Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • कराची: पीपीपी नेत्याच्या हत्येनंतर पाकिस्तानचे सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीत हिंसा भडकली आहे. गेल्या चोवीस तासांत येथे ११ लोकांचा बळी गेला आहे. यात अनेकजण जखमी झाले. सरकारचा उपक्रम असलेल्या पीआयएच्या कामगार संघटनेचे प्रमुख व सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते आमीर शाह व त्यांचे मित्र यांना गुलिस्तान-ए-जौहर या भागात गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर हिंसाचार उसळला. दरम्यान, कराचीत शांतता राहावी यासाठी शांती रॅली काढण्यात आली.
  July 18, 03:54 AM
 • इस्लामाबाद: २००९ मध्ये लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर हल्ला करणारा पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मलिक इसाक तुरुंगात असताना त्याला पंजाब प्रांत सरकारकडून नियमितपणे मानधन दिले जात होते, अशी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इसाक लष्कर-ए-झांगवीचा म्होरक्या असून गुरुवारी त्याची जामिनावर सुटका झाली आहे. पाकिस्तानी दैनिक द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने हा गौप्यस्फोट केला आहे. पंजाब प्रांतात नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीग (पीएमएल-एन) पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे २००८ पासून...
  July 17, 07:15 AM
 • इस्लामाबाद- मुंबईत बुधवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासाबाबत पाकिस्तान भारताला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी म्हटले आहे.मलिक यांनी शनिवारी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना फोन करुन मुंबई ब़ॉम्बस्फोटात मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहिली तर, जखमी झालेल्या नागरिकांबाबत सहानुभूती व्यक्त केली. तसेच बॉम्बस्फोटाच्या तपासकामी पाकिस्तान भारताला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.ते म्हणाले, एक चांगले शेजारी म्हणून...
  July 16, 06:35 PM
 • इस्लामाबाद: पाकिस्तानात काही अज्ञात लोकांनी गर्दीवर बेछूट गोळ्या झाडल्या. यात सात जण ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कराचीत घडली. काही तरुण रस्त्यावरून जात होते. त्यांनी अचानकपणे गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर या भागात हिंसाचार उसळला. संतप्त नागरिकांनी उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावली. दरम्यान, पाकिस्तानातील नेते झुल्फिकार मिर्झा यांच्या प्रक्षोभक भाषणानंतर हा हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येते.
  July 16, 12:58 AM
 • इस्लामाबाद: पाकिस्तानचा वायव्य प्रांत खैबर पख्तुनख्वामध्ये गेल्या नऊ वर्षांमध्ये झालेल्या २०२८ दहशतवादी हल्ल्यांत किमान २ हजार ८९० नागरिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकाने जारी केलेल्या अहवालामध्ये २००३ पासून झालेल्या हल्ल्यांतील बळींची संख्या देण्यात आली आहे. मृतांमध्ये सुरक्षा कर्मचारी, लिपिक, पत्रकार, डॉक्टर, अभियंते, खासगी कर्मचारी आदींचा समावेश आहे. हल्ल्यांमध्ये निमलष्करी दलाचे १२० जवान, ४४१ पोलिस कर्मचारी तसेच २९७ लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे अहवालात...
  July 14, 05:34 AM
 • कंदहार : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे धाकटे सावत्रबंधू अहमद वली करझाई यांचा आज दफनविधी झाला. हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दफनविधीवेळी भावाचा मृतदेह पाहताच राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वली करझाई यांची मंगळवारी त्यांच्या राहत्या घरातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या दफनविधीला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या हेलमांंदचे गव्हर्नर बाँब हल्ल्यातून बालंबाल बचावले. वली करझाई यांच्या दफनविधीपूर्वी सरकारी...
  July 14, 05:30 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानातील अतिरेकी संघटना या भारतासह जगासाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेनेही मान्य केलेले असतांना पाकिस्तानी मीडिया मात्र या उलट बातम्या देत आहे. इस्लामाबादेतील द नेशन या वृत्तपत्राने भारताच्या सीमेवरील तैनात सुरक्षा रक्षकांना युद्धाची तयारी म्हटले आहे. भारतीय सैनिक हे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी कायम धोकादायक असल्याचा दावा दैनिकाने केला आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी मात्र या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दैनिकाच्या 'ओपिनियन' कॉलममध्ये छापण्यात...
  July 13, 05:44 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानने चीनच्या मदतीने मिसाइल सज्ज जहाजे बनविण्याची तयारी सुरु केली आहे. 'जिओ न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, ही जहाजे मिसाइल, स्वयंचलीत बंदुका आणि शस्त्रास्त्रांनी भरलेली असणार आहेत. संरक्षण मंत्रालयाचे सचिव लेफ्टनंट जनरल शाहिद इक्बाल यांनी अशी जहाजे पाकिस्तानी नौदलाला बळकटी आणण्यासाठी तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. या जहाजांच्या निर्मितीवेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मिसाइल वापर असलेली ही जहाजे कराचीतील एका कारखान्यात बनविण्यात...
  July 13, 01:13 PM
 • इस्लामाबाद: अमेरिकेने लष्करी मदत नाकारल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवरील सैन्य मागे घेऊ, अशी धमकी दिली आहे. निधी बंद झाल्यामुळे या भागात लष्करी जवान ठेवणे परवडणारे नाही, असे संरक्षणमंत्री अहमद मुख्तार चौधरी यांनी म्हटले आहे. ओबामा प्रशासनाकडून ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत बंद झाल्याने पाकिस्तानला पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच अफगाणिस्तान सीमेवरील सुमारे १ हजार १०० जवान परत बोलावण्याची भाषा पाकिस्तानने केली असल्याचे सांगण्यात येते. हा सीमा भाग आदिवासीबहुल आहे. या भागात...
  July 13, 06:02 AM
 • मीरनशाह (पाकिस्तान)- अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. अमेरिकेने पाकिस्तानची नाराजी पत्कारत व विरोध करत हल्ले सुरुच ठेवले आहेत. पाकिस्तानातील उत्तर पश्चिम भागात ड्रोन हल्ले केले असून गेल्या २४ तासात ४५ संशयित दहशतवादी मारले गेले आहेत. हा आतापर्यत केलेला सर्वाधिक मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, पाकिस्तान सरकारने अमेरिकेला धमकी दिली असून लष्करी आर्थिक मदत न दिल्यास अफगाणिस्तानच्या सीमेवर लढत असलेले सैनिक आम्ही माघारी बोलवू.सोमवारच्या...
  July 12, 03:47 PM
 • इस्लामाबाद-अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा डीएनए घेण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले होते. यासाठी अमेरिकेने एक बोगस लसीकरण मोहिम राबविली होती. एबोटाबाद शहरात लादेन राहत होता त्या परिसरात ही मोहिम राबविण्यात आली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून शहरातील मागसलेल्या भागातही ही मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली होती. यासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने शकील आफ्रिदी नावाच्या एका वरिष्ठ डॉक्टरची नियुक्ती केली होती. या मोहिमेतूनच...
  July 12, 09:16 AM
 • इस्लामाबाद - दहशतवादाविरुद्ध आम्ही कुणाच्याही मदतीशिवाय लढू शकतो, अशी प्रतिक्रिया पाक लष्कराचे प्रवक्ते अतहर अब्बास यांनी दिली आहे. पाकिस्तानला दिली जाणारी ८० कोटी डॉलरची लष्करी मदत रोखत असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, भारताने अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी म्हटले आहे, की आग्नेय आशियात शस्त्रास्त्र स्पर्धा तीव्र झाली आहे. अमेरिकेने पाकला दिले जाणारे लष्करी...
  July 12, 03:15 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तान देश सध्या अंतर्गत व बाह्य कलाहामुळे प्रचंड अडचणीत आला असून त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा अशी अवस्था झाली आहे. मागील चार दिवस कराचीत धुमचक्री झाल्यानंतर आता इस्लामाबादमधील सहाला येथील संरक्षण साहित्याच्या डेपोला बॉम्बस्फोटात उडवून दिले असून त्यात मोठे नुकसान झाले आहे. यात अनेक लोक जखमी झाले आहेत. तर, ६ जण ठार झाले आहेत.दुसरीकडे, पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरल्याने अमेरिकेचा रागाचा पारा चढला आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन,...
  July 11, 02:59 PM
 • इस्लामाबाद - भारतातील पाक वकिलातीवर हल्ला करण्याचा इशारा अल-कायदाची सहकारी संघटना हुजीने दिला आहे. संघटनेबद्दलची माहिती भारताला पुरविणे थांबविण्याची या संघटनेची मागणी आहे. पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालय आणि परराष्ट्र सचिव कार्यालय उडविण्याची धमकीही संघटनेने दिली आहे. डॉनने हे वृत्त दिले आहे.
  July 11, 04:11 AM
 • अटारी- भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेली राजकीय दरी कमी व्हावी यासाठी भारत-पाकिस्तान या देशांतील काही राजकीय नेत्यांसह पत्रकारांच्या शिष्टमंडळाने एकत्र येऊन बैठक घेतली.यात दोन्ही देशांतील संबंध चांगले कसे बनतील व राहतील याबाबत चर्चा केली. यात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी, भाजपचे राज्यसभेचे खासदार सौरव मित्रा, पत्रकार बरखा दत्त, रुबी ढींगरा, विजय पांडा आदी सहभागी झाले होते.ही बैठक पाच तास चालली. लाहौरमधून परतताना अटारी सीमेवर पत्रकारांशी बोलताना मनिष...
  July 10, 12:50 PM
 • इस्लामाबाद- मुंबई हल्याप्रकरणी भारताने दिलेले पुरावे आज पाकिस्तानी वकीलांनी दहशतवाद विरोधी विशेष न्यायालयात सादर केले. यामध्ये क्रुरकर्मा अजमल कसाबच्या क बुली जबाबाचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या फेडरल तपास संस्थेने (एफआयए) या हल्यातील मृतांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट, जखमींचे वैद्यकीय अहवाल आणि कसाबचा क बुली जबाब असलेला दस्तऐवज न्यायालयात सादर केला.हा दस्तऐवज इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत आहे. दहशतवाद विरोधी न्यायालयात मुंबई हल्याचा मास्टर माइंड लष्कर ए तोयबाचा झकीउर रेहमान लखवी...
  July 10, 01:37 AM
 • कराची- जातीय संघर्षाच्या घटनेत स्थानबद्ध करण्यात आलेल्या शेकडो जणांची सैन्याच्या जवानांनी शनिवारी सुखरूप सुटका केली. या घटनेत गेल्या पाच दिवसांत बळी गेलेल्यांचा आकडा शंभरवर गेला आहे. दोन गटांत गेल्या पाच दिवसांपासून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गटांतील लोक हे सशस्त्र होते. हे गट परस्परांवर सातत्याने गोळीबार तसेच रॉकेटचाही मारा करीत होते. काल रात्रीच्या घटनेत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या १०० वर गेली आहे. ज्या लोकांना स्थानबद्ध करण्यात आले होते...
  July 10, 01:01 AM
 • कराची- पाकिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांपासून हिंसक घटनांच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. या हिंसक घटनेमध्ये आतापर्यंत ठार झालेल्यांची संख्या १०० पर्यंत गेली आहे. शुक्रवारी झालेल्या घटनेत २१ लोक मारले गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे शहरातील तणाव वाढला आहे. सुरक्षेसाठी सरकारने शहरात एक हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. हिंसा करणा-यांना दिसताक्षणीच गोळया घालण्याचे आदेश देण्यात आला आहे. हिंसाचाराच्या या घटनांमुळे लोकांना आपल्या घराच्या बाहेर देखील पडता येईना....
  July 9, 12:48 PM
 • इस्लामाबाद- माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याशी अफेअर असल्याचा इम्रान खानने इन्कार केला आहे. पण माझ्या एका चुलतभावाला बेनझीर आवडायची. तिला तो पसंत होता. दोघांचा विवाहदेखील होणार होता, असे इम्रानने म्हटले आहे. भारतीय लेखक फ्रॅंक हुजूर यांनी इम्रान खान यांच्यावर आत्मचरित्र लिहिले असून त्यात इम्रानने हे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या चुलतभावाची मी बेनझीर यांच्याशी ओळख करून दिली. त्याच्याशी पहिल्या भेटीपासूनच बेनझीरने त्याच्यात रस दाखवण्यास सुरुवात केली होती. प्रेमाचा हा मामला...
  July 9, 05:52 AM
 • कराची- पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या तीन दिवसापासून धुमचक्री चालू असून शहरात मृत्यूचे तांडवच सुरु झाले आहे. गेल्या तीन दिवसात शहरात ७० लोक ठार झाले आहेत. तर, हजारो जखमी झाले आहेत. त्यामुळे शहरात सध्या हजारो जवान तैनात केले असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच आरोपींना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले असून हजारो लोक भीतीने घाबरले असून, अन्न-पाण्याशिवाय राहत असल्याचे चित्र आहे. शहरातील दळणवळण यत्रंणा, तसेच...
  July 8, 07:10 PM
 
जाहिरात

RECOMMENDED