जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • वेलिंग्टन. बँकेकडून खात्यावर चुकीने जमा झालेले सुमारे 37 कोटी रुपये (7.7 दशलक्ष डॉलर्स) घेऊन पोबारा करणा-या न्यूझीलंडच्या एका नागरिकास अटक करण्यात पोलिसांना तब्बल दोन वर्षांनी यश मिळाले. पोलिसांनी या व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नसले तरी त्याला पूर्वी हुई गाओ या नावाने ओळखले जात. 2009 मध्ये खात्यावर जमा झालेली रक्कम घेऊन गाओ याने आपल्या साथीदारासह चीनमध्ये पलायन केले होते.तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता; परंतु हाँगकाँग पोलिसांनी त्याला गुरुवारी अडवले. त्यापाठोपाठ...
  October 1, 01:39 AM
 • वॉशिंग्टन, साना. अमेरिकेत जन्मलेला व मुस्लिम धर्मगुरू तसेच अल कायदाचा महत्त्वाचा कमांडर अन्वर अवलाकी याचा येमेनमधील एका धुमश्चक्री खात्मा झाल्याचा दावा अमेरिकेच्या एका अधिका-याकडून करण्यात आला आहे. संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेननंतरची ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. अवलाकी डिसेंबर 2007 येमेनमध्ये होता. त्याला अमेरिकेने विशेष आंतरराष्ट्रीय दहशतवादी असा दर्जा दिला होता. अवलाकीचा जगातील अनेक हल्ल्यांत थेट सहभाग असल्याचा होता, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. राष्ट्राध्यक्ष बराक...
  October 1, 01:35 AM
 • न्यूयॉर्क- चीनच्या वाढत्या ताकदीमुळे भारताने आपली सुरक्षा वाढविण्यावर भर दिला आहे. याचमुळे दक्षिण आशियात २०१० मध्ये सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदीत भारताने चीनलाही मागे टाकत आघाडी घेतली आहे. मात्र जगात भारत-चीन यांच्यापेक्षा सौदी अरेबियाने सर्वाधिक शस्त्रास्त्रे खरेदी या दोन्ही देशांना मागे टाकले आहे.अमेरिकी काँग्रेसच्या एका अहवालानुसार, २००३ ते २०१० या काळात विकसनील देशांच्या शस्त्रास्त्र खरेदीत सौदीने सर्वांना मागे टाकले आहे. २०१० साली सौदीने एकून २९ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र...
  September 30, 05:56 PM
 • वॉशिंग्टन - भारताने 2010 मध्ये संमत केलेला आण्विक उत्तरदायित्व कायदा आण्विक नुकसान भरपाईसंदर्भातील ठरावाला सुसंगत नसल्याचे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. आण्विक उत्तरदायित्वकायदा यासंदर्भातील आण्विक नुकसान भरपाई ठरावास सुसंगत नसल्याने त्याबद्दल चिंता आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आण्विक उर्जा संस्था ही योग्य संस्था आहे. या उत्तरदायित्व कायद्यामधील आक्षेप दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय...
  September 30, 12:50 PM
 • वॉशिंग्टन- जगावर दादागिरी चालविणा-या अमेरिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे आहेत. अमेरिका कंगालीच्या वाटेवर आहे. आता सरकारवर मालमत्ता विकून रोख उभारण्याच्या विचार करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत जनता स्वतःचे सामान विकून टंचाईचा सामना करीत होती. परंतु, सरकारवरच आता अशी वेळ आली आहे. उपयोगात न येणारे सामान विकून रोख उभारावी, असा प्रस्ताव ओबामा प्रशासनाने दिला आहे. आईसलँड, कोर्ट हाऊस, एअरस्ट्रिप तसचे उपयोगान न येणारे वाहन, रस्ते, इमारत तसेच दुरचित्रवाणी...
  September 30, 10:51 AM
 • मॉस्को. शत्रूच्या छातीत धडकी भरविणा-या एके-47 या रायफलला रशियन लष्कराने कायमची विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मिखेल कलाश्निकोव्ह हे रशियन नागरिक शस्त्र क्षेत्रातील या क्रांतिकारक शस्त्राचे निर्माते आहेत. त्यांच्याच देशात ही रायफल बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रशियन लष्करात अगोदरच शस्त्रांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एके-47 ही मशीनगन तूर्त बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रायफलची नवीन आवृत्ती येईपर्यंत थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे रशियन...
  September 30, 06:16 AM
 • रियाध- गाडी चालविल्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी दहा फटक्यांची जेद्दाह न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सौदीचे राजा अब्दुल्लाह यांनी रद्दबातल ठरविली आहे. सौदीमध्ये महिलांना गाडी चालवण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून शैमा जस्तनिहा या महिलेस 10 फटके मारण्याची शिक्षा जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे महिलांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि विकासाला साथ देण्याचे राजांनी जाहीर करून दोन दिवसही उलटले नव्हते, तोच ही शिक्षा दिली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत होते....
  September 30, 06:11 AM
 • शिकागो। अमेरिकेत खरबुजामध्ये आढळून आलेला जिवाणू लिस्टेरियाच्या संसर्गामुळे 13 लोकांचा मृत्यू झाला. 172 लोकांना याची बाधा झाली आहे. या जिवाणूचा संसर्ग देशातील तब्बल 18 राज्यांत झाला आहे. कोलोराडोत ऑगस्टमध्ये एका खरबुजात हा जिवाणू आढळून आला. दुसरीकडे दक्षता म्हणून अमेरिकेच्या खाद्य व औषध प्रशासनाने घरातील खरबूज फेकून द्यायचे आवाहन जनतेला केले आहे.
  September 30, 04:24 AM
 • लंडन। पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये आजाराशी लढण्याची ताकद अधिक असते. शरीरातील दोन एक्स क्रोमोझोममुळे स्त्रियांत रोगप्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते. पुरुषांपेक्षा महिला कमजोर मानल्या जातात; परंतु वास्तवात स्त्रिया जास्त सक्षम असतात. स्त्रियांमधील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बॅकअप व्यवस्था असते. त्यामुळे रोग पुन्हा परतला तरी त्या सहजपणे त्याचा मुकाबला करू शकतात, असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे.
  September 30, 04:17 AM
 • जिनेव्हा। फ्रान्स, नेदरलँड, बेल्जियमनंतर आता स्वित्झर्लंडमध्येही बुरख्यावर बंदी आणण्याची तयारी सुरू झाली आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने या संदर्भातील विधेयकाला मंजुरी दिली आहे; परंतु या प्रस्तावाला वरिष्ठ सभागृहात मान्यता मिळणे अजून बाकी आहे. या विधेयकाच्या बाजूने 100 मते पडली तर 77 सदस्यांनी विरोधात मते दिली. स्वित्झर्लंडमध्ये तीन आठवड्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
  September 30, 04:15 AM
 • वॉशिंग्टन. अमेरिकेत पेटॅगॉनवर हल्ल्याचा कट रचल्याबद्दल रिझवान फिरदोसला (26) एफबीआयने अटक केली आहे. परदेशात तैनात अमेरिकी सैनिकांना मारण्यासाठी अल-कायदाला स्फोटके पुरविल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. रिझवान अमेरिकी नागरिक असून नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीत त्याने फिजिक्समध्ये पदवी घेतलेली आहे. 2010 मध्येच त्याने अमेरिकेविरुद्ध जिहादचा कट आखला होता. आरोप सिद्ध झाले तर त्याला 15 वर्षांची कैद होऊ शकते.असा होता कट...छोट्या ड्रोन विमानांना रिमोट कंट्रोलच्या मदतीने इप्सित स्थळावर डागण्याचा...
  September 30, 04:02 AM
 • जकार्ता- इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा बेटाजवळील बहोरोक परिसरात सीएएसए सी-२१२ या प्रकारचे छोटे विमान कोसळून विमानातील १८ जण ठार झाल्याची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली.विमानात १५ प्रवाशांसह तीन कर्मचारी प्रवास करत होते. विमानाचा अपघात का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, गेल्या काही दिवसात इंडोनेशियात विमान अपघातात वाढ झाली आहे.
  September 29, 12:56 PM
 • बोस्टन - ९/११च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने अमेरिकेचे लष्करी सामर्थ व मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉन व कॅपिटॉल हिलवर हल्ला करण्याचा योजना तयार करणाऱया रिझवान फेरादौस (वय 26) याला अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले. रिझवानवर रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने पेंटॅगॉनवर हल्ला करणार असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. छोट्या पल्ल्याची विमानाद्वारे तो काही प्लास्टिक स्फोटके भरुन पेंटॅगानवर धडकाविण्याची त्याची योजना आसल्याचे तपास यत्रणांनी म्हटले आहे. रिझवान बोस्टन विद्यापीठाचा...
  September 29, 12:01 PM
 • वॉशिंग्टन- दहशतवादाविरोधातील पाकिस्तानच्या भूमिकेवरून नाराज असलेल्या अमेरिकेकडून हक्कानी नेटवर्क विरूध्द कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हक्कानी नेटवर्कला लवकरच दहशतवादी संघटना घोषित करण्यात येईल असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे. तर इकडे आयएसआयने देखील अमेरिकेच्या कोणत्याही कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.अमेरिकेमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे हक्कानी नेटवर्कचा हात होता. हक्कानी नेटवर्कला...
  September 29, 10:44 AM
 • नवी दिल्ली. सौदीचे राजे अब्दुल्ला यांनी महिलांनाही मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा ऐतिहासिक निर्णय दोन दिवसांपूर्वीच घेतला खरा; पण महिलांबाबतच्या भेदभावामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. कार चालवल्यामुळे एका महिलेला दहा फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौदीमध्ये महिलांना ड्रायव्हिंग करण्यास बंदी आहे. राजे अब्दुल्ला यांनी महिलांना मताधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर तेथील महिलांना समानतेची वागणूक दिली जाईल, अशी अपेक्षा होती. केवळ मताधिकाराचा निर्णय घेऊन...
  September 29, 02:50 AM
 • लंडन. वाका वाका फेम प्रसिद्ध कोलंबियन गायिका शाकिरा आणि पिंक फ्लॉयडच्या रॉजर वॉटर्स या दोघांनी मिळून 16 दशलक्ष अमेरिकी डॉलरमध्ये एक कॅरेबियन बेटच विकत घेतले आहे. बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू गेरॉर्ड पीकबरोबर सध्या डेटिंगवर जात असलेल्या 34 वर्षीय शाकिरा आणि 68 वर्षीय संगीतकार वॉटर्स यांनी बहमासच्या उत्तरेला असलेले बाँड्स के हे बेट भागीदारीमध्ये विकत घेतले आहे. या ठिकाणी सुट्यांमध्ये मौजमजा करणा-या कोट्यधीशांसाठी रिसॉर्ट बांधण्यात येणार आहे. खासगी बीचची व्यवस्था असलेले लक्झरी...
  September 29, 02:46 AM
 • लॉस एंजिल्स. लोक जेव्हा माझा शो पाहून परत निघतील त्या वेळी प्रत्येकाच्या तोंडात तो जगातील सर्वात ग्रेटेस्ट एंटरटेनर होता, हेच उद्गार असतील. मायकेल जॅक्सनच्या अखेरच्या काही दिवसांतील हे शब्द मंगळवारी न्यायालयात घुमताच उपस्थित स्तब्ध झाले.अत्यंत धीरगंभीर आवाजात आपल्या सहका-यांना बोलतानाची ही रेकॉर्डिंग जॅक्सनच्या वकीलांनी मंगळवारी भरगच्च कोर्ट रूममध्ये ऐकवली. अवघ्या जगाला वेड लावणा-या किंग ऑफ पॉपचा 25 जून 2009 मध्ये आपल्या राहत्या घरातच गूढ मृत्यू झाला होता. या प्रकरणी जॅक्सनचे...
  September 29, 02:42 AM
 • तेहरान । 200 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदू शकणा-या क्रुझ क्षेपणास्त्राची तैनाती इराणच्या नौदलात करण्यात आल्याची माहिती नौदलाने बुधवारी दिली. नौदलामध्ये तैनात केलेल्या क्रुझ क्षेपणास्त्र किना-यावरून अथवा जहाजातून डागता येऊ शकणार आहे. वजनाने हलक्या असलेल्या या क्षेपणास्त्राची निर्मिती स्वदेशी विशेषज्ञांकडून करण्यात आली आहे. इराण गेल्या दोन वर्षांपासून स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र निर्मिती करत आहे. यामध्ये क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे.
  September 29, 02:38 AM
 • लंडन. सा-या जगाला आपले सौंदर्य व संगीतावर डोलायला लावणा-या मॅडोनाच्या पावलावर पाऊल ठेवत आता तिची मुलगी पॉप दुनियेत उतरणार आहे. अवघ्या पंधरा वर्षांची लॉर्डेस ही जाझ, हिप-हॉपसह पॉपिंग या पाश्चात्त्य नृत्य प्रकारात निपुण आहे. लॉर्डेसला सर्व प्रकारच्या पाश्चात्य नृत्य शैलीचा अभ्यास व सराव असून ती लहान वयातही परिक्षक म्हणून सक्षम असल्याचा विश्वास आई मॅडोनाला आहे. त्यामुळेच वर्ल्ड टूरसाठी लागणा-या बॅकअप डान्सर्सची निवड चक्क तिच्या मुलीने केली आहे. आपल्या आगामी वर्ल्ड टूरसाठी...
  September 28, 01:42 AM
 • न्यूयॉर्क. प्रोटोकॉल बाजूला सारीत सोमवारी परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी आयोजित केलेल्या मेजवानीस हजेरी लावली. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानी वकिलातीतर्फे सप्ततारांकि त न्यूयॉर्क हॉटेलमध्ये खास मेजवानी आयोजित केली होती. कृष्णा यांचे आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण होते. अमेरिका दौ-यातील नियोजित कार्यक्रमात हिना रब्बानी यांच्यासोबत भेटीचा समावेश नव्हता; परंतु हिना...
  September 28, 01:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात