जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद - जगातील सर्वात कुख्यात दहशतवाद्यांपैकी एक आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या लाहोर येथील गुजरानवाला येथे जात असताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, हाफिजला बुधवारी अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर हाफिजची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिजला अटक म्हणजे, पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर केवळ ढोंग असेही म्हटले जात आहे. भारत आणि...
  July 17, 01:10 PM
 • इस्लामाबाद -आधीच गंभीर आर्थिक संकटाचा मुकाबला करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेच्या लवादाने खाणपट्टा प्रकरणात दाेषी ठरवताना ५.९७ अब्ज डाॅलर्सचा दंड ठाेठावला आहे. पाकिस्तानची करार नाकारण्याची कृती बेकायदा असल्याचे लवादाने स्पष्ट केले आहे. या निवाड्यामुळे इम्रान खान सरकार आणखीच हादरले आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रेकाे डिक भागातील खाणीच्या उत्खननासंबंधीचे हक्क करणारा करार झाला हाेता. टिथान काॅपर कंपनी (टीसीसी), अँटाेफागास्टा व कॅनडाची बॅरिक गाेल्ड काॅर्पाेरेशन या...
  July 15, 10:13 AM
 • कराची - पाकिस्तानात एका खासगी न्यूज चॅनलच्या अँकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुरीद अब्बास असे या अँकरचे नाव असून तो कराची येथे बोल न्यूज चॅनलसाठी काम करत होता. खैबन-ए-बुखारी परिसरात मंगळवारी त्याचा एका व्यक्तीशी वाद झाला. यानंतर त्या व्यक्तीने मुरीदवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत मुरीदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा जीव वाचवता आला नाही. यावेळी हल्लेखोराने स्वतःवर देखील गोळी झाडली असून तो सध्या गंभीर आहे. पोलिसांनी सांगितले, की आरोपीचे नाव आतिफ झमा...
  July 10, 12:26 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानी पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात सुद्धा देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशात पैसे वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एक नवीनच शक्कल लढवली. त्यानुसार, ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर ते हॉटेलात थांबणार नाहीत. अमेरिकेतील हॉटेलचा खर्च पाकिस्तान सरकार पूर्ण करू शकणार नाही. अशात पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूताच्या शासकीय निवास स्थानी थांबण्याचा प्रस्ताव दिला आहे. येत्या 21 जून रोजी इम्रान खान तीन...
  July 8, 03:57 PM
 • अमृतसर- पाकिस्तान सरकारने गुरुद्वारा बाबे की बेरनंतर आता सियालकोटमधील 1000 वर्षे जुन्या शिवाला तेजा सिंह मंदिरला उघडले आहे. यासोबत पाकिस्तानने गुरुद्वारा साहिब आणि शिवालाला कायम उघडे ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच हे मंदिर भारतीय वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना असल्याने मंदिराच्या जिर्णोधाराचे कामही होईल असे सांगितले. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर या मंदिराला पाडण्यात आले होते 1947 मध्ये देशाची विभागणी झाल्यावर शिवालाला बंद करण्यात आले होते. तेव्हा हिंदूंनी ती जागा सोडल्यामुळे हे मंदिर...
  July 4, 04:13 PM
 • लाहोर - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदविरोधात पाकिस्तानात खटला दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने 3 शहरांत हाफिज आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध 23 एफआयआर दाखल करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादविरोधात प्रबळ कारवाई केली नाही तर निर्बंध लावू असा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या...
  July 4, 12:30 PM
 • कराची -कराचीच्या कस्टम हाऊससमाेरील चौकात दर रविवारी सकाळी ६ वाजता ३०-४० मुली सायकली चालवतात. ल्यारीतील अरुंद रस्त्यांवर त्या एवढ्या आत्मविश्वासाने सायकल चालवत असतात की, पाहणारे पाहतच राहतात. सुमारे दाेन तास त्या हेल्मेटखाली स्कार्फ घालून अशा प्रकारे आनंद लुटून घरी परततात. कराचीत असे १५ सायकलिंग ग्रुप बनवण्यात आले असून, ते मुलींना मुक्तपणे फिरण्यासह जीवन आनंदी करण्यास मदत करतात. या तरुणींच्या इन्स्ट्रक्टर झुलेखा दाऊद यांनी दिलेल्या माहितीनुसार कराचीच्या सर्वात जुन्या भागांपैकी...
  July 1, 10:40 AM
 • इस्लामाबाद -अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता चर्चेतील सातवी फेरी निर्णायक असेल, अशी प्रतिक्रिया तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी रविवारी व्यक्त केली. अमेरिकेचे शांतता प्रक्रियेतील दूत झाल्मे खालिजाद यांच्याशी तालिबानची कतारमध्ये शांतता चर्चा सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कतार येथे तालिबानचे राजकीय कार्यालय आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना शाहीन म्हणाले की, अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो संघटनेचे २० हजार सैनिक माघारी...
  July 1, 09:53 AM
 • लाहोर(पाकिस्तान)- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विशेष सहकारी नईम उल हकने सचिन तेंडुलकरचा फोटो पोस्ट केल्यामुळे नेटकऱ्यांच्या निशान्यावर आले. झाले असे की, नईम उल हकने ट्विटरवर तेंडुलकरच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आणि त्यासोबत कॅप्शन लिहीले, इमरान खान, 1969. PM Imran Khan 1969 pic.twitter.com/uiivAOfszs Naeem ul Haque (@naeemul_haque) June 21, 2019 Inzamam-ul-Haq 1976 pic.twitter.com/uGBVbplnlP Krishna (@Atheist_Krishna) June 22, 2019 नईमने जसा फोटो ट्वीट केला, ते ट्विटर यूझर्सच्या निशान्यावर आले. एका यूझरने विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहीले, इंजमाम उल...
  June 23, 02:54 PM
 • पेशावर - पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्य सरकारच्या पत्रकार परिषदेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटने पत्रकार परिषद फेसबूकवर लाइव्ह करण्याचा निर्णय घेतला. आणि यातच संपूर्ण गोंधळ उडाला. फेसबूक लाइव्हवर त्यांची पत्रकार परिषद तर दिसली. पण, चुकून कॅट फिल्टर ऑनच होता. त्यामुळे, त्यांची ही प्रेस कॉन्फ्रेंस सोशल मीडियावर गंमतीचा विषय बनली आहे. अचानक पाकिस्तानचे मंत्री मांजर कसे बनले असा सवाल यूजर्स करत आहेत. विषय तर होता खैबर प्रांताच्या कॅबिनेट घेतलेल्या महत्वाच्या...
  June 15, 04:46 PM
 • इस्लामाबाद - आर्थिक संकटाला ताेंड देत असलेल्या पाकिस्तानातील नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २०१९-२० वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी सत्तेवर आल्यानंतर इम्रान खान यांच्या अर्थसंकल्पातील करवाढीच्या प्रस्तावामुळे तेल, तूप, साखर या जीवनावश्यक वस्तूंबराेबरच सिगारेट, सिमेंट, माेटार, साेने आणि चांदी महाग हाेण्याची शक्यता आहे. जुलैपासून या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी हाेणार आहे. गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या इम्रान खानच्या...
  June 13, 12:30 PM
 • इस्लामाबाद(पाकिस्तान)- भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. भारतीयांच्या मौका-मौका जाहिरातीने पाकिस्तानची सोशल मीडियावर चांगलीच नाचक्की केली. त्याला उत्तर देताना पाकिस्तानने भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या त्या व्हिडीओचा गैरवापर करुन नवीन जाहिरात तयार केली आहे. अभिनंदन यांच्या शौर्याचा पाकिस्तानने अपमान केल्याचा आरोप करत भारतीयांकडून पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेण्यात येत आहे....
  June 11, 07:02 PM
 • लाहोर / नवी दिल्ली - शांघाय समिटमध्ये सामिल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र आता पाकिस्तानमार्गे किर्गिस्तानला जाणार आहेत. पाकिस्तान सरकारने सोमवारी भारताचे अपील मंजूर केले. तसेच पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यास मंजुरी दिली. पीएम मोदी 13-14 जून रोजी एससीओ समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या संमेलनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित राहणार आहेत. भारताने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बाळाकोट येथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या एअर...
  June 11, 12:20 PM
 • इस्लामाबाद(पाकिस्तान)- माजी राष्ट्रपती आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारींना बनावट बँक खातेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने याआधीच झरदारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर काही तासातच नॅशनल अकाऊंटीबिलीटी ब्युरो म्हणजेच एनएबीकडून झरदारी यांना अटक करण्यात आली. एनएबीच्या 15 सदस्यीय टीमने ही कारवाई केली. पीपीपीचे अध्यक्ष आणि झरदारी यांचे चिरंजीव बिलावल भुट्टो यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानमधील डॉन...
  June 10, 08:17 PM
 • इस्लामाबाद(पाकिस्तान)- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहीले आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या मीडियामध्ये बातम्या आल्या की, इम्रान खान यांना मोदींसोबत काश्मीर मुद्दसहित इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवरील असलेले वाद सोडवण्यासाठी चर्चा करायची आहे. या दरम्यान, सरकारी सूत्रांनी सांगितले की, इम्रान यांनी मोदींना विजय मिळाल्यामुळे अभिनंदन केले आहे. इम्रान यांनी अनेकवेळा भारतसोबत चर्चा करण्यासाठी आपला प्रस्ताव मांडला आहे, पण भारत आपल्या...
  June 8, 03:31 PM
 • दुबई -पाकिस्तानातील सिंध प्रांतात थारपरकर जिल्ह्यात काही भाग अत्यंत गरीब आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. भूकबळीसारखी परिस्थिती उद्भवलेली आहे. लोकांनी आम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढा, अशा विनवण्या केल्या आहेत. ही परिस्थिती पाहून दुबईतील एका भारतीय व्यावसायिक जोगिंदरसिंग सलारिया यांनी एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत मदत पाठवली आहे. त्यांनी थारपरकर जिल्ह्यातील गरीब भागात ६४ हातपंप बसवले आहेत. तसेच गरजूंसाठी धान्यही पाठवले आहे. जोगिंदरसिंग सलारिया १९९३ पासून दुबईत...
  June 8, 10:53 AM
 • पेशावर(पाकिस्तान)- पंतप्रधान इम्रान खान यांना ईदच्या दिवशी भेट देण्यासाठी एका शू मेकरने चक्क अजगराच्या चमड्यापासून तयार केलेली सँडल बनवली, पण इम्रान यांना देण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खैबर पख्तूनख्वा वन्यजीव विभागच्या अधिकाऱ्यांनी पेशावरच्या जहांगीरपुरा बाजारातील शू मेकर नूरुद्दीनच्या दुकानावर छापा मारून सँडल जप्त केली. विभागाने वाइल्ड लाइफ अॅक्ट अंतर्गत कारवाई करून 50 हजारांचा दंडदेखील लावला आहे. नूरुद्दीनने मीडियाला सांगितले की, दंड भरल्यानंतर आता मला सँडल...
  June 5, 05:16 PM
 • इस्लामाबाद -दक्षिण आशिया विभागीय सहकार्य संघटनेच्या (सार्क) शिखर परिषदेसाठी खरेदी केलेल्या वाहनांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात कैद असलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची चौकशी करण्यास पाकिस्तानच्या न्यायालयाने नॅशनल अकाउंटिबिलिटी शाखेला (एनएबी)परवानगी दिली आहे. नॅशनल अकाउंटिबिलिटी न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद मलिक यांनी एनएबीला लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात असलेले शरीफ यांची चौकशी करण्याची परवानगी मंगळवारी दिली. एनएबी ही संस्था भ्रष्टाचारावर निगराणी ठेवते. या...
  May 23, 10:36 AM
 • कराची(पाकिस्तान)- वाढत्या महागाईचा पाकिस्तानला चांगलाच फटका बसला आहे. इमरान सरकार महागाई आणि रूपयांची घसरण थांबवण्यात अपयशी ठरल्यामुळे नागरिकांना खूप अडचनींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या महागाईचा परिणाम एवढा झाला आहे की, पाकिस्तानात दुध 190 रुपये लीटरने विक्री होत असून सफरचंद 400 रुपये किलो, संतरी 360 रुपये, केळी 150 रुपये डझन, आणि मटन 1100 रूपये किलो या दराने विक्री होत आहे. रमजानमुळे वाढली महागाई रमजान महिन्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींची अधिक मागणी असल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा...
  May 21, 02:35 PM
 • कराची - पाकिस्तान सरकाने पंजाब राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेेतला आहे. पंजाबमधून दक्षिण पंजाब नवीन राज्य हाेणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दिली. यासंदर्भात संसदेत विधेयक आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुरैशी यांनी सांगितले की, नवीन राज्याच्या निर्मितीसाठी विराेधी पक्ष पीपीपी व पीएमएल (एन)कडून पाठिंबा मागितला आहे. क्षेत्रफळानुसार बलुचिस्ताननंतर पंजाब पाकिस्तानमधील सर्वात माेठे दुसरे राज्य आहे. या राज्याची लाेकसंख्या सर्वात जास्त आहे....
  May 17, 10:23 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात