जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • वॉशिंग्टन- अमेरिकेने पाकिस्तानवर पुन्हा एकदा दबाव वाढवत आयएसआयचे तालिबानच्या हक्कानी नेटवर्कशी असलेले संबंध तोडा, अशी धमकी दिली आहे. याचबरोबर त्यांनी हक्कानी नेटवर्कविरोधात तत्काळ कारवाई करावी, असेही अमेरिकेने म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या धोरणावर याचा परिणाम होणार नाही तसेच दोन्ही देशांचे संबंध चांगले राहतील, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे. तसेच दोन्ही देशांसाठी चर्चेची दारे उघडी असल्याचे म्हटले आहे.कॅप्टन जॉन किर्बी यांनी म्हटले आहे की, ओबामा प्रशासनला असे वाटते...
  September 25, 04:24 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय व हक्कानी दहशतवादी संघटनेचे कोणतेही संबंध नसून, अमेरिकेने केलेले आरोप खोटे असून ते दुर्दैवी असल्याचे मत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कयानी यांनी व्यक्त केले आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नसून जर असे काही पुरावे असतील तर अमेरिकेने सादर करावेत, असेही त्यांनी अमेरिकेला एक प्रकारे आव्हान दिले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यापासून या दोन देशातील संबंध बिघडत चालले असून, याला रोज वेगवेगळी किनार मिळत चालली आहे.अफागाणिस्तानमधील...
  September 24, 07:07 PM
 • न्यूयॉर्क- संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत पाकिस्तानचे प्रतिनिधी अब्दुला हुसैन हारुन यांनी खुले आव्हान दिले आहे की, जर अमेरिका पाकिस्तानच्या बाबतीत कडक धोरण अंवलबिणार असेल तर त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. तसेच ते म्हणतात, पाकिस्तानविरुध्द कारवाई करण्यापूर्वी त्यांनी १९७०च्या कालखंडातील व्हिएतनाम युध्द आठवावे.एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना हारुन यांनी सांगितले की, प्रत्येक घटनेबाबत चर्चा होऊ शकती व त्यावर तोडगाही काढला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर, स्तरावर...
  September 24, 05:27 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री हिना रब्बानी खार अमेरिकेमध्ये जाऊनच तेथील सरकारला लक्ष्य केले आहे. जर तुम्ही पाकिस्तानवरील टीका थांबवली नाही, तर पाकिस्तानला अमेरिकेसोबतची मैत्री तोडावी लागले, असे त्यांनी म्हटले आहे.रब्बानी म्हणाल्या, दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये गंभीर समस्या आहेत. परंतु, एक दुस-याकडे बोट दाखून कोणातरी एकाला बळीचा बकरा बनवणे योग्य नाही, तसे केल्याने काहीही हाशील होणार नाही. आम्ही पाकिस्तानला एक परिपक्व देश...
  September 23, 01:25 PM
 • इस्लामाबाद। पाकिस्तानातील उत्तर-पश्चिमेतील बजौर आदिवासी भागात गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 5 ठार तर 4 जखमी झाले. सिंध प्रांतातील अन्य एका घटनेत पूरग्रस्त भागात बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. त्यात दोन मुलांचा बळी गेला. नऊ जखमी झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पहिल्या घटनेत अफगाणिस्तान सीमेजवळ प्रवासी वाहून नेणा-या पिक-अप ट्रकला रिमोट कंट्रोलच्या साह्याने उडविण्यात आले. ही घटना चामकांड भागात घडली. त्यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे टीव्ही वाहिन्यांच्या वृत्तात म्हटले आहे. चार...
  September 22, 11:19 PM
 • भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारून भारताचा लौकिक जगभरात पोहोचवणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाकिस्ताननेही तेथील भ्रष्टाचार मिटविण्याच्या चळवळीला पाठबळ देण्यासाठी आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे. विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या शिष्टमंडळाने बुधवारी राळेगण सिद्धीत येऊन अण्णांशी तब्बल 40 मिनिटे चर्चा केली. त्यांनी दिलेले पाकिस्तानभेटीचे निमंत्रणही अण्णांनी स्वीकारले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नासीर असलम झहीर, कामगार...
  September 22, 05:55 AM
 • इस्लामाबाद - राजकीय नेतृत्वाच्या अपयशामुळे पाकिस्तानची वाटचाल अराजकाच्या दिशेने झपाट्याने होत चालली आहे. देशाला सावरण्यासाठी लष्करी बंड अपरिहार्य असल्याची पाकिस्तानी लष्करातील काही वरिष्ठ अधिका-यांची भावना झाली आहे. 8 सप्टेंबर रोजी रावळपिंडीमध्ये झालेल्या कॉर्प्स कमांडर्सच्या बैठकीत त्यांनी उघडपणे बंडाची भाषा वापरली. मात्र, लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेज कयानी यांनी संयम ठेवण्यास सांगितल्याने तूर्तास बंडोबा थंडोबा झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची सूत्रे लष्कराने हाती घ्यावी,...
  September 22, 02:43 AM
 • इस्लामाबाद । लष्कर-ए-झांगवी या दहशतवादी संघटनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात बंदुकधा-यांनी 26 शिया भाविकांना बसमधून उतरावून गोळ्या घातल्या. मस्तंग जिल्ह्यात ही घटना घडली. सहा जण गंभीर जखमी आहेत. या हत्याकांडाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. राजधानी क्वेटाहून भाविकांना घेऊन जाणारी ही बस सीमा भागातील तफतान शहराकडे जात होती. येथून हे भाविक इराणला रवाना होणार होते. मस्तंगमध्ये मोटारसायकलवर आलेल्या चार बंदुकधा-यांनी बस थांबवली आणि...
  September 21, 02:36 AM
 • लाहोर- फेसबुकसह अन्य काही वेबसाइट्स धार्मिक तिरस्कार पसरवण्याचे काम करीत असून त्यांचा अॅक्सेस बंद करण्याचे आदेश पाकिस्तानमधील लाहोर न्यायालयाने दिल्ली प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात फेसबुकसह इतर काही वेबसाइट्सविरोधात तक्रारी आल्या असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सोमवारी देशाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला ही सूचना करतानाच गुगलवर बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायाधीश शेख अझमत सईद यांनी हा निकाल देताना देशात सध्या असलेल्या...
  September 21, 12:23 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि राजकीय नेता इम्रान खान यांनी सध्याचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांना नपुंसक म्हणत ते कठपुतळी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेसाठी काहीही केले नसल्याचा आरोप केला आहे. याउलट अमेरिका अनेक लोकांना मारण्याची योजना तयार करत असताना दहशतवादावर केलेल्या उपायांवर काहीही फरक पडू शकला नाही. उलट पाकिस्तान देश अमेरिकेच्या या उपायामुळे बरबाद होत चालला आहे. त्यामुळेच पाकिस्तानने दहशतवादाच्या विरोदात लढायचे ठरविले...
  September 20, 12:30 PM
 • इस्लामाबाद - सिंध प्रांतात आलेल्या पुरामुळे पाकिस्तान भारताकडून भाज्यांची आयात करण्याची शक्यता आहे. कराचीतील वेलफेयर असोसिएशन ऑफ होलसेल व्हेजिटेबल्स मार्केट्सचे अध्यक्ष हाजी शाहजहां म्हणाले की पाकिस्तान मागील वर्षाप्रमाणे यंदाही ऑक्टोबरमध्ये भारतातून भाजीपाला आयात करेल.सिंध प्रांतात आलेल्या महापुरामुळे फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात ७५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे येथील घाऊक बाजारामध्ये भाज्यांच्या किमती जवळपास दुप्पट झाल्यात.कराचीतील घाऊक बाजारात दररोज फळ आणि भाज्यांचे ८००...
  September 19, 02:51 PM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानात कराची येथे आज सकाळी आत्मघातकी हल्ल्यामध्ये 8 जण ठार झाले. हल्लेखोराने स्फोटकांने भरलेली कार एका वरिष्ठ पोलिस अधिका-याच्या निवासस्थानामध्ये आदळली. विशेष पोलिस अधिक्षक चौधरी असलम यांचे हे निवाससथान होते. या स्फोटामध्ये एक महिला आणि एका मुलासह 8 जण ठार झाले. अनेक जण जखमी झाले. त्यांना जवळच्या जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतकांमध्ये असलम यांचे सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचा-यांचाही समावेश आहे. या हल्ल्यातून असलम हे थोडक्यात बचावले. त्यांना तालिबानकडून...
  September 19, 10:13 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानच्या खैबर प्रांतात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा जवान व दहशतवादी यांच्यात चांगलीच धुमश्चक्री उडाली. खैबर प्रांतातील बारा या आदिवासी भागात लष्कराचा चेकपोस्ट आहे. तेथे जवान तसेच तालिबानविरोधी संघटनेतील काही सदस्य संयुक्तपणे निगराणीचे काम करतात. त्या ठिकाणी रविवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रथमच मोठ्या अस्त्रांचा वापर केला. रॉकेट, ग्रेनेडच्या माध्यमातून या लष्करी तळाला...
  September 19, 01:39 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये यावर्षीही खूप पाऊस पडला असून, जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे. सरकारकडून केली जात असलेले मदत कमी पडत असून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. लोकांची घरे वाहून गेली आहेत. तसेच पीकांचेही मोठे नुकसान झाले आहे. लोकांना खायला अन्नही मिळत नाहीये. सार्वजनिक आरोग्य बिघडले असून, संसर्गजन्य रोग पसरले जाण्याची मोठी भीती आहे. यावर पाकिस्तान सरकार व जागतिक आरोग्य संघटना काम करत आहे. या महापूरामुळे पाकिस्तानमधील सुमारे ६० लाख लोकांना फटका बसला आहे. पाहा फोटोफिचर...
  September 18, 07:10 PM
 • काबूल- अफगाणिस्तानमध्ये नाटोने तालिबानीच्या ठिकाणावर केलेल्या हवाई विमान हल्ल्यात किमान १८ दहशतवादी ठार झाले आहेत. तर १५ जण जखमी झाले आहेत.स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नूरिस्तान प्रांतातील एक पोलिस प्रमुख जाहिद नूरिस्तानी यांनी सांगितले की, गुप्तचर संघटनेच्या माहितीवरुन नाटोने बारगी माताल जिल्ह्यात हवाई हल्ले केले. यात तालिबानीचे ठिकाण होते. यात १८ दहशतवादी मारले गेले.पोलिस अधिकारी म्हणाला, यात सामान्य नागरिक मारले गेल्याचे कोणतेही वृत्त नाही. नूरिस्तान प्रांत व...
  September 18, 12:14 PM
 • इस्लामाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांची नियोजित भेट ऐनवेळी नाकारली. या निर्णयामागे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीचे कारण पुढे करण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र पाकिस्तान सरकारने हा दौरा रद्द करण्यात येत असल्याचे शुक्रवारी जाहीर करून आपली इभ्रत वाचविण्याचा खोटा प्रयत्न केला. सिंध प्रांतातील आपद्ग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदत कार्याची पंतप्रधान जातीने पाहणी करणार आहेत. त्यामुळे अमेरिकेचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात येत...
  September 17, 11:55 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानी सरकारचे अफगणिस्तानातील खतरनाक हक्कानी गटाशी लागेबांधे असल्याचे भक्कम पुरावे अमेरिकेकडे असल्याचा खळबळजनक खुलासा पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत कॅमेरॉन मुंटर यांनी आज केला.या आठवड्यात काबूलमधील अमेरिकन दूतावासाजवळ हक्कानी गटाच्या अतिरेक्यांनी भयंकर हल्ला चढवला होता.रेडिओ पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मुंटर यांनी हा आरोप केला. हक्कानी गटासोबत असलेले लागेबांधे त्वरित तोडावेत अन्यथा अमेरिका-पाक संबंधावर त्याचा विपरीत परिणाम होईल असा इशाराही...
  September 17, 11:48 PM
 • लंडन - जम्मू-काश्मिरातील मानवी हक्क पायमल्लीच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या संसदेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न ब्रिटिश सरकारनेच हाणून पाडला. काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधील प्रश्न असून द्विपक्षीय चर्चेद्वारेच तो सोडवला जावा, अशी सरकारची भूमिका असल्याचे संसदेत स्पष्ट करण्यात आले. काश्मिरातील मानवी हक्कांबाबत ब्रिटिश संसदेत चर्चा होणार असल्याचे कळल्यानंतर भारताकडूनही त्याला फारसे महत्त्व देण्यात आले नाही. या प्रकरणाची योग्य ती दखल घेण्यात आली आहे....
  September 17, 12:28 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानातील सिंध प्रांतात आलेल्या महापुराचा जबर फटका बसल्यानंतर आता अल्पसंख्याक नागरिकांना सापत्न वागणूक मिळत आहे. पुरग्रस्त भागात मदत कार्य करणाया धार्मिक संघटना आणि धर्मादाय संघटना अल्पसंख्याक आणि मागसवर्गीय नागरिकांना अन्नपाणी देण्यासही नकार देत आहेत. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या बदीन जिल्ह्यातील खोसकी गावात धार्मिक संघटनांनी मदत छावण्या उभारल्या आहेत.या छावण्यांमधून धान्याचे वाटप केले जात असून मागासवर्गीय नागरिकांना या धान्याची एकही बॅग देण्यात आली नाही,...
  September 15, 12:33 AM
 • इस्लामाबाद - गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतात महापूर आल्याने लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. दुसरीकडे पुरामुळे 270 लोकांचा बळी गेला आहे तर 53 लाख लोक बेघर झाले आहेत. आठवडाभरापासून देशातील काही भागांत पावसाने कहर केला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. दुसरीकडे बचाव मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. त्यात साडेचार दशलक्ष एकर शेती वाहून गेली आहे. आतापर्यंत...
  September 14, 12:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात