जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • हिंदू देव-देवतांच्या आक्षेपार्ह चित्रे काढल्यामुळे वादात अडकलेल्या एम एफ हुसेन यांना २००६ साली भारत सोडावा लागला. त्यामुळे भारतात त्यांच्याविषयी समिश्र भावना आहेत. बाळ ठाकरे यांनी हुसैन यांना माथेफिरु म्हटले आहे तर, राज यांनी मात्र कलेच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत हुसेन यांच्या कार्याचा गौरव करत ते भारताची अस्मिता असल्याचे म्हटले आहे. जगविख्यात भारतीय चित्रकार मकबूल फिदा हुसैन (एम. एफ. हुसैन) यांचे लंडनमध्ये निधन झाले असून त्यांच्यावर तेथेच अंतिम संस्कार केले...
  June 9, 12:19 PM
 • केपटाऊन- जगातील दहापैकी आठ देश हे आपापल्या आरोग्य सेवेत चांगल्या प्रकारे सुधारणा करण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने मांडले आहे.जगातील ११४ देशांपैकी केवळ १९ देश हे या तंत्रज्ञानापासून दूर असल्याचे अभ्यासातून आढळून आले आहे. ८३ टक्के देशांनी आपण या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे
  June 9, 01:18 AM
 • हॉस्टन- भारतीय माणसे जगात कोठेही गेली तरी ती इथून-तिथून सारखीच, असे गमतीने म्हणण्याची पद्धत आहे. ही गोष्ट अनिवासी भारतीय महिलांनाही लागू होत असावी. म्हणूनच मुलगा व्हावा यासाठी अमेरिकेतील भारतीय महिलांना गर्भपात करणे गैर वाटत नाही. प्रजोत्पादनाचे तंत्रज्ञान व गर्भपाताच्या योजनांचा पुरेपूर वापर करण्यात अनिवासी भारतीय महिला पुढे आहेत, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधनातून आढळून आले आहे. या संशोधनासाठी नमुना निवड करण्यात आली होती. ६५ जणांची मुलाखत घेण्यात आली होती. यात...
  June 9, 01:13 AM
 • न्यूयॉर्क- अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा तू भाऊ आहेस, असे म्हणत येथील एका शीख नागरिकावर अमेरिकी नागरिकाने हल्ला चढवल्याची घटना घडली. जीवन सिंग यांच्यावर रेल्वेमध्ये केलेल्या हल्ल्यात त्यांचे दात पडले. जीवन सिंग महानगर वाहतूक प्राधिकरणातील कर्मचारी असून मागील तीस वर्षांपासून ते इथे वास्तव्यास आहेत. अमेरिकी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते रिचमंड हिल येथून रेल्वेने ब्रुकलिनला जात होते. प्रवासात घडलेल्या प्रकाराबद्दल सिंग यांनी सांगितले की, एक श्वेतवर्णीय...
  June 9, 01:06 AM
 • न्यूयॉर्क- हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याचे ज्यूंविषयीचे शंभर वर्षांपूर्वीचे पत्र सापडले असून ते १९१९ या वर्षीचे आहे. त्याच्या विचारांची जडण-घडण कशी झाली, हे यातून वाचायला मिळते. त्याने हे पत्र जर्मन सैनिकांना उद्देशून लिहिले आहे. तीन आठवड्यांपूर्वी लॉस एंजिल्स येथील एक संघटनेने हे मूळ पत्र सुमारे १,५०,००० अमेरिकन डॉलर्स देऊन विकत घेतले. हे पत्र सर्वांत अगोदर अमेरिकन सैनिक विल्यम झिग्लर यांच्याकडे होते. झिग्लर यांना ते जर्मनीतील नरेमबर्गमध्ये दुसया महायुद्धाच्या शेवटच्या महिन्यात...
  June 9, 12:58 AM
 • लंडन- ब्रिटनमधील चार राज्यांना सध्या भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. वेल्स, दक्षिण-पश्चिम, मिडलॅण्ड्स व पूर्व अँग्लिया अशी या राज्यांची नावे आहेत. पाणीपुरवठा करणा-या कंपन्या पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्या आहेत. या पूर्वी ब्रिटनमध्ये १९७६ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. परंतु यावर्षी असा दुष्काळ पडणार नाही, असा दावा पर्यावरण संस्थेचे कार्यकारी संचालक पॉल लिईन्स्टेर यांनी केला आहे. सध्या आपली परिस्थिती त्यावेळेपेक्षा खूप चांगली आहे. दरम्यान, ब्रिटनने मागील वर्षीही दुष्काळ...
  June 9, 12:53 AM
 • वाशिंग्टन- अमेरिकेच्या दौ-यावर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी रात्री शाही मेजवानी दिली. दोन बड्या नेत्यांच्या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या मेजवानीला भारताच्या दृष्टीने फारसे महत्त्व नसले तरीही या समारंभावर भारतीय ठसा होता हे मात्र नक्की. मिशेलसाठी भारतीय डिझायनरने पोशाख तयार केला होता. दुसरे म्हणजे मिशेल ओबामा यांच्या स्वागत-संस्कारात अस्सल भारतीय बाज होता.ओबामा यांच्या या मेजवानीला अमेरिकेतील २००...
  June 9, 12:37 AM
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हवाई ताफ्यात एक जबरदस्त विमान दाखल होणार असून त्यांची किंमत सुमारे २० कोटी डॉलर एवढी असणार आहे. हे विमान ओबामांना अणुबॉम्ब सारख्या हल्ल्यातून व कोणत्याही हवाई हल्ल्यातून सुखरुप वाचवू शकते. याबाबत डेली मेल यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, हे विमान बोईंग ७४७ श्रेणीतील असून, विमानाचे पल्स शीट इलेक्ट्रोमेग्नेटिक असल्याने कोणत्याही हल्ल्यापासून त्याला नुकसान पोहचणे जवळजवळ अशक्य आहे. हे विमान इंधनाशिवाय कित्येक दिवस हवेत राहू शकते.विमानाचे खास...
  June 8, 04:05 PM
 • लंडन- अल कायदासारख्या दहशतवादी गटांकडून जैविक दहशतवादाचा (बायोटेररिझम) धोका ब्रिटनला असल्याचे 'द संडे टेलिग्राफ'ने त्याचे वृत्त दिले आहे.जर्मनीत ई. कोलाय जिवाणूच्या विषारी प्रकारामुळे पसरलेल्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणेने दिला आहे. ब्रिटनमध्ये दहशत पसरवण्यासाठी व लोकांचे बळी घेण्यासाठी दहशतवादी गट अन्नपदार्थ तसेच पेयांमध्ये विषबाधा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतात, असा इशारा ब्रिटिश सरकारच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला आहे. जर्मनीत ई. कोलायमुळे...
  June 8, 08:30 AM
 • लंडन - अल कायदा या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार इलियास काश्मिरीच्या मृत्यूवरून पाकिस्तान आणि अमेरिकेत बेबनाव झाला आहे. पाकच्या गुप्तचर अधिका-यांनी पश्चिमोत्तर पाकिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात काश्मिरी मारला गेल्याचा दावा केला आहे, तर त्याच क्षेत्रात दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवर असलेल्या अमेरिकी अधिका-यांनी इलियास काश्मिरीच्या मृत्यूला दुजोरा देण्यास नकार दिला. त्यामुळे बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले.
  June 8, 05:00 AM
 • लंडन- प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या तीन कलाकृतींना येथील एका लिलावात सर्वाधिक किंमत मिळाली आहे. या चित्रांना सुमारे २.३२ कोटी रुपये एवढी किंमत आली. एका चित्रात हुसेन यांनी एक घोडा व एक स्त्री रेखाटली आहे. या लिलावात आधुनिक, समकालीन तसेच मध्य-पूर्व काळातील कलेचे प्रदर्शन करण्यात आले. यात भारत, इजिप्त, लेबनॉन, सिरिया, इराक, इराण, पाकिस्तान व श्रीलंकेतील कलाकृतींचा समावेश होता. दरम्यान, हुसेन यांनी चित्रकृतींबरोबरच चित्रपटातही हात आजमावला आहे.
  June 8, 04:53 AM
 • शिकागो- आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेचा मेजर इक्बाल हाच डेव्हिड कोलमन हेडलीच्या संपर्कातील दुवा होता. त्यानेच या गुप्तहेर संस्थेकडून शस्त्रे मिळवली होती, अशी कबुली मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सहआरोपी तहव्वूर राणाने दिली असल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ अमेरिकेच्या एफबीआयने २००९ मध्ये राणाच्या चौकशीदरम्यान चित्रित केला. याप्रकरणी न्यायालय आज निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. हेडलीचे आता जमात-उद-दावा या नावाने ओळखल्या...
  June 8, 04:47 AM
 • अमेरिकेने मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार तहव्वूर राणा याच्या चौकशीची चित्रफीत जारी केली आहे. शिकागोच्या न्यायालयात मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा खटला सुरु आहे. त्याच्या सुनावणीदरम्यान पुरावा म्हणून चौकशीची चित्रफीत न्यायालयात सादर करण्यात आली. पहिल्यांदाच राणाची चित्रफीत जारी करण्यात आली आहे. त्यात त्याने डेव्हीड हेडलीसोबत केलेल्या संभाषणाची कबुली दिल्याचे स्पष्ट होत आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असलेल्या हेडलीने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला...
  June 7, 10:59 PM
 • स्टॉकहोम- जगभरात सध्य स्थितीला पाच हजारांपेक्षा जास्त अण्वस्त्रे तयार आहेत. तर, वीस हजार पाचशे अण्वास्त्रांचा साठा असतानाही प्रत्येक अण्वस्त्रधारी देश अस्त्रांचा साठा वाढविण्याचाच प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे जग अण्वस्त्रविरहित होईल, अशी अजिबात शक्यता नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे.स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट- एसआयपीआरआय) याबाबत अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून त्यात म्हटले आहे की, 'सध्य स्थितीत जगात ५...
  June 7, 05:05 PM
 • स्टॉकहोम- जगभरात सध्य स्थितीला पाच हजारांपेक्षा जास्त अण्वस्त्रे तयार आहेत. तर, वीस हजार पाचशे अण्वास्त्रांचा साठा असतानाही प्रत्येक अण्वस्त्रधारी देश अस्त्रांचा साठा वाढविण्याचाच प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे जग अण्वस्त्रविरहित होईल, अशी अजिबात शक्यता नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे.स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट- एसआयपीआरआय) याबाबत अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून त्यात म्हटले आहे की, 'सध्य स्थितीत जगात ५...
  June 7, 04:48 PM
 • लंडन- दा विंची कोड या गाजलेल्या कादंवरीचे जगविख्यात लेखक डॉन ब्राऊन यांच्या अनेक कादंबर्यांमध्ये सामूहिक विनाशाचे शस्त्र म्हणून उल्लेख झालेले रहस्यमय अँटिमीटर साठवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.सर्न येथे महाकाय हैड्रोजन कोलाईडरवर प्रयोग करीत असलेल्या शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी काही सेकंदांसाठी अँटिमीटर साठवून (सेव्ह)ठेवण्यात यश मिळविले होते. आता त्यांनी हे अँटिमीटर तब्बल 16 मिनिटांपर्यंत साठवण्यात यश संपादन केले आहे. हा कालावधी मागच्यापेक्षा 5000 पटीने अधिक आहे. अँटिमीटर...
  June 7, 06:07 AM
 • लंडन- सार्वजनिक ठिकाणे किंवा युद्धभूमीवरील दहशतवाद आता थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचला आहे. अन्न जैव दहशतवादाने ब्रिटन सध्या धास्तावले आहे. अल-कायदा ही दहशतवादी संघटना आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी खाद्यपदार्थांतून विष मिसळवू शकते. यामुळेच खाद्य उत्पादक, विक्रेते यांना सतर्कता बाळगण्याचा इशारा ब्रिटनच्या सरकारने दिला आहे.दहशतवाद्यांनी विषाणूचा वापर केल्यानंतर आता खाद्यपदार्थांतून दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यता ब्रिटिश अधिकार्यांनी व्यक्त केली...
  June 7, 05:59 AM
 • पॅरिस- फ्रान्समध्ये आता टीव्हीवरील कार्यक्रमात फेसबुक, ट्विटरची नावे घेता येणार नाहीत. तसे फर्मानच फ्रान्सच्या सरकारने काढले आहे. एवढेच नव्हे तर रेडिओवरदेखील याचा उच्चार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. खासगी व्यावसायिक कंपन्यांचे नाव बातम्या किंवा इतर कार्यक्रमांतून घ्यायचे नाही, असा एक नियम १९९२ मध्ये तयार करण्यात आला आहे. १९९२ च्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, असा विचार सरकार करीत आहे, असे फ्रान्सच्या दृकश्राव्य प्रसारण मंडळाचे नियंत्रक खात्याचे प्रवक्ते ख्रिस्टन केली...
  June 7, 05:49 AM
 • शिकागो- मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीने आपला बालमित्र व या प्रकरणातील सहआरोपी तहव्वूर राणा याना पुन्हा पाकिस्तानात जाता यावे म्हणून आयसएसआय अधिकार्यांची मदत मागितली होती. पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून राणाची नेमणूक करण्यात आली. मात्र तो नियोजित ठिकाणी पोहोचलाच नाही. कालांतराने त्याला फरारी घोषित करण्यात आले. नंतरच्या काळात राणा पाकिस्तानात गेलाच नाही. ही माहिती येथील न्यायालयीन कामकाजाच्या चित्रीकरणातून स्पष्ट झाली आहे.
  June 7, 03:35 AM
 • रोम- इटलीचे पंतप्रधान बर्लुस्कोनी हे सेक्स स्कॅंडलमध्ये अडकल्यानंतरही सेक्स पार्टीत सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन वेश्येसोबत संबंध ठेवल्याचे सिध्द झाल्यानंतर त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र तरीही ते बुंगा-बुंगा पार्टी आयोजित करीत असल्याचे म्हटले आहे. बुंगा-बुंगा पार्टी म्हणजे रात्री जेवणानंतर (डिनर) खेळली जात असलेली सेक्स गेम होय. याबाबतचा खुलासा टेलीग्राफ या दैनिकाने केला आहे. टेलीग्राफने म्हटले आहे की, पंतप्रधान बर्लुस्कोनी यांनी मिलान...
  June 6, 06:39 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात