Home >> International >> Other Country

Other Country News

 • बगदाद- इराकमधील ताजी शहरात बुधवारी झालेल्या दोन आत्मघाती हल्ल्यात ३७ नागरिक ठार, तर ५४ जखमी झाले. मुस्लिमबहुल ताजी शहरातील दोन सरकारी कार्यालयांबाहेर एक कार बॉम्बस्फोट व एक बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ३७ नागरिक ठार, तर ५४ जण जखमी झाले. कारमध्ये बसलेल्या आत्मघाती हल्लेखोर तसेच स्फोटकाचा बेल्ट बांधलेल्या हल्लेखोराने हे स्फोट घडवल्याचे ताजी येथील पोलिस अधिकायाने सांगितले. ओळखपत्र कार्यालयाबाहेर पहिला स्फोट झाला. या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमल्यानंतर दुसया हल्लेखोराने बॉम्बस्फोट...
  July 7, 12:19 AM
 • दमास्कस- जनतेच्या उद्रेकाला शांत करण्यासाठी सरकारने दमनचक्र सुरु केले असून देशातील सर्वात मोठे शहर असलेल्या हामा शहरात लष्कराच्या गोळीबारात २२ जण ठार झाले. तर ८० जण जखमी झाले आहेत. सरकार विरोधी निदर्शने करण्यासाठी हामा शहरात ८० हजार लोक रस्त्यावर उतरले होते.लष्कराला रोखण्यासाठी शहरवासीयांनी जागोजागी अडथळे टाकले होते.यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत ८० जण जखमी झाले. राष्ट्रीय मानवी हक्क संघटनेचे प्रमुख अमाक कुराबी यांंनी सांगितले की अल हुरानी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु असतांना...
  July 7, 12:14 AM
 • मॉस्को- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, हाफीज सईद, लष्कर-ए-तोयबा, हुजी आणि लष्कर-ए-जांगवी हे दहशतवाद्यांना पैसा पुरवणारे असून मालमत्ता, पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या, असा धोक्याचा इशारा रशियाने आपल्या देशवासीयांना दिला आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरवणाया अतिरेकी संघटनांची यादी रशियाने केली असून, यामध्ये मुंबई हल्ल्याचे षड्यंत्र रचणाया जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याचाही समावेश आहे. रशियन सरकारच्या रॉस्सीकाया गॅझेता या दैनिकात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पैशांची...
  July 7, 12:00 AM
 • खारटॉम. सुदानजवळ तांबड्या समुद्रात जहाजाला आग लागून मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या दुर्घटनेत जहाजावरील 197 प्रवाशी ठार झाले. जहाजातील प्रवासी हे अवैधरीत्या सौदी अरबला चालले होते, असे वृत्त आहे.सुदान मीडिया सेंटरने दिलेल्या माहितीनुसार तीन प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. अन्य प्रवाशांचा शोध घेणे सुरू आहे. या जहाजावर क्युबा या देशचा झेंडा फडकत होता. यमनच्या चार नागरिकांच्या मालिकीची ही जहाज आहे. या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.याच क्षेत्रात आणखी एका जहाजाला पकडण्यात आले आहे. या...
  July 6, 12:42 PM
 • सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया प्रांतात तुफानी वादळाने जनजीवन विस्कळीत झाले. वादळामुळे या भागातील वीजेचा पुरवठा देखील बंद झाला आहे. खराब हवामानामुळे न्यू साऊथ वेल्स मध्ये रेल्वेवर झाड पडून ३ लोक जखमी झाले.वादळाचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. सिडनी विमानतळावरील विमान उड्डाणांचे वेळापत्रक बिघडले आहे. ब्यू माऊंटेन येथील मेंडलो बाथ येथे एका रेल्वेवर वादळामुळे झाड पडल्याने ३ प्रवासी जखमी झाले आहेत. छत कोसळल्याने एका रूग्णालयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले,...
  July 6, 08:18 AM
 • जोहान्सबर्ग- बॅरिस्टर म्हणून दक्षिण आफ्रिकेत असताना महात्मा गांधींना वंशभेदातून पोलिसी पट्टा अंगावर खावा लागला होता. हा ऐतिहासिक पट्टा आता लेनासियातील एका फाउंडेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. बाबू नगडी नावाच्या व्यक्तीकडे हा पट्टा होता. त्यांनी हा पट्टा फाउंडेशनकडे दिला आहे. नगडी यांचे आजोबा हे महात्मा गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी होते. क्लिपटाऊन येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात हा पट्टा देण्यात आला. लेनासियात भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हा पट्टा खूप प्रसिद्ध आहे....
  July 6, 04:55 AM
 • लंडन- रहस्यकथेचे सूत्र, थरार आणि शैली सांभाळत २६ लेखकांनी मिळून एक कादंबरी लिहिली आहे. नो रेस्ट फॉर द डेड नावाची ही कादंबरी सोमवारी प्रकाशित झाली. साहित्य प्रकाशनातील हा एक आगळावेगळा प्रयोग यशस्वी होईल, असा या सर्व लेखकांचा दावा आहे. स्ट्रँड या रहस्यकथा, गूढकथा, थरारकथांना वाहिलेल्या नियतकालिकाचे कर्ते करविते अॅन्ड्र्यू गुली यांनी ही भ्ान्नाट आयडिया विकसित केली आणि यशस्वी करूनही दाखवली. न केलेल्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा झालेली महिला ही एवढी थीम घेऊन गुली यांनी कथासूत्र तयार केले...
  July 6, 03:12 AM
 • मेलबोर्न- ऑस्ट्रेलियात बुरखा घालून फिरणा-या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. चेहरा झाकलेल्या कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. नव्या कायद्यानुसार न्यू साऊथवेल्सच्या पोलिसांना चेहरा झाकलेल्या कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाला बुरखा अथवा हेल्मेट काढून चौकशी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या चौकशीला नकार दिल्यास एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. न्यू साऊथवेल्स राज्य मंत्रिमंडळाने या प्रकरणी नवा कायद्याला नुकतीच मंजूरी दिली...
  July 6, 03:00 AM
 • ऑस्ट्रेलियाच्या न्यु साऊथ वेल्स आणि विक्टोरिया प्रांतामध्ये आलेल्या जोरदार वादळामुळे 33 हजार लोक प्रभावित झाले आहेत. तेथील वीज गायब झाली आहे. न्यु साऊथ वेल्समध्ये आलेल्या वादळामुळे एक झाड रेल्वेवर पडून झालेल्या अपघातात तीन लोक जखमी झाले आहेत. तासी 140 किलोमीटर वेगाने आलेल्या या वादळामुळे वीज ठप्प झाली आहे. तर ट्राफिक सिग्नलवरही याचा वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे रस्तावर वाहनांची एक गर्दी झाली. सिडनी एअरपोर्ट वरील विमाने उशिराने येत आहेत.ब्लु मांऊटनच्या मेडलो बाथ मध्ये 20 प्रवाशांना...
  July 5, 09:51 PM
 • काबुल - अफगाणिस्तानमध्ये प्रथमच तालिबानी सैनिकांनी एका ब्रिटीश सैनिकाची हत्या केली आहे. नाटो सेनेचा सैनिक असलेल्या ब्रिटीश सैनिकाचे प्रथम अपहरण करण्यात आले त्यानंतर त्याच्या डोक्यात गोळी मारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरुन हे तेव्हा अफगाणिस्तानच्या दौ-यावर होते. ब्रिटन आणि अमेरिकेच्या सैनिकांचे अफगाणिस्तानच्या सेनेसह अफगाणिस्तानातील सर्व शस्त्रास्त्रांचा साठा शोधण्याचे कार्य सुरु आहे. मारण्यात आलेला सैनिक हा आपली बटालियन सोडून चुकीने एकटाच अतिरेकी...
  July 5, 06:11 PM
 • लंडन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अध्यक्ष कान यांच्यामागचे शुक्लकाष्ठ संपेल असे वाटत नाही. आयएमएफच्या माजी अध्यक्षांनी मुलाखतीच्या निमित्ताने घरी बोलावले आणि माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फ्रेंच लेखिका त्रिस्तेन बनोन यांनी केला आहे. याआधी कान यांच्यावर हॉटेलमध्ये काम करणा-या महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.लेखिका बनोन यांनी आरोप केला आहे की, 2003 मध्ये त्यांना कान यांनी मुलाखतीसाठी आपल्या...
  July 5, 04:47 PM
 • मास्को. परग्रहांवरील प्राण्यांविषयी एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने खबळजनक माहिती प्रसिद्ध केली आहे. रशियातील विज्ञान संस्थेचे संचालक अंद्रेई फिन्केल्सटेन यांनी दावा केला आहे की आगामी 20 वर्षांच्या आत परग्रहावरील माणसं पृथ्वीवर येतील. रशियातील सरकारी संवाद समिती इंटरफॅक्सने हे वृत्त दिले आहे. रशियाच्या विज्ञान संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञाने हा दावा केल्याने या वृत्ताला महत्त्व आले आहे. पृथ्वीवरील माणसाची भेट परग्रहावरील माणसाशी होणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. इतकेच नाही तर...
  July 5, 04:21 PM
 • माकडाच्या लीला अर्थात मर्कटलीला तुम्ही याआधीही ऐकले असणार. परंतु आज आम्ही येथे जी माहिती देत आहोत तशी माहिती तुम्ही याआधी कुठेच ऐकली किंवा पाहिली नसणार. इंडोनिशियातील मकाक प्रजातीच्या एका माकडाने विख्यात फोटोग्राफर डेव्हिड स्लॅटर्स यांचा कॅमेरा हिसकावला.कॅमेरा ताब्यात आल्यानंतर या मर्कटाने कॅमे-याशी खेळायला सुरूवात केली. खेळता खेळता नकळत या माकडाकडून स्वत:चेच काही शानदार फोटोही निघाले. इतकेच नाही तर खुद्द फोटोग्राफर डेव्हिड स्लॅटर्स यांचे छायाचित्रही या माकडाने काढले....
  July 5, 12:04 PM
 • बँकॉक- थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन सिनवात्रा यांच्या भगिनी यिंगलूक सिनवात्रा यांनी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या असून पाच पक्षांशी समझोता करीत आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत सिनवात्रा यांच्या फेऊ थाई पक्षाने दणकेबाज यश मिळवत सत्तांतर घडवले होते. या पक्षाने 500 पैकी 265 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. त्याउपरही सरकारला धोका राहू नये यासाठी चार पक्षांसोबत युती करण्याचा निर्णय यिंगलूक सिनवात्रा यांनी घेतला. यामुळे आता...
  July 5, 06:05 AM
 • वॉशिंग्टन- कोण कधी आंदोलनाचा कोणता मार्ग निवडेल याचा काहीच नेम नाही. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण, धरणे, मोर्चे हे जगभ्ार चालणारे आंदोलनाचे प्रकार आता कालबाह्य झालेत, असे वाटावे असाच एक प्रकार कोलंबियामध्ये घडला आहे. आपल्या गावासाठी पक्का रस्ता तयार करण्यात यावा म्हणून कोलंबियातील एका गावातील तब्बल तीन हजार महिला गेल्या सहा दिवसांपासून सेक्स स्ट्राईकवर गेल्या आहेत. या महिलांनी त्यांचे पती आणि प्रियकरांना शारीरिक संबंधास साफ शब्दांत नकार दिला आहे. जोपर्यंत गावाचा...
  July 5, 04:52 AM
 • लंडन- पंचावन्न वर्षांपूर्वी ज्या चित्राचा लिलाव केवळ ४५ पाऊंडला (३,२१० रुपये) झाला होता, ते चित्र जगद्विख्यात चित्रकार लिओनार्दो द विंचीचे असल्याचे सिद्ध होताच त्याची किंमत तब्बल १२ कोटी पाऊंड (८५५ कोटी ९६ लाख रुपये ) झाली आहे. विश्वाचा उद्धारकर्ता नावाचे हे चित्र नोव्हेंबरमध्ये लंडनच्या नॅशनल आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'लिओनार्दो द विंची : द पेंटर अॅट द कोर्ट आॅफ मिलॉन' या प्रदर्शनात ठेवले जाणार आहे. लिओनार्दोच्या चित्रांवर संशोधन करणाया विशेषज्ञांच्या मते, हे चित्र ७००...
  July 5, 04:48 AM
 • न्यूयॉर्क- लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानी लष्कराचा नेहमीच पाठिंबा आहे. गेल्या तीन दशकांपासून पाकच्या लष्कराने हे धोरण मोठ्या स्तरावर अवलंबिले आहे. या दहशतवादी कारवायांचा वापर शेजारी देश व अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्याविरुद्ध करण्यात येत असल्याचा सनसनाटी दावा पाकिस्तानी सैन्यातीलच माजी उच्चाधिकायाने केला आहे. यामुळे पाकिस्तानचा भ्ायानक चेहरा जगासमोर आला आहे. लष्कर-ए-तोयबा, हरकत-उल-मुजाहिदीन, हिज्बुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातील...
  July 5, 04:38 AM
 • वॉशिंग्टन- आयोवातील रॉस रेस्टॉरंटमध्ये अमेरिकेचे राष्टाध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर जवळून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. ओबामा यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना नमस्कार असा संदेश फॉक्स न्यूज या वृत्त वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर झळकला आणि एकच खळबळ उडाली. हा हॅकर्सनी केलेला उपद्व्याप असल्याचे समोर आल्यानंतर फॉक्स न्यूजने काही काळासाठी हे अकाउंट बंद करून परिस्थिती पूर्ववत केली. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेत हॅकींगचे प्रकार...
  July 5, 04:31 AM
 • न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा आता हॅकर्सच्या कचाट्यात सापडले आहेत. हॅकर्सने अमेरिकेच्या स्वातंत्रता दिवशी एका वृत्तवाहिनीचे ट्विटर हॅक करून ओबामा यांची हत्या झाल्याची माहिती दिली. ओबामा यांची हत्या झाल्याची बातमी प्रसिद्ध होताच सगळीकडे खळबळ उडाली होती. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले.आंतरराष्ट्रीय मिडीयात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या रुपर्ड मरडॉक यांच्या फॉक्स न्यूजचे ट्विटरचे अकाउंट हॅकर्सने हॅक केले होते. या न्यूज चॅनेलच्या ट्विटर अकाउंटचे...
  July 4, 07:53 PM
 • वॉशिंग्टन - पाकिस्तानमधून कार्यरत असलेली दहशतवादी संघटना लष्करे तैयबाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अमेरिकेत बोलविण्याची योजना आखल्याचा खुलासा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हे़डली याने केला आहे. ठाकरे यांच्या वादग्रस्त भाषणामुळे लष्करे तैयबाला लोकांना एकत्र करून पैसा गोळा करण्यासाठी मदत झाली होती. त्यामुळे ठाकरे यांना लष्कर नेते अमेरिकेत बोलविणाच्या विचारात होते.शिकागो येथील न्यायालयात हेडलीने खुलासा करताना सांगितले की, लष्करने कधीच बाळासाहेब ठाकरे यांना...
  July 4, 06:46 PM
 
जाहिरात

RECOMMENDED