जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • वॉशिंग्टन। कोलंबियाची जगविख्यात पॉपस्टार शकिरा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची सल्लागार झाली आहे. हिस्पनिक समुदायाच्या शैक्षणिक सल्लागार आयोगावर ओबामांनी शकिराची नियुक्ती केली आहे. 34 वर्षीय शकिरासोबतच सामाजिक कार्यकर्ते अंड्रियन पेड्रोझा आणि अरिझोना स्कूल डिस्ट्रिक्टचे अधीक्षक केंट पी. स्कीबनर यांचीही या आयोगावर नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्ट आॅनलाइन ने दिले आहे. आपल्या बेअरफूट फाउंडेशनमार्फत शकिराने कोलंबियाच्या शिक्षण क्षेत्रातही भरीव कार्य केले...
  October 8, 12:05 AM
 • साल्झबर्ग- राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अल्बर्ट आइन्स्टाइनच्या घरापासून महान संगीतकार मोझार्टच्या संग्रहालयापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना आपल्या दौ-यात भेटी दिल्या. स्वित्झर्लंड व आॅस्ट्रियाचा हा दौरा राष्ट्रपतींसाठी संस्मरणीय ठरला आहे. साल्झबर्ग येथील महान संगीतकार मोझार्टच्या घरालाही राष्ट्रपतींनी भेट दिली. या वेळी त्यांनी संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली. दिवस पावसाचे असल्याने रिमझिम पावसात राष्ट्रपतींनी सुरांचा आनंद घेतला. मोझार्टच्या घरात जतन करून ठेवण्यात आलेला...
  October 8, 12:00 AM
 • लंडन- मोबाइलवर अधिक वेळ घालवणा-या मोबाइलधारकांना आता मान आणि पाठदुखीचा धोका निर्माण झाला आहे. आतीवापरामुळे ही पाठदुखी वाढत असल्याचे दिसून आले आहे. नवीन गॅजेटसोबत तासन्तास राहण्याची आवड असणा-या मोबाइलधारकांना हा धोका निर्माण झाला आहे. पाठीवर योग्य उपचार घेतले गेले नाहीत तर सांध्यांचेही नुकसान होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. मांसपेशीमध्ये एक प्रकारचे काठीण्य येते. त्यामधूनही त्रास वाढू शकतो. याचा परिणाम म्हणून पाठदुखीत आणखी वाढ होते. गॅजेटमुळे पाठीची स्थिती चुकीची राहिल्याचे...
  October 7, 11:54 PM
 • वॉशिंग्टन - भारत म्हणजे जिवावर उठलेला शत्रू आहे, हा दृष्टिकोन सोडून द्या. भारतासोबत दोस्ती करा. त्यातच तुमचे, आमचे आणि सर्वांचेत हित आहे, अशा शब्दांत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या. व्हाइट हाऊसच्या ईस्ट रूममध्ये गुरुवारी ओबामांची पत्रकार परिषद झाली त्या वेळी ते बोलत होते. पाकिस्तान तालिबानी दहशतवादी हक्कानी नेटवर्कचा वापर आयएसआयच्या माध्यामातून असा आरोप अमेरिकेचे निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकारी माइक म्युलेन यांनी केला होता. या संदर्भात...
  October 7, 11:43 PM
 • ओस्लो: लाइबेरियामध्ये पेटलेल्या गृहयुद्धाविरुध्द महिलांना एकत्र आणणार्या राष्ट्राध्यक्षा एलीन जॉन्सन सरलीफ तसेच त्यांच्याच देशातील सक्रिय कार्यकर्ता लेमा जीबोई आणि यमनमध्ये महिलांच्या अधिकारासाठी संघर्ष करणारी तवाक्कुल करमान यांना 2011 चा शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. जागतिक शांतता आणि लोकशाहीसाठी स्त्री हक्क आणि स्वातंत्र्य असंच यंदाच्या नोबेल शांतता पुरस्काराचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. हा पुरस्कार या तिघींना विभागून दिला जाणार आहे. आपल्या अहिंसक चळवळीने...
  October 7, 05:43 PM
 • न्यूयॉर्क- आयपॉड, आयपॅड, आयफोन यासारखे अत्याधुनिक उत्पादन तयार करणारे ऍपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्यावर आज अमेरिकेत अंत्यसंस्कार होतील. कॅन्सरने पीडित असलेल्या स्टीव्ह यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी लॉरेन पावेल आणि चार मुले असा परिवार आहे.स्टीव्ह यांना फेब्रुवारीमध्ये आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे व आपण फार दिवस जगणार नसल्याची जाणीव त्यांना झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्य़ा नातेवाईकांना, मित्रपरिवाराला भेटणे सुरु केले...
  October 7, 03:36 PM
 • पॅरिस/सैंटो डोमिगो - युनोस्कोने जर पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून दर्जा दिला तर, युनोस्कोला दिल्या जाणाऱया अनुदानात घट केली जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच पॅलेस्टाइनच्या निर्मितीला आपला विरोध राहील, असेही म्हटले आहे.युनोस्कोच्या कार्यकारी समितीने काल पॅलेस्टाइनच्या सदस्य मागणीच्या ठरावाला पाठिंबा दिला होता. पॅलेस्टाइनच्या मागणीचा ठराव संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) सांस्कृतिक संस्था असलेल्या "युनेस्को'च्या सर्वसाधारण सभेत मांडला जाईल. या सर्वसाधारण सभेने त्याला...
  October 7, 02:49 PM
 • हक्कानी नेटवर्क हे अफगाणिस्तानात विकसित झालेले बंडखोरांचे एक स्वतंत्र नेटवर्क आहे. तालिबानशी या नेटवर्कचा संबंध आहे. मौलवी जलालुद्दीन हक्कानी हा कधीकाळी नेटवर्कचा प्रमुख होता. तो आता आध्यात्मिक नेत्याच्या भूमिकेत आहे. या संपूर्ण नेटवर्कचे नेतृत्व त्याचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी करतो. सिराजुद्दीनवर अमेरिकेने 24.48 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तो आपल्या नेटवर्कमधील लोकांमध्ये खलिफा या नावाने ओळखला जातो. ही संघटना प्रामुख्याने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर काम करते....
  October 7, 11:25 AM
 • न्यूयॉर्क- गंगा नदीच्या तीरावर असलेल्या बालाजी घाटाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. याची स्थिती धोकादायक बनली आहे, असे आंतरराष्ट्रीय वारसा निधी फाउण्डेशनने (डब्ल्यूएमएफ) स्पष्ट केले आहे. डब्ल्यूएमएफच्या वतीने धोकादायक बनलेल्या जगातील 67 वारसास्थळांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यातील 41 देशांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता या फाउंडेशनने प्रतिपादित केली आहे. हे फाउण्डेशन खासगी स्वरूपाचे आहे. गंगा नदीकिनारी बालाजी घाटावर बांधण्यात आलेली इमारत भाविक-भक्तांच्या पूजाअर्चेसाठी गरजेची...
  October 7, 03:57 AM
 • न्यूयॉर्क- जॉब्स यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्याबद्दल अतिव आदर आणि नितांत प्रेम असलेल्या चाहत्यांनी इंटरनेट आणि मोबाइलवरून संदेश पाठवून शोक व्यक्त केला. यातील एक संदेश म्हणतो, जग बदलून टाकल्याबद्दल लाखो धन्यवाद...!अॅपलचे सीईओपद आता टीम कूक यांच्याकडे आहे. जॉब्स यांनी सीईओपद सोडल्यानंतर राजीनाम्यात कंपनीच्या भरभराटीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. अॅपलच्या यशाचे सर्वांत उज्ज्वल दिवस आगामी काळात येतील. यानंतर मी नव्या भूमिकेत असेल. तरीही या यशात माझा तेवढाच वाटा असेल. 1976 मध्ये...
  October 7, 01:55 AM
 • स्टॉकहोम- स्वीडनचे कवी टॉमस ट्रान्सट्रोमर यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वीडीश अॅकेडमीने अनेक वर्षानंतर आपल्याच देशातील कवीला या पुरस्कारासाठी निवडले आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे ट्रान्सट्रोमर हे आठवे युरोपीय आहेत. यापूर्वी २००९ मध्ये जर्मनीच्या कादंबरीकार हर्ता मुलर , २००८ मध्ये फ्रान्सचे लेखक ली क्लेजिया यांनी हा पुरस्कार मिळाला होता.परीक्षकांच्या मते ८० वर्षीय ट्रान्सट्रॉमर यांचे लेखन हे पारदर्शी चित्र उभा करते. स्टॉकहोम येथे १९३१ मध्ये ट्रान्सट्रॉमर...
  October 6, 06:17 PM
 • आयफोन, आयपॅड यांचा शोध लावून लोकांना प्रगतीचा एक मार्ग दाखवणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांचे बुधवारी निधन झाले. जॉब्स अॅपल या कंपनीचे सहसंस्थापक होते. त्यांनी तंत्रज्ञानाचा विकास करून अमेरिकेसह जगाला अवघड गोष्टी सोप्या करून दाखवल्या. छायाचित्रांमधून त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊयात:
  October 6, 12:59 PM
 • स्टीव्ह जॉब्सने कोणत्याही महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतलेली नाही. तरीही आज त्याच्या नावावर संशोधक आणि सहसंशोधक म्हणून अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असलेले ३०० हून अधिक अमेरिकी पेटंट नोंदविले गेले आहेत. स्टीव्ह जॉब्स याच्या संशोधनातून निर्माण झालेली काही उत्पादने...१. अॅपल I (१९७६) - अॅपलचे पहिले उत्पादन म्हणजे अभियंते आणि छंद जोपासणाऱयांसाठी तयार केलेला कॉम्प्युटर. स्टीव्ह वोनैक याने या कॉम्प्युटरची निर्मिती केली. जॉब्सने त्यातील वित्तपुरवठ्याची आणि विपणनाची बाजू...
  October 6, 09:52 AM
 • न्यूयॉर्क- सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आयफोन, आयपॉड आणि आयपॅड अशी एकाहून एक दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अॅपलचे सहसंस्थापक आणि माजी कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. जॉब्स २००४ पासून कॅन्सरमुळे आजारी होते. २००९मध्ये त्यांचे स्वादूपिंडही (लीव्हर) बदलले होते.जॉब्स यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे शोधकार्यातच घालवले. बुद्धिमत्ता, जिद्द आणि काम करण्याची इच्छाशक्ती यांच्या बळावर त्यांनी...
  October 6, 08:26 AM
 • लंडन- ब्रिटिश प्रिन्स विल्यम्स सोबतच्या विवाहावेळी केट मिडलटन हिने घातलेला वेडिंग ड्रेस पाहण्यासाठी बकिंगहॅम महालात पर्यटकांची अक्षरश: रीघ लागली होती. तब्बल सहा लाख लोकांनी नववधूचा हा पोषाख पाहण्यासाठी गर्दी केल्याचे राजघराण्याच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रिन्स विल्यम आणि केट (आताची डचेस आॅफ केंब्रिज) यांचा ब्रिटिश राजघराण्यातील हा शाही विवाह जगभरात औत्सुक्याचा व चर्चेचा विषय ठरला होता. केटसाठी प्रख्यात फॅशन डिझायनर सारा बर्टन यांनी हा नववधूचा पोशाख बनवला होता. आयव्हरी आणि...
  October 6, 12:06 AM
 • मॉस्को- अत्याधुनिक आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षाअखेरीस भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी आज ही माहिती दिली. विक्रमादित्यऐवजी रशिया अण्वस्त्रवाहू परंतु नेर्पा पाणबुडी देणार असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. परंतु या विवादांना आणि अटकळींना आता पूर्णविराम मिळाला आहे. अँटोनी आणि रशियाचे संरक्षणमंत्री अनातोली सेर्दीयुकोव्ह यांच्यात मंगळवारी रात्री मॉस्को येथे प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर अत्याधुनिक...
  October 5, 11:59 PM
 • लंडन- स्मार्टफोनच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी ब्रिटनमधील रोजच्या जगण्यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. साहेबांच्या या देशाला पेपर क्लिप, टिश्यू पेपरशिवाय जगताच येत नाही. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु एका संशोधनानंतर हे स्पष्ट झाले आहे. या पाहणीत नागरिकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यात आला आहे. इलॅस्टिक बॅण्ड्सपासून बबलरॅपपर्यंत नागरिक कसा पैसा खर्च करतात, हे यातून जाणून घेण्यात आले. अब्जावधी लोकांच्या दैनंदिन आयुष्यात या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. ब्रिटनमधील नागरिक...
  October 5, 12:14 AM
 • वॉशिंग्टन- 2012 मध्ये होणा-या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील आपली उमेदवारी ही कमजोर असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मान्य केले आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या एका पाहणीत ओबामा यांची लोकप्रियता घसरल्याचेही स्पष्ट झाले आहे. पुढील निवडणुकीत आपली उमेदवारी कमजोर आहे, असे वाटते का, या प्रश्नावर ओबामा यांनी नक्कीच असे उत्तर दिले; परंतु त्यासाठी अंडरडॉग म्हणायचे का हे मला सांगता येणार नाही. अमेरिकेचे स्वप्न साकार करण्याची क्षमता किंवा तशी दृष्टी कोणत्या व्यक्तीमध्ये आहे,...
  October 5, 12:03 AM
 • लंडन. भारताचे भवितव्य हे खेड्यात वसले आहे, असे महात्मा गांधी यांनी 1948 साली म्हटले होते; वास्तवात मात्र भारताचे भवितव्य त्याच्या शहरांत होते. यावरून गांधीजींचा अंदाज चुकल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण लंडनचे महापौर बोरिस जॉन्सन यांनी नोंदविले आहे. मँचेस्टर येथे कॉंझर्वेटिव्ह पार्टीच्या सभेत जॉन्सन बोलत होते. भारतात खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे, हे अलीकडे भारतात जाऊन आलेल्या कोणालाही विचारा, असेही ते म्हणाले. जॉन्सन यांच्या सासू या भारतीय वंशाच्या आहेत.महात्मा गांधी यांनी 1948...
  October 4, 07:52 PM
 • मोगादिशू- सोमालियामध्ये स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्फोट होऊन ७० जण ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. राजधानी मोगादिशू येथील शिक्षण मंत्रालयासमोर हा स्फोट झाला, अशी माहिती एका पोलिस अधिका-याने दिली. मोगादिशू अॅम्ब्यूलन्सचे प्रमुख अली मुसे यांनी या हल्ल्यात ३० जण जखमी झाल्याचे सांगितले. शिक्षण मंत्रालयासमोर लावण्यात आलेल्या एका नाक्यावर जेव्हा कारला थांबवण्यात आले तेव्हा हा स्फोट झाला, असे अली हुसेन या पोलिस अधिका-याने सांगितले. अल-शहाब या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी...
  October 4, 05:21 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात