जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • नवी दिल्ली- भारतातच फक्त मोठा भ्रष्ट्राचार नाही तर, तो पाकिस्तानातही आहे, असे सांगत पाकिस्तानातील एका नागरिकाने अण्णांपासून प्रेरणा घेत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ६८ वर्षीय जहांगीर अख्तर असे त्यांचे नाव असून, अण्णांपासून प्रेरित होऊन १२ सप्टेंबरपासून ते पाकिस्तानमधील अनागोंदी व भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आंदोलन उभे करणार आहेत.इस्लामाबादमध्ये छायाचित्रकाराचा व्यवसाय करणारे जहांगीर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानामध्येही भ्रष्टाचार मोठा आहे....
  August 18, 05:24 PM
 • इस्लामाबाद । दळणवळण क्षेत्रातील उपग्रहाच्यापाठोपाठ आता पाकिस्तानने रिमोट सेन्सिंग उपग्रहाची तयारी सुरू केली आहे. कृषी, पर्यावरण, जल व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगतीसाठी या उपग्रहाची मदत होणार आहे. हा उपग्रह यावर्षाच्या अखेरपर्यंत अवकाशात सोडून त्याद्वारे माहिती मिळण्यास प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे पाकिस्तानच्या अंतराळ व वातावरण संशोधन आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आयोगाने उपग्रह...
  August 18, 04:18 AM
 • काबूल- अफगाणिस्तानमधील दक्षिण प्रांतात भाजी मंडईमध्ये बुधवारी झालेल्या बॉंबस्फोटामध्ये किमान ८-१० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दक्षिणेकडील उरुझगन प्रांतातील दिहारवूद जिल्ह्यात एका दुचाकीत हा बॉंब ठेवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शिनी लोकांनी सांगितले.हा हल्ला तलिबानींनी केला असल्याचा संशय दाट असून, तालिबान पुन्हा नाटोला आव्हान निर्माण करत आहे. या भागात गेल्या ५-६ महिन्यांपासून नेहमीच हल्ले घडवून आणले गेले आहेत.
  August 17, 04:27 PM
 • वॉशिंग्टन. पाकिस्तानच्या ८० कोटी डॉलर्सच्या लष्करी मदतीवरील बंदी कायम राहणार आहे. ही बंदी उठावी, असे वाटत असेल तर पाकिस्तानने प्रथम दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलली पाहिजेत. पाकिस्तानला नागरीदृष्ट्या जी मदत हवी असेल, ती पुरविली जाईल. असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया नुलँड यांनी सांगितले. सुरक्षा व लष्करी मदतीच्या बाबतीत आम्हाला काही बदल करावे लागणार आहेत. पाकिस्तानसोबतचे संबंध हे...
  August 17, 02:25 AM
 • इस्लामाबाद. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानींना नोकरशाहीने चांगलेच उल्लू बनवले. सिंध येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता एक बनावट मदत शिबिर उभे करून गिलानींना दाखवण्यात आले. केंद्रीय मंत्री नावीद कुमार, खुर्शिद शाह, सिंधचे मुख्यमंत्री कय्यून अली शाह असा फौजफाटा घेऊन सोमवारी गिलानींनी कुनरी गावाला भेट दिली. या गावातील महिला महाविद्यालयातील एक मदत छावणी उभारण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने ही छावणी...
  August 17, 02:19 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त जवळजवळ सहा हजार लोकांनी एकाचवेळी राष्ट्रगीत गाऊन एक नवा विश्वविक्रम केला आहे. शनिवारी मध्यरात्री रक्षा सभागृहामध्ये ६५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ५,८८५ लोक एकत्र येऊन त्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हटले.यापूर्वी सप्टेंबर २००९ मध्ये फिलीपाईन्स देशाने ५,२४८ लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हटले होते, असे जियो न्यूज या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पाकिस्तानने यावेळेस फिलीपाईन्सचा विक्रम मोडला आहे.
  August 15, 02:42 PM
 • इस्लामाबाद/काबुल: दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान व अफगानिस्तान रविवारी हादरले असून या दोन वेगवेगळ्या दूघर्टनेत 27 जण ठार झाले आहे. पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील एका हॉटेलमध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अफगानिस्तानातील परवान प्रांतात गव्हर्नर कार्यालयात सहा मानवी बॉम्बच्या हल्ल्यात 16 जण ठार झाले आहे. चीनमधील वृत्तसंस्था 'शिन्हुआ'नुसार बलूचिस्तानची राजधानी क्वेटापासून अडीचशे 250 किमी अंतरावर असलेल्या डेरा अल्लाह यार शहरातील एका...
  August 14, 06:32 PM
 • इस्लामाबाद । 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्लेखोरांना पाकिस्तानात बसून सूचना देणा-या व्यक्तीच्या आवाजाशी एका आरोपीचा आवाज जुळत असल्याचा जबाब एफआयएचे निरीक्षक निसार अहमद जादुन यांनी दहशतवादविरोधी न्यायालयात दिला आहे.कराचीमध्ये सुरू असलेल्या या खटल्यात जादुन यांनी लष्कर-ए-तोयबाच्या कँपवर टाकलेल्या धाडींची माहितीही न्यायालयात दिली. याच कँपमध्ये २००८ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यापूर्वी अतिरेक्यांनी प्रशिक्षण घेतले होते.बचाव पक्षाचे वकील ख्वाजा सुल्तान यांनी आवाजाची पडताळणी...
  August 14, 02:51 AM
 • इस्लामाबाद - भारताकडून इंजिन भाड्याने घेऊन तिजोरीत खडखडाट असलेल्या पाकिस्तानी रेल्वेचा कारभार हाकण्याचा विचार सध्या सुरू आहे. रेल्वे इंजिनची कमतरता असल्याने पाकिस्तानातील रेल्वेचा कारभार सध्या रुळावरून घसरला आहे. पैशांची टंचाई असल्याने रेल्वे इंजिन विकत घेणे पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यापेक्षा ५० इंजिन भाड्याने घेण्याचा सोपा मार्ग पाकिस्तानी रेल्वेने घेतला आहे. सरकारने हिरवा कंदील दाखवला तर भारताकडून इंजिन भाड्याने घेण्यात येईल, असे पाकिस्तान रेल्वेचे प्रमुख...
  August 14, 12:26 AM
 • इस्लामाबाद- आर्थिक संकटाशी झुंजणारी पाकिस्तान रेल्वे भारताकडून ५० लोकोमोटीव्ह इंजिन भाडयाने घेण्याच्या विचारात आहे. इंजिनाच्या कमतरेतमुळे पाकिस्तान रेल्वेच्या अनेक रेल्वे रद्द कराव्या लागत आहेत.पाकिस्तान रेल्वेचे महाप्रबंधक सईद अख्तर यांनी डॉन या वृतपत्रास ही माहिती दिली. सरकारने जर परवानगी दिली तर भारताकडून लोकोमोटीव्ह भाडयाने घेतले जाऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानने इंजिन भाडयाने घेण्यासाठी नुकताच भारतीय रेल्वेकडे चौकशी केली होती आणि त्यांच्याकडून सकारात्मक...
  August 13, 09:31 PM
 • लाहोर- संशयित तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील लाहोर शहरातून एका अमेरिकन नागरिकाचे आज शनिवारी अपहरण केले. १० ते १२ अत्याधुनिक हत्यारे घेऊन आलेले दहशतवादी जे.ई.वॉर्नरच्या घरामध्ये घुसले. त्यावेळेस उपस्थित असलेले सुरक्षारक्षक रोजाच्या तयारीत होते. त्यामुळे दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांना ताब्यात घेणे सोपे गेले. त्यांनी वॉर्नरचे हात-पाय बांधून एका वाहनात ठेवले आणि अज्ञात स्थळी घेऊन गेले, असे पोलिस प्रवक्ताने सांगितले.या अपहरणामागे तेहरीक-ऐ-तालिबान ही अतिरेकी संघटना असल्याचे...
  August 13, 04:15 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या उत्तर वजिरीस्तान या आदिवासी पट्टय़ातील रहमतुल्हा दारपाखेल या वरिष्ठ पत्रकाराचे अज्ञात बंदूकधार्यांनी अपहरण केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी दिली. औसाफ उर्दू दैनिकाशी संबंधित दारपाखेल यांचे मिरानशहा शहरातून मंगळवारी अपहरण करण्यात आले. येथील मुख्य बाजारपेठेत खरेदी करीत असताना बंदूकधार्यांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी नेले. मिरानशहा प्रेस क्लबमधून बाहेर पडल्यानंतर काही अवधीतच ही घटना घडली. वजिरीस्तानमधील विविध...
  August 13, 04:24 AM
 • इस्लामाबाद- १९६५ मध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाच्या वैमानिकाने भारताच्या एका नागरी विमानावर हल्ला केला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकाच्या मुलीने हल्ला करणा-यास माफ केले आहे. दरम्यान, आपल्याकडून ही घोडचूक झाली. यामुळे दोन्ही देशांवर गहिरे घाव निर्माण झाल्याची कबुली पाकिस्तानी वैमानिकाने दिली आहे. कैस हुसैन असे पाकिस्तानी वैमानिकाचे नाव आहे. हुसैन याने केलेल्या हल्ल्यात जहांगीर इंजिनिअर हे ठार झाले. या घटनेला अनेक वर्षे उलटली; परंतु पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी हुसैन यांनी...
  August 12, 11:27 PM
 • इस्लामाबाद - पेशावरमध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ७ ठार, तर ३७ जण जखमी झाल्याची घटना घडली. हा हल्ला एका तरुणीने केला. रमजानच्या पवित्र महिन्यातील ही पहिलीच घटना असून महिला आत्मघाती हल्ल्याची ही आतापर्यंतची तिसरी घटना आहे. दरम्यान, याच वेळी दुसरा स्फोट घडवण्यात आला. दुसरीकडे या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप घेतली नाही. गुरुवारच्या घटनेत एकाच वेळी दोन स्फोट करण्यात आले. दुसरा स्फोट लाहोरी दरवाजाजवळ करण्यात आला. पोलिसांची व्हॅन जात असताना रिमोट...
  August 12, 01:33 AM
 • वॉशिंग्टन- पाकिस्तानने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला हा तहाच्या स्वरुपात पाकिस्तानमध्ये ठेवले होते. लादेनला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तान सौदी अरेबिया या देशाकडून पैशाच्या स्वरुपात मोठी रक्कमेची लाच घेत होता, असा आरोप अमेरिकेच्या सुरक्षा यत्रंणेने केला आहे. त्यांनी गुप्तचर संघटनेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हिलहाऊसच्या माहितीनुसार, लादेनविषयी माहिती देणाऱया खबरयांनी सांगितले की, लादेनला सुरक्षित ठेवण्यासाठी सौदी सरकार पाकिस्तानच्या लष्कराला व गुप्तचर संघटना...
  August 11, 05:16 PM
 • इस्लामाबाद - उत्तर वजिरिस्तानमध्ये एका वाहनावर व संरक्षक भिंतीवर केलेल्या अमेरिकी ड्रोन हल्ल्यांत बुधवारी अल कायदाशी संबंधित हक्कानी गटाचे २५ अतिरेकी ठार झाले. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यातील हा पहिला हल्ला आहे. हल्ल्यामध्ये आठ अतिरेकी जखमी झाले असून त्यांच्यावर मिरानशहा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मारले गेलेले अतिरेकी अफगाणिस्तानातील सिराजुद्दीन हक्कानी या म्होरक्याच्या गटातील होते, असे स्थानिक पत्रकाराच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात...
  August 11, 12:52 AM
 • इस्लामाबाद - संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर आणखी संकटे येतच आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यावर देशद्रोह केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 संशयित दहशतवादी ठार झाले आहेत. लाहोर उच्च न्यायालयात अल्लाह बख्श गोंडल नावाच्या एका व्यक्तीने अर्ज करीत गिलानी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आरोप केला आहे. गोंडल यांचे म्हणणे आहे की, गिलानी यांनी राष्ट्रीय एकजुटता कायदा रद्द करून सर्वोच्च न्यायालयाची आणि कायद्याची अवहेलना केली आहे. नव्याने...
  August 10, 01:23 PM
 • इस्लामाबाद. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या निवासातील दोन मजल्यांवर सोमवारी रात्री पावसाचे पाणी घुसले. यामुळे किमान तीन बैठका रद्द करण्यात आल्या.पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी ही बाब गांभीर्याने घेतले आहे. राष्ट्राध्यक्ष झरदारी हे सोमवारी दोन बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवणार होते. परंतु या बैठका होऊ शकल्या नाहीत. सोमवारी इस्लामाबादेत 176 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाईप जाम झाल्याने पावसाचे पाणी तिस-या आणि...
  August 9, 04:28 PM
 • इस्लामाबाद- भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणा-या जमात-उद-दवा या संघटनेवर बंदी आणण्यासाठी ब्रिटनने पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या लादेनचा खात्मा झाल्यामुळे जमात या संघटनेच्या मुसक्या बांधा, असे ब्रिटनने म्हटले आहे. यामुळे आता या संघटनेचा प्रमुख हाफिज मोहंमद सईद याला पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागेल, असे सांगण्यात येते. अलीकडेच ब्रिटनच्या मुत्सद्द्याने पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकायाची भेट घेतली. लष्कर-ए-तोयबाचे अमेरिकन मोहिमेत...
  August 9, 02:17 AM
 • इस्लामाबाद - चीनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत तक्रार केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने संबंधित संघटनेवर लगेच कारवाई करत असल्याचे चीनला सांगितले आहे. चीनने नुकतीच झिनजिआंग भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानमधील "तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट' ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याची तक्रार पाकिस्तानकडे केली होती. चीनच्या विविध प्रांतात हल्ला करावा यासाठीच येथे त्या संघटनेकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, असा आरोप चीनने पाकिस्तानकडे केला होता. तसेच हा गट...
  August 7, 02:43 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात