Home >> International >> Other Country

Other Country News

 • विलिट्स (अमेरिका) - अमेरिकेत एका महिलेला तिच्या मुलाच्या हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. उत्तर कॅलिफोर्नियातील 23 वर्षांची अॅलेक्झांड्रा रावेन स्कॉट ही आई तिच्या 18 महिन्यांच्या मुलाला कारमध्ये विसरली होती. 10 तासांनंतर जेव्हा ती परतली तेव्हा चिमुकल्याचा 65 डिग्री तापमानात होरपळून मृत्यू झालेला होता. महिला आपल्या मित्राच्या घरी पार्टीला गेली होती, गाडी पार्क केल्यानंतर ती बाळाला कारमध्येच विसरून गाडी लॉक करुन निघून गेली होती. बॅकसीटवर झोपलेले बाळ तिथेच सोडून गेली होती... -...
  06:38 PM
 • न्यूयॉर्क - अमेरिकेतील कोलोरॅडो प्रांतात प्रशासनाकडून चुकून एक कैदी जेम्स रेनर्सन (38) ची सुटका करण्यात आली. त्याने खुश होऊन थेट घर गाठले. परंतु, अवघ्या दोन तासांत जेम्सची पत्नी त्याला टॅक्सीने तुरुंगात घेऊन पोहोचली. जेम्स रेनर्सनवर धमकावणे आणि कायदा मोडल्या प्रकरणी खटला सुरू आहे. आता या प्रकरणानंतर जेम्स विरोधात तुरुंगातून पळून जाणे आणि फसवणूक असे आणखी दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. माहिती अपडेट नाही केल्याने घोळ द ग्रॅन्ड जंक्शन डेली सेंटीनलच्या एका वृत्तानुसार, कागदपत्रांमध्ये...
  05:55 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - दुबईतील शिख उद्योजक एसपी सिंग ओबेरॉय यांनी 15 भारतीयांना फाशीपासून वाचवले आहे. या सर्वांच्या विरोधात दारुचा व्यापार आणि हत्येचे आरोप लावले होते. त्याच प्रकरणी यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. त्या सर्वांची सुटका या उद्योजकाने ब्लडमनी देऊन केली आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये ब्लडमनी दिल्यानंतर सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात सुनावलेली शिक्षा रद्द केली जाऊ शकते. यात मृतांच्या किंवा पीडितांच्या कुटुंबियांना ठराविक अशी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. सुटका...
  04:39 PM
 • वॉशिंग्टन - अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझिटेंटिव्हच्या निवडणुकीसाठी भारतीय वंशांच्या अरुणा मिलर (53) मैदानात आहेत. मेरीलँड मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्या इच्छूक आहेत. 26 जून रोजी येथे प्रायमरी इलेक्शन होणार आहे. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी या आपल्याच पक्षाच्या डेव्हिड ट्रोन यांना त्या आव्हान देणार आहेत. या प्रायमरी इलेक्शनमध्ये अरुणा विजयी झाल्या तर त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळेल आणि हाऊस ऑफ रिप्रेझिटेंटिव्हसाठी त्या मेरीलँड येथून निवडणूक लढवतील....
  04:22 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - थायलंडमध्ये काढलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही किशोरवयीन मुले अजगराशी झुंज देताना दिसून येत आहेत. प्रत्यक्षात, या अजगराने एका बेवारस श्वानाला आपल्या विळख्यात घेऊन खाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ही मुले अजगराशी जाऊन भिडली. अखेर या संघर्षात या हट्टी मुलांचा विजय झाला आणि अजगर त्या श्वानाला सोडून पळाला. काय आहे व्हिडिओमध्ये..? - व्हिडिओमध्ये एक कुत्र्याला विशालकाय अजगराने अतिशय घट्ट असे धरले आहे. त्याचवेळी स्थानिक मुले त्या अजगराला...
  04:06 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - कुठल्याही प्रोफेशनलची मदत न घेता स्वतःच्या सुविधेसाठी करण्यात आलेली युक्ती अर्थातच जुगाड... भारतच नव्हे, तर जगभरात असले जुगाड केले जातात. मग, त्यात पैसा वेळ आणि श्रम सुद्धा वाया जात नाही. काही लोक तर फक्त आळस म्हणून असले पराक्रम करत राहतात. अशाच लोकांचे काही निवडक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. यात प्रत्येक फोटो पाहून त्यांच्या भन्नाट डोक्यातून सुचलेल्या या युक्त्यांना सलाम करावासा वाटतो. मग, तो टॉयलेट सीटच्या झाकणाला गळ्यात घेऊन वाकण्यापासून वाचणारा असो वा दोन...
  02:55 PM
 • पॅरिस/रियाद - सौदी अरबमध्ये महिलांच्या ड्रायव्हींगवरील निर्बंध उठली आहे. त्यानंतर असील अल हमद ही फॉर्म्युला वन कार चालणारी सौदीची पहिली महिला बनली आहे. त्यांनी फ्रेंच ग्रां प्री पूर्वी ले कास्टेलेट सर्किटवर कार चालवली. एफ वन टीम रेनॉने त्यांना ही संधी दिली. असील रेनॉ टीमच्या पॅशन परेडमध्ये आहे. सौदी अरबची मोटर स्पोर्ट्समधील पहिली महिला सदस्य असलेल्या असीलने याठिकाणी चालवलेल्या कारनेच 2012 मध्ये अबू धाबीमध्ये किमी राइकोनेनने विजय मिळवला होता. पुढे पाहा, असीलच्या या अनुभवाचे काही PHOTOS...
  01:58 PM
 • अंकारा - तुर्कीचे सर्वात शक्तीशाली नेते रिसेप तेय्यिब एर्दोगान पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. निवडणुकीत 4 प्रमुख उमेदवार असताना सुद्धा त्यांना एकट्याला तब्बल 52.5 टक्के मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 87 टक्के मतदान झाले आहे. एरदोगान गेल्या 15 वर्षांपासून पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष अशा पदांवर सत्ता भोगत आहेत. त्यांच्या पुन्हा सत्तेवर येताच त्यांनी तयार केलेली देशाची नवीन राज्यघटना अंमलात येणार आहे. त्यानुसार, एक राष्ट्राध्यक्ष म्हणून...
  12:48 PM
 • लंडन - पंजाब नॅशनल बँकेला 13,600 कोटींचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी लंडनमध्येच राहतो आहे. त्याने आपल्या लंडनच्या ज्वेलरी शॉपवर असलेल्या एका फ्लॅटला घर केले आहे. द संडे टाइम्सच्या एका वृत्तानुसार, भारताने नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्याचा दावा केला. तरीही तो 4 वेळा ब्रिटनमधून बाहेर जाऊन आला आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत. सीबीआयने इंटरपोलला नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याचे अपील सुद्धा केले आहे. द संडे...
  12:04 PM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेत एका हॉटेलने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्या सारा सॅन्डर्स यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्रम्प यांच्या प्रवक्त्या असल्यानेच आपल्यावर ही कारवाई करण्यात आली अशी तक्रार सॅन्डर्स यांनी केली आहे. परंतु, त्यांनी तक्रारीचे ट्वीट आपल्या खासगी नव्हे, तर चक्क अधिकृत प्रेस सेक्रेटरी या ट्विटर अकाउंटवरून केले आहे. त्यामुळे, हॉटेलने जे काही केले ते बाजूलाच राहिले. तसेच सॅन्डर्स यांना अधिकृत ट्विटर अकाउंटचा खासगी वापर करता येणार नाही असा वाद सुरू झाला....
  11:30 AM
 • रियाध - सौदी अरबची राजधानी रियाधवर रविवारी रात्री उशिरा येमेनच्या हौती बंडखोरांनी हल्ला चढवला. सौदी अरबच्या नेतृत्वातील आघाडी सैन्याने दावा केला की, सैन्याने दावा केला की, बंडखोरांनी दोन बॅलेस्टिक मिसाइल्स डागल्या होत्या, ज्या हवेतल्या हवेतच उडवण्यात आल्या आहेत. या हल्ल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु स्थानिक मीडियाचे म्हणणे आहे की, रियाधमध्ये कमीत कमी सहा जोरदार धमाके झाले. आकाशात मोठा प्रकाश पाहण्यात आला. नंतर शहरात धूर पसरला. सौदी अरबची न्यूज एजन्सी एसपीएने सांगितले...
  10:32 AM
 • जेरुसलेम- मध्य-पूर्वेतील इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात नजीकच्या काळात मैत्रीपूर्ण संबंध दिसल्यास आश्चर्य वाटू नये. कारण उभय देशांतील शत्रुत्व दूर करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार तथा जावई जेरड कुश्नेर यांनी दर्शवली आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महंमद अब्बास तयार असल्यास त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अब्बास सोबत काम करण्यास तयार असल्यास मला काहीही अडचण नाही, असे त्यांनी...
  08:51 AM
 • रियाध- सौदी अरेबियात रविवारच्या रात्रीचे दृश्य एकदम निराळे होते. येथे मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करत होत्या. रात्री १२ वाजता मोठ्या संख्येने महिला गाडी चालवत रस्त्यावर उतरल्या. रस्त्यात लोकांनी शुभेच्छाही दिल्या. बॅरियर व तपास नाक्यावर पोलिस चालक महिलांना पुष्पगुच्छ देत होते. याआधी वाहन चालवणाऱ्या महिलांना तुरुंगात पाठवले जात होते. महिलांशी अतिरेक्यांसारखी वागणूक दिली जात होती. सौदी अरेबियामध्ये २४ जून म्हणजे रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. या दिवशी महिलांना...
  07:50 AM
 • टोक्यो - जगभरातील कंपन्या आपले प्रॉडक्ट खराब असल्याच्या तक्रारींमुळे ते ग्राहकांकडून परत मागवतात. परंतु, एक असाही प्रसंग आला जेव्हा एका कंपनीने आपल्या ग्राहकांना प्रॉडक्टमध्ये इतके आधुनिक तंत्रज्ञान दिले होते, की कंपनीला ते विकल्यानंतर परत मागवावे लागले होते. 1998 मध्ये जपानच्या सोनी कंपनीला आपले एक कॅमकार्डर (हॅन्डीकॅम व्हिडिओ कॅमेरा) मार्केटमधून परत मागवावे लागले होते. कारण, त्या कॅमेऱ्यात वादग्रस्त नाइटव्हिजन इन्फ्रारेड तंत्रज्ञान होते. या फीचरने हॅन्डीकॅम 717 सिरीजचे कॅम...
  June 24, 02:43 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत रेप आणि हत्येचे 32 वर्षे जुने प्रकरण सोडवण्यात एका नॅपकिनची मदत झाली. या नॅपकिनमुळेच पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. 66 वर्षांच्या आरोपी गॅरे चार्ल्स हार्टमॅनला अटक झाली आहे. त्याच्यावर 12 वर्षांची मुलगी मिशेल वेल्चवर बलात्कार आणि तिच्या हत्येचा आरोप आहे. वॉशिंग्टन पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. असा लागला छडा.. - ही घटना वॉशिंग्टनमधील ताकोमामधील आहे. येथे 26 मार्च 1986 ला मिशेल आणि त्याच्या दोन लहान बहिणी पार्कमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी मिशेलच्या बहिणी...
  June 24, 11:31 AM
 • - खोबर सिटीमध्ये मैत्रीणीबरोबर ड्रायव्हींगची मान्यता मिळाल्याचा आनंद साजरा करणारी महिला. - मानवाधिकार कार्यकर्ते अनेक वर्षांपासून सौदीत महिलांना ड्रायव्हींगची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. रियाद - सौदी अरबमध्ये महिलांना ड्रायव्हींगसाठी लावण्यात आलेले निर्बंध रविवारपासून हटवण्यात आले. आता महिला अधिकृतपणे रस्त्यांवर कार चालवू शकतील. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशाने सौदी सरकारने याची घोषणा केली होती. याच महिन्यात महिलांना...
  June 24, 10:05 AM
 • जगभरात बलात्काराचे असंख्य प्रकरणे घडतात, परंतु प्रत्येक वेळी त्याला वाचा फुटतेच असे नाही. प्रकरण पोलिसांत जाते, कारवाईची जीवघेणी प्रक्रिया होते. नंतर खटला, मग निकाल. न्याय मिळाला तरी पीडितेच्या जखमा मिटतातच असे नाही. त्या आयुष्यभर दुखत राहतात. वेळोवेळी त्या डोके वर काढतात आणि जगणं नकोसं करून टाकतात. अन्यायाला वाचा फोडण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. काही धीटपणे पुढे येतात, तर काही आतल्या आत कुढत जगतात. असाच काहीसा मार्ग एका अज्ञात तरुणीने स्वीकारला आहे. तिने यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून...
  June 24, 12:01 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - एका सामान्य माणसाने रेस्टॉरंटमध्ये सहज टेबल बुक करण्यासाठी चक्क आपण मोरॉक्कोचे पंतप्रधान बोलत आहोत असा दावा केला. रेस्टॉरंटच्या मालक आणि कर्मचाऱ्यांना या देशाचा पंतप्रधान सुद्धा माहिती नव्हता. त्यांनी त्या माणसाचा दावा खराच मानला. तसेच हॉटेलात बोलावून चक्क व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. सगळेच कर्मचारी आपल्या कथित पंतप्रधानाच्या सेवेत मशगूल झाले. त्या सर्वांनीच त्या माणसासोबत एक फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी सुद्धा केली. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका...
  June 23, 07:23 PM
 • इंटरनॅशनल डेस्क/लीड्स - इंग्लंडमध्ये एका महिलेने वनजात मुलीचा मृतदेह घरातील कपाटात 14 वर्षे लपवून ठेवल्याचे समोर आले. त्याचा खुलासा महिलेने स्वतः कोर्टात केला. ही महिला दोन वर्षांपूर्वी मुलाला उपाशी ठेवून मारल्या प्रकरणी आरोपी आहे. मुलीला दफन करू शकली नाही 45 वर्षीय डॉन क्रॅन्सटनने कोर्टात म्हटले 2002 मध्ये लीड्स शहरात मला घरीत लेबर पेन झाले. त्यानंतर अर्धा तासातच मी मुलीला जन्म दिला. पण ती जीवंत नव्हती. मसा या प्रेग्नंसीबाबत आधीपासून माहिती नव्हते. ते कोणाला समजू नये असेच मला वाटत होते....
  June 23, 06:14 PM
 • न्यूज डेस्क - प्रसिद्ध अमेरिकी फूड चेन बर्गर किंगने एक अतिशय संतापजनक जाहिरात केली आहे. त्यावर आता कंपनीला माफीही मागावी लागली आहे. रशियात सध्या फुटबॉल वर्ल्ड कप सुरू आहे. तेथे बर्गर किंगने ऑफर दिली की, जर एखादी तरुणी वर्ल्ड कपमध्ये खेळत असलेल्या एखाद्या फुटबॉलपटूपासून प्रेग्नंट झाली, तर तिला 3 मिलियन रुबल (रशियन चलन) म्हणजेच जवळपास 32 लाख रुपये दिले जातील. शिवाय त्यांना आयुष्यभरासाठी बर्गर किंगमध्ये फुकट जेवणही मिळेल. बर्गर किंगने मागितली जाहीर माफी ही जाहिरात रशियन सोशल मीडिया साइट...
  June 23, 06:02 PM
 
जाहिरात

RECOMMENDED