जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • लंडन - जगभरात होणा-या घटस्फोटांपैकी एक तृतीयांश घटस्फोट हे फेसबुकमुळे होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 'डिव्होर्स ऑनलाइन' या कायदेविषयक फर्मनुसार घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये संदर्भ म्हणून फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या फर्मच्या म्हणण्यानुसार, घटस्फोटांच्या तक्रार अर्जांमध्ये फेसबुक शब्दाचा वापर गेल्या २ वर्षांत ५० टक्क्यांनी वाढलाय. गेल्या वर्षी फर्मकडे दाखल झालेल्या ५ हजार तक्रार अर्जांपैकी किमान ३३ टक्के अर्जांमध्ये फेसबुक वेबसाइटचा उल्लेख आहे....
  January 1, 06:05 PM
 • टोकियोः जपानची राजधानी टोकियोला आज तीव्र भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7 एवढी मोजण्यात आली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.58 वाजता भूकंपाचा धक्का बसला. गेल्याच वर्षी जपानला भूकंपाने मोठा हादरा दिला. अर्धे जपान त्यात उध्वस्त झाले होते. तर आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा जपानला भूकंपाने हादरा दिला आहे.
  January 1, 11:44 AM
 • लागोस (नायजेरिया)- नायजेरियातील दक्षिण पूर्व भागातील इबोनी राज्यात झालेल्या जातीय दंगलीत किमान ५२ जण ठार झाले आहेत. इझा कम्युनिटीच्या लोकांनी इजिलो कम्युनिटीच्या लोकांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर झालेल्या हल्ल्यात किमान ५२ जण ठार आहेत. हा वाद जमीन वाटपावरुन झाला आहे.
  January 1, 11:33 AM
 • जगभर नव्या वर्षाचे स्वागत जोरात झाले. भारतासह जगभरातील देशांनी वेगवेगळ्या व आपल्या संस्कृतीप्रमाणे पध्दतीने जल्लोषात साजरे केले. ऑस्ट्रेलियाने जबरदस्त दिव्याची रोषणाई करीत नव्या वर्षाची सुरवात केली. सिडनी हॉर्बर, क्वीन्सलॅंड, साऊथ बॅंक पार्कलॅंडस आणि सेंट्रल मेलबर्न शहरे नववर्षाच्या स्वागतात बुडून गेली होती. ब्रिस्बेनमध्ये एका नदीच्या किनारी ८० हजार लोक खराब हवामान असतानाही मजा घेत होते. सिडनीतील हॉर्बरवर हॉर्बर ऑफ लाइट परेड झाली त्यात ५५ जहाजे सामील झाली त्यांनी तुफानी आतशबाजी...
  January 1, 10:50 AM
 • नवी दिल्ली- जगभर नव्या वर्षाचे स्वागत जोरात झाले. भारतासह जगभरातील देशांनी वेगवेगळ्या व आपल्या संस्कृतीप्रमाणे पध्दतीने जल्लोषात साजरे केले. ऑस्ट्रेलियाने जबरदस्त दिव्याची रोषणाई करीत नव्या वर्षाची सुरवात केली. सिडनी हॉर्बर, क्वीन्सलॅंड, साऊथ बॅंक पार्कलॅंडस आणि सेंट्रल मेलबर्न शहरे नववर्षाच्या स्वागतात बुडून गेली होती. सिडनीतील हॉर्बर ब्रिजवर १६ भाषाद्वारे वेलकम टू सिडनी असा संदेश दाखविला गेला.पाहा छायाचित्रे...
  January 1, 10:35 AM
 • लंडन - भारतीय संस्कृती व नागरिकांबद्दल वंशभेदाची वक्तव्ये करणारे प्रेझेंटर क्लार्कसन यांनी भारताची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी लेबर पक्षाचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी केथ वाझ यांनी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांनी पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन यांच्यावर शरसंधान केले. ख्रिसमसच्या निमित्ताने प्रसारित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात क्लार्कसन यांनी ही वक्तव्ये केली होती. संस्कृती, राहणीमान, प्रसाधनगृह वगैरे बाबतीत क्लार्कसन यांनी भारताची टिंगल उडवली होती. क्लार्कसन यांनी...
  December 31, 11:53 PM
 • लंडन - भारतीय विद्यार्थी अनुज बिडवे हत्याप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी माहिती देणा-यास 50 हजार पौंडाचे बक्षीस जाहीर केले. सुमारे चार कोटी अकरा लाख रुपये अशी या बक्षिसाची रक्कम आहे. दुसरीकडे हत्येच्या घटनेची माहिती बिडवे कुटुंबीयांना कळवण्यास विलंब झाल्याबद्दल पोलिसांनी माफी मागितली आहे.ब्रिटिश पोलिसांनी बक्षिसाची रक्कम जाहीर करतानाच या घटनेची माहिती बिडवे परिवाराला देण्यास विलंब झाल्याची कबुली त्यांनी दिली. बिडवे कुटुंबाला अनुजच्या मृत्यूची माहिती...
  December 31, 11:52 PM
 • मनिला - येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात फटाक्यांचा स्फोट आणि अंदाधुंद गोळीबारात सुमारे 200 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात उत्साहावर विरजण पडले आहे. दुसरीकडे नवीन वर्षाचा उत्सव फटाकेविरहित साजरा करण्यासंबंधी फिलिपाइन्स सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियानही राबवले जात आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्य पिऊन लोक धुंद होते. त्याच वेळी बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. त्यात 197 जण जखमी झाले. त्यातील आठ जण गंभीर जखमी झाले.या वेळी...
  December 31, 11:47 PM
 • तेहरान - अणू कार्यक्रमावरून आधीच अमेरिकेच्या रडार वर असलेल्या इराणने पुन्हा एकदा उद्दामपणा दाखवला आहे. शुक्रवारी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली; परंतु आतापर्यंत क्षेपणास्त्राची कधीही चाचणी घेतली नसल्याचा कांगावा करत देश आगामी काळात मोठ्या प्रमाणात चाचणी करणार असल्याचे इराणने शुक्रवारी जाहीर केले. नौदलाचे वरिष्ठ कमांडर मेहमूद मुसावी यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे इराण व आंतरराष्ट्रीय समुदाय यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सरकारी टीव्हीशी...
  December 31, 11:46 PM
 • लंडन - विज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल ब्रिटनचा मानाचा नाइटहूड पुरस्कार यंदा भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकटरमन रामकृष्णन यांना जाहीर झाला आहे. रामकृष्णन यांना रसायनशास्त्रातील योगदानाबद्दल 2009 मध्ये नोबेलने गौरवण्यात आले होते. दरम्यान, वैयक्तिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या भारतीय वंशाच्या इतर दहा जणांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.रामकृष्णन हे अमेरिकन नागरिक असून त्यांचे नाव 2012 च्या पुरस्कार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. अणू जीव विज्ञान या केम्ब्रिज...
  December 31, 11:45 PM
 • आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१२ वर्ष हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या वर्षात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ओबामांनी ४ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सिनेटर जॉन मॅककेन यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला होता. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले. आता पुन्हा एकदा २०१२ मधील नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीत अमेरिकेतील नागरिक...
  December 31, 04:00 PM
 • वॉशिंग्टन- पाकिस्तान व येमेनमध्ये करण्यात येत असलेल्या ड्रोन हल्ल्यावरुन ओबामा प्रशासन व सिनेट सदस्यांत हंगामा झाला आहे. तसेच या मुद्यांवरुन व्हाईट हाऊस व सदस्यात तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने व्हाईट हाऊसमधील अधिकारयांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.सिनेट सदस्यांच्या सूचना स्वीकारण्याची मुद्दा व्हाईट हाऊसने फेटाळून लावला होता. सदस्याचा आरोप आहे की, सीआयए आणि लष्कर यांच्या संयुक्त ऑपरेशनमुळे अमेरिकेच्या धोरणावर मोठा परिणाम होत चालला आहे.बराक ओबामा...
  December 31, 10:54 AM
 • लंडनः भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्णन यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या 'नाईटहुड' सन्मानाने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळविणा-या मोजक्याच नामवंत व्यक्तींच्या यादीत रामकृष्णन यांचा समावेश झाला आहे. इंग्लंडमध्ये राहणा-या परदेशी नागरिकांना क्वचितच या सन्मानाने गौरविण्यात येते. रामकृष्णन यांना 2009 मध्ये रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार देण्यात आला होता. स्थलांतरीत नागरिकांचे ब्रिटीश समाजामध्ये फार मोठे योगदान आहे. हा सन्मान त्याचेच एक प्रतिक असून या योगदानाची दखल...
  December 31, 10:38 AM
 • वॉशिंग्टन - सीआयए अर्थात अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे व त्यांची इंडिया अगेन्स्ट करप्शन ही संघटना भारतात राजकीय दबावतंत्राचा वापर करत आहेत. त्यामुळे अमेरिकेने अण्णा हजारे व इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व हुरियत कॉन्फरन्स यांच्या गटात टाकले आहे. सीआयएच्या वर्ल्ड फॅक्ट बुक मधील पॉलिटिकल प्रेशर ग्रुप अॅण्ड लीडर्सच्या यादीत अण्णा हजारेंचा समावेश करण्यात आला आहे. सीआयएच्या या यादीनुसार...
  December 31, 07:04 AM
 • एपिया - काळाचे चक्र आपल्या पद्धतीने पुढे सरकत असते ही भलेही आपली धारणा असेल, पण जगातील दोन देश असे आहेत की जेथे 30 डिसेंबर हा दिवस उगवलाच नाही. 29 डिसेंबरनंतर थेट 31 डिसेंबरच आला. प्रशांत महासागरातील सामोआ आणि तोकेलो हे ते देश आहेत.शेजारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडशी व्यापारी संबंध सुधारण्यासाठी आपण असे करणार असल्याचे समोआने तर मेमध्येच जाहीर करून टाकले होते. देशात 19 वर्षांनंतर हा बदल घडून आला आहे. त्या वेळी अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी या देशाने वेळेत एका दिवसाची भर घातली होती. समोआचे...
  December 31, 02:23 AM
 • लंडन - ब्रिटन राजघराण्याचे ड्यूक विल्यम व डचेस ऑफ केंम्ब्रिज केट मिडलटन यांच्या विवाहानंतरचा बकिंगहॅमच्या गॅलरीतील रॉयल किस हा ब्रिटनच्या नागरिकांचा सर्वात आवडता क्षण ठरला आहे. 2011 मधील टीव्हीवरील फेव्हरिट लाइव्ह मोमेंटमध्ये या क्षणाची नोंद करण्यात आली आहे. 2011 मध्ये या शाही विवाह ब्रिटनमधील सर्वात हॉट विषय ठरला. त्यानंतर या दोघांच्या रॉयल किसची चर्चा मीडियासह सामान्य नागरिकांतून खूप रंगली. वर्षभरातील सर्वात रोमँटिक लाइव्ह मोमेन्ट म्हणून ब्रिटनच्या नागरिकांनी या क्षणास आपली पसंती...
  December 31, 12:33 AM
 • लंडन - भारतीय विद्यार्थी अनुज बिडवेची हत्या वंशभेदाचा हिंसाचार किंवा हेट क्राइममधून झाली असावी, असे ब्रिटन पोलिसांना वाटते. हत्येचा तपास त्याच दिशेने सुरू असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. तपासाच्या दृष्टीने आवश्यक असलेला उद्देश नेमकेपणाने आम्ही ठरवलेला नाही. ही हत्या वंशभेदातून झाल्याचा असा कोणताही पुरावा आमच्या हाती नाही. परंतु हा तिरस्कारातून झालेल्या हत्येचा प्रकार असावा, हे गृहीतक आम्ही मानू लागलो आहोत, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी केव्हिन मलिगन यांनी सांगितले. अनुज आपल्या...
  December 31, 12:31 AM
 • प्योगयाँग - उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग इल यांच्या निधनानंतर सत्तेची सूत्रे हाती घेणा-या किम उन यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला देशाच्या आगामी वाटचालीची स्पष्ट चुणूक दाखवली. देशाच्या धोरणात कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाची आशा बाळगू नका, असे नवीन सर्वोच्च नेते किम उन यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या बलवान राष्ट्रीय सुरक्षा आयोगाच्या हवाल्याने सरकारी मीडियाने हे वक्तव्य जाहीर केले आहे. दक्षिण कोरियात सरकार म्हणजे कठपुतळी स्वरूपाचे आहे, असे संबोधतानाच जगभरातील सर्व...
  December 31, 12:28 AM
 • डमास्कस - राजधानीतील उत्तर भागात शुक्रवारी हजारो लोक सरकारच्या दमनचक्राविरोधात निषेध करण्यासाठी एका रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्यावर सुरक्षा जवानांनी केलेल्या हल्ल्यात 25 नागरिक ठार झाले. डौमा भागातील एका प्रार्थनास्थळाजवळ सुमारे 30 हजार लोक जमले आहेत. त्या अगोदर अरब लीगचे निरीक्षक देशात दाखल झाले. निरीक्षकांचा हा दौरा तीन दिवसांचा असून या काळात ते देशातील हिंसाचार बंद करण्याच्या मोहिमेवर असतील. आतापर्यंत देशात 5 हजार लोकांचा बळी गेला आहे. गेल्या आठ दिवसांत लष्करी अत्याचाराचे...
  December 30, 10:51 PM
 • मॉस्को - उत्तरेकडील एका कारखान्यात दुरुस्ती करण्यात येणा-या रशियाच्या पाणबुडीला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मरमंस्क येथील कारखान्यात या पाणबुडीवर काम सुरू होते. त्याच वेळी ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे याचा कसलाही धोका नाही, असे अधिका-यांचे म्हणणे आहे. या पाणबुडीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तिला पुन्हा नौदलात सहभागी करून घेण्यात येईल, असे रशियाच्या उपपंतप्रधानांनी स्पष्ट केले...
  December 30, 10:47 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात