहल्ला चढवत जमावाला काबूत आणण्याचा प्रयत्न केला. नंतर 25 जणांना अटक करण्यात आली. चीनमध्ये भ्रष्टाचार आणि...
  June 13, 02:52 AM
 • बैरुत: वायव्य सिरियातील बंडखोरांवर सिरियाच्या फौजांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सिरियन सैन्य आणि रणगाड्यांनी बंडखोरांच्या प्रमुख केंद्रावर हल्ला करून बंड चिरडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरियन लष्कराच्या दोन तुकड्यांनी दक्षिण आणि पूर्व बाजूंनी एकाच वेळी हल्ला चढवला.चिलखती गाड्या आणि रणगाड्यांच्या मदतीने या तुकड्या चाल करुन आल्या. तुर्कस्तानच्या सीमावर्ती भागात अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात बंड पुकारणायांचे केंद्रस्थान आहे. हे बंडखोर...
  June 13, 02:49 AM
 • कॅनबेरा: चिलीमधील ज्वालामुखीच्या राखेने पार आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विमानसेवांना मोठा फटका दिला आहे. आॅस्ट्रेलियन विमान कंपन्यांनी मेलबर्न, टास्मानिया आणि न्यूझीलंडमधील विमानसेवा काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण अमेरिकेतील चिलीमधील पुहू ज्वालामुखीमुळे आकाशात राख पसरत चालली आहे. या राखेचे ढग वातावरणात 50 हजार फुटांवर गेले असून, ही राख आता आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत पोहोचली आहे. क्वांटास कंपनीने 14 उड्डाणे रद्द केल्याने 8 हजार प्रवासी अडचणीत आले, तर...
  June 13, 02:46 AM
 • सिंगापूर: नजीकच्या काळात ४०,००० लोकांनी चोरीच्या पासपोर्टवर सुखरूप प्रवास केला असल्याचे इंटरपोलने जाहीर केल्यामुळे जगभरतील हवाई उड्डाणाच्या एकूणच सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दहशतवादी आणि खतरनाक गुन्हेगार चोरलेल्या, हरवलेल्या किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या पासपोर्टवर एका देशातून दुस-या देशात बिनदिक्कत विमान प्रवास करीत आहेत, असे इंटरपोलचे प्रमुख रोनाल्ड के. नोबल यांनी म्हटले आहे. हवाई वाहतूक उद्योगाला असलेला सर्वाधिक धोका आणि ह्यमुख्य लक्ष्यह्ण...
  June 13, 02:43 AM
 • न्यूयॉर्क: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संगणक यंत्रणेला सायबर हल्ल्याचा झटका बसला. नाणेनिधीच्या वेबसाईटवरून हॅकर्सनी साया संगणकयंत्रणेत प्रवेश मिळवला. हॅकर्सच्या हाती काय माहिती लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अनेक देशांची आर्थिक माहिती लंपास झाल्याचा संशय आहे.आयएमएफचे प्रवक्ते डेव्हिड हॉले यांनी याबाबत सांगितले की, सायबर हल्ला झाला असला तरी कुठलेही काम ठप्प झालेले नाही. काही तांत्रिक अडचणी जरुर आल्या होत्या. पण त्यातून काही संवेदनशील माहिती बाहेर गेली असावी असे वाटत नाही....
  June 13, 02:35 AM
 • लॉसएंजिल्स- समुद्रील खारे पाणी आणि पृथ्वीवरील गोड पाण्याच्या प्रमाणाची माहिती प्राप्त करणे अधिक सोपे होणार आहे. अमेरिकेने अंतराळात पाठविलेला १.३ टन वजनाचा अॅक्वेरिअस हा उपग्रह ही सगळी माहिती चुटकीसरशी देणार आहे. कॅलिफॉर्नियाच्या तळावरून शुक्रवारी सकाळी या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार ७.२० वाजता डेल्टा रॉकेट सोडण्यात आले. हे रॉकेट या उपग्रहाला अंतराळात स्थिरावण्यासाठी आपल्यासोबत घेऊन उडाले. या मोहिमेत अमेरिका आणि अर्जेंटिनाच्या अंतराळ...
  June 12, 04:40 AM
 • लंडन- इंजिनिअर आणि पायलट यांनी दिलेल्या गुप्त अहवालानुसार आकाशात असलेल्या विमानातून मोबाइलवर एक कॉल जरी केला तर तो अपघाताला निमंत्रण ठरू शकतो. या अहवालानुसार गेल्या सहा वर्षांत झालेल्या ७४ विमान दुर्घटना केवळ मोबाइलवर कॉल केल्यामुळे झालेल्या आहेत.
  June 12, 04:19 AM
 • लंडन- सात सहेलिया खडी खडी, फरियाद सुनाये घडी घडी... सात मैत्रिणी अशाप्रकारे आपल्याकडे लोकगीतांतून डोकावतात. नव-याकडे दागिन्याचा हट्ट धरताना मला सात शेजारिणींना तोंड द्यावे लागते, असा बहाणाही घरोघरी डोकावत असतो. सात जणी...सात शेजारिणींचे बाळंतपण जवळपास एकाच वेळी झाले...असे मात्र कधी घडते का? कुणीही म्हणेल नाही...पण असे घडले आहे...साता समुद्रापार!लंडनच्या साउथ वेल्स उपनगरामधील मिस्किन परिसरात असे घडले आहे. या सातही शेजारिणी एकापाठोपाठ बाळंत झाल्या. तेही एकाच इस्पितळात! मिस्किनमध्ये एकाच...
  June 12, 04:15 AM
 • वॉशिंग्टन- आंतरराष्ट्रीय समुदायाचा विरोध असतानाही उत्तर कोरिया गेल्या दोन वर्षांपासून अवैधरीत्या आपला अणु कार्यक्रम रेटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका व्यावसायिक उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांमुळे उत्तर कोरियाची ही पोलखोल झाली आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान व आंतरराष्ट्रीय सुरक्षा या संस्थेने आपल्या अहवालात हे छायाचित्र दिले आहेत. सध्या विशिष्ट ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामाविषयी पॉंगयॉंगने स्पष्टीकरण दिले पाहिजे. दरम्यान, यापूर्वी कोरियाने हा प्रकल्प नागरी...
  June 12, 01:52 AM
 • तेहरान- इराण व अफगाणिस्तान यांच्यातील एका समझोत्यानुसार काबूलला ३ लाख टन इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेत इराणचे सरव्यवस्थापक अलेरेझा झिगमी व अफगाणिस्तानचे अन्वर-उल-अहदी हे सहभागी झाले होते. या करारानुसार इराण सुमारे ३ लाख टन इंधन निर्यात करणार आहे. या निर्यातीसाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यात ७० टक्के गॅस, जेट इंधन २० टक्के असणार आहे. दरम्यान, इराक, अफगाणिस्तान, आर्मेनिया हे देश इराणमधून इंधन आयात करतात.
  June 12, 01:49 AM
 • दुबई- यावर्षी सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत ५ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सरकारने अलीकडेच अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या त्याचा परिणाम प्रगतीवर झाल्याचे सांगण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ९३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर यांनी विकासदर सहा टक्क्यापर्यंत पोहोचेल असे म्हटले आहे. यापूर्वी तो ४.३ टक्क्यांवर जाईल असे म्हटले...
  June 12, 01:46 AM
 • दुबई- यावर्षी सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत ५ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सरकारने अलीकडेच अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या त्याचा परिणाम प्रगतीवर झाल्याचे सांगण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ९३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर यांनी विकासदर सहा टक्क्यापर्यंत पोहोचेल असे म्हटले आहे. यापूर्वी तो ४.३ टक्क्यांवर जाईल असे म्हटले...
  June 12, 01:45 AM
 
जाहिरात

RECOMMENDED