Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद- दहशतवाद्यांना पडद्याआड मदत करण्यासाठी कुप्रसिध्द असणा-या पाकिस्तानी सैन्याचा आणखी एक कू्र चेहरा जगासमोर आला आहे. पाकिस्तानमधील महालेखा परीक्षकांनी पाकिस्तानी सेनेमध्ये ५६ अब्ज रूपयांचा घोटाळा झाल्याचा खुलासा केला.२०११ च्या लेखापरीक्षण अहवालात आर्थिक व्यवहारात मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आढळले, तसेच सैन्य अधिका-यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचे दिसून आले. २००८ ते २०१० या कालावधीत ३३० असे करार झाले आहेत की ज्यामध्ये सरकारी नियमांचा उल्लंघन केल्याचे दिसून...
  June 13, 06:52 PM
 • पेशावर: पाकिस्तानच्या पेशावर शहरात झालेल्या दोन भयंकर बॉम्बस्फोटांत 35 जण मरण पावले, तर 100 हून अधिक जण जखमी झाले.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पहिला धमाका खैबर मार्केट भागात झाला. त्याची तीव्रता कमी होती. त्यात तिघेजण जखमी झाले. तेथे मदतकार्यासाठी पथके दाखल झाली. गर्दीही वाढली. त्यातच मोटारसायकलवरून आलेल्या एका 17 वर्षीय मुलाने स्फोट घडवला. सुमारे 10 किलो स्फोटके त्याने वापरली होती. हा स्फोट एवढा भयंकर होता की, अनेक जण जागीच ठार झाले. या बाजारातील 20 दुकाने स्फोटांमुळे भुईसपाट झाली. काही...
  June 13, 02:28 AM
 • पेशावर- पाकिस्तानमधील पेशावर शहर पुन्हा एखदा दोन मोठ्या बॉम्बस्फोटांनी हादरले. यात ३४ जण ठार झाले असून किमान ८० लोक जखमी झाले आहेत. हल्ला नागरी वस्तीतील खैबर सुपर मार्केटजवळ झाला. दहशतवाद्यांनी पहला बॉम्बस्फोट कमी ताकदीचा केला. त्यामुले लोक तेथे गोळा झाले. त्यानंतर दुसरा शक्तीशाली बॉम्बस्फोट करण्यात आला. त्यात मोठे नुकसान झाले. ठार झालेल्यांत दोन पत्रकारांचाही समावेश आहे.
  June 12, 09:27 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानचे लष्कर आणि अतिरेक्यांचे थेट संबंध असल्याचे पुरावेच हाती लागल्यामुळे सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेचे प्रमुख लिओन पॅनेट्टा यांनी पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाला चांगलेच धारेवर धरल्याने उभय देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. पॅनेट्टा हे कालपासून पाकिस्तान दौ-यावर आले आहेत. काल रात्री उशिरा त्यांनी पाकचे लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कयानी आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट शुजा पाशा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेक्यांचे थेट संबंध असल्याचे...
  June 12, 01:40 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी पाकचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्या. राणा निसार यांनी हे वॉरंट जारी केले. या प्रकरणाची सुनावणी रावळपिंडी येथील कारागृह न्यायालयात होत आहे. याच तुरुंगात भुत्तो हत्या प्रकरणातील सात आरोपी कैद आहेत. यामध्ये दोन वरिष्ठ पोलिस अधिका-यांचाही समावेश आहे. न्यायालयाने मुशर्रफ यांच्या स्थावर व जंगम संपत्तीबाबतही विचारणा...
  June 12, 01:05 AM
 • इस्मालाबाद- पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱयांचे व आयएसआय गुप्तचर संघटनेशी संबंध असल्याचे पुरावे अमेरिकेने पाकिस्तान सरकारला देऊन आणखी एक झटका दिला आहे. लादेनला ठार केल्यानंतर अमेरिका- पाकिस्तान यांच्यात ताणतणाव असतानाच अमेरिकेने पाकिस्तानला लष्कर व आयएसआय यांचे संबंध असल्याचे पुरावे सादर करुन अडचणीत आणले असल्याचे मानले जात आहे.पाकिस्तानच्या दौऱयावर असलेले अमेरिकेची गुप्तचर संघटना 'सीआयए'चे प्रमुख लियोन पनेटा यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी आणि आयएसआय...
  June 11, 04:11 PM
 • इस्लामाबाद- पाच नि:शस्त्र रशियन नागरिकांचे बळी घेतल्यामुळे वादात सापडलेले पाकिस्तानी सुरक्षा दल कराचीतील एका युवकाच्या निर्घृण हत्येमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे.पाकिस्तानच्या निमलष्करी दलाचे पाच जवान एका युवकावर गोळ्या झाडत असल्याचा व्हिडिओ वृत्त वाहिन्यांवर झळकल्यानंतर हे नवे वादंग उठले आहे. कराचीच्या बेनझीर भुत्तो पार्कमध्ये सरफराज शहा नावाच्या युवकाला पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या पाच जवानानी हेरले तो युवक गयावया करून दयेची भीक मागत असतानाही एका जवानाने...
  June 10, 01:06 AM
 • इस्लामाबाद- मुंबई हल्ल्यातील सात संशयितांविरुद्धचा खटला पाकिस्तानने फास्ट ट्रॅक न्यायालयासमोर ठेवला आहे. महत्त्वाच्या अधिका-यांच्या मुलाखती घेण्यासाठी न्यायालयीन आयोगाला भारताने परवानगी दिली नसल्यामुळे प्रक्रियेस विलंब लागत आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. मुंबई हल्ल्यातील ख-या गुन्हेगारांविरुद्ध जोपर्यंत पाकिस्तान कारवाई करीत नाही तोपर्यंत उभय राष्ट्रांत परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होणार नाही, असे विधान भारताचे गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी काल केले होते. त्यावर...
  June 10, 01:01 AM
 • इस्लामाबाद- गरिबी, वाढती महागाई, लोकसंख्या आणि या गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक स्रोतांची कमरता अशा अडचणींना तोंड देणा-या पाकिस्तानसमोर आता अनारोग्याची आणि संभाव्य हत्यासत्राची नवी समस्या उभी राहिली आहे. अफगाण सीमेलगत अमेरिकेने चालवलेल्या ड्रोन विमानांच्या हल्ल्यांत रासायनिक अस्त्रांचाही वापर केला जात असल्याचा दावा केला जात असून यामुळे सामान्य नागरिकांमध्ये व्याधी प्रचंड प्रमाणात वाढत चालल्या आहेत. एकीकडे अनारोग्याचा हा धोका वाढत असतानाच पंजाब प्रांतात आणखी एक समस्या निर्माण...
  June 10, 12:45 AM
 • इस्लामाबाद - गरिबी, वाढती लोकसंख्या आणि महागाई यामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानपुढे आता एक नवे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये रसायनांचा वापर करण्यात येत असल्याची अफवा पाकिस्तानमध्ये पसरली आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब प्रांतात ही माहिती जोरदार पसरत असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ड्रोन बॉम्बमध्ये रासायन वापरण्यात येत असल्याचे पत्रके वाटण्यात येत आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांना जिहाद...
  June 9, 05:42 PM
 • मुंबई- पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेली आयएसआयने आता भारतीय फिल्म इंड्रस्टीमधील सुपरस्टार सलमान खान व शाहरुख खान यांच्यावर निशाणा साधला आहे. शाहरुख खान याचा बहुचर्चित 'रा वन' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची वेबसाईट हॅक करण्यात आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यातआहे. तसेच मागच्या आठवड्यात सलमान खानचा 'रेडी' हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर काही तासांत हा चित्रपट पाकिस्तानमधील काही वेबसाईटवर उपलब्ध झाला होता. त्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात...
  June 7, 09:10 AM
 • इस्लामाबाद- अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाकमध्ये १८ जण ठार झाले. दक्षिण वजिरीस्तानसह अन्य भागांत हे हल्ले करण्यात आले. शावल तालुक्यात ड्रोन विमानाने वाहनाला लक्ष्य केले. यात चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे जिओच्या वृत्तात म्हटले आहे. त्याआधी वानापासून १० किमी अंतरावरील शालम रघजईमध्ये केलेल्या हल्लयात चार जण ठार झाले. वानातील एका घरावर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
  June 7, 12:57 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानात लष्करी तळांवर एकीकडे वारंवार दहशतवादी हल्ले होत असताना आपली अण्वस्त्रे 200 टक्के सुरक्षित असल्याचा दावा अंतर्गत व्यवहारमंत्री रहेमान मलिक यांनी केला आहे. आण्विक प्रकल्पांच्या संरक्षणाच्या दृष्टीने पाकिस्तानात अत्यंत सक्षम अशी देखरेख व नियंत्रण करणारी प्रणाली उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.पीएनएस मेहरान नौदल तळावर झालेला हल्ला आणि अबोटाबाद शहरात मारला गेलेला कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन, या घटना पाहता पाकिस्तानी लष्करातही काही पाताळयंत्री लोक...
  June 6, 03:33 AM
 • अदेन: अब्यान प्रांतात अल कायदाने केलेल्या हल्ल्यात येमेनचे नऊ जवान ठार झाले आहेत. दोन वेगवेगळ्या स्फोटांत नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले. एका घटनेत काल सहा जण ठार तर काही जखमी झाले होते. दुसया घटनेत तीन जवान ठार व ३६ जण जखमी झाल्याची घटना घडली. येमेनमध्ये काल झालेल्या सत्तांतरानंतर हा हल्ला झाला असून, अमेरिकेच्या दबावामुळे अल कायदाची कोंडी होण्याची शक्यता आहे. अरब जगतामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
  June 6, 02:07 AM
 • इस्लामाबाद:शिकागो न्यायालयात डेव्हिड हेडलीने दिलेला जबाब हा विश्वास ठेवण्याजोगा नाही. कारण हेडली हा खोटारडा असल्याचा कांगावा पाकिस्तानचे अंतर्गत कार्यमंत्री रेहमान मलिक यांनी केला आहे. शिकागो येथील न्यायालयात सुरू असलेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला खटल्यात हेडलीने आयएसआय अधिकायांचा २००८ च्या या घटनेत हात असल्याचा दावा केला होता. यावर मलिक यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, हेडलीचे वडील हे पाकिस्तानी असून, ते चांगल्या परिवाराशी संबंधित होते. मात्र, हेडली स्वत: गुन्हेगार व...
  June 6, 02:05 AM
 • पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आठ संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांना राजधानी इस्लामाबादमध्ये पकडण्यात आले. तर इतर जणांना पंजाब प्रांतातील परिसरात पकडण्यात आले.याबाबत असे सांगण्यात येत आहे की, ओसामा बिन लादेन याच्या मूत्यूनंतर त्याचा बदला घेण्यासाठी अल कायदा या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांना ठार मारण्याचा कट रचला असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलाला याची माहिती मिळताच...
  June 5, 06:21 PM
 • वृत्तसंस्था । इस्लामाबाद: भारताशी बरोबरी साधण्याच्या कायम प्रयत्नत असलेल्या पाकिस्तानने यावर्षीच्या संरक्षण खर्चातही मोठी वाढ केली आहे. पाकच्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राासाठी १२ टक्के वाढ मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे भारतानेही यावर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण खर्चात एवढीच वाढ केली.पाकिस्तानने संरक्षण खर्चासाठी ४९५.२ अब्ज रुपये मंजूर केले आहेत. गेल्यावर्षी यासाठी ४४४.२ अब्ज रुपयाची तरतूद केली होती. यावर्षी त्यात १२ टक्के वाढ झाली. भारताने या क्षेत्रात १२...
  June 5, 01:22 AM
 • वृत्तसंस्था । इस्लामाबाद: कराचीतील नौदलाच्या तळावर हल्ला केल्यानंतर आता संपूर्ण पाकिस्तान नेस्तनाबूत करू, अशी धमकी तालिबानने दिली आहे. पाकिस्तानी अधिका-यांनी अमेरिकेसोबतचे संबंध संपुष्टात आणावेत, या उद्देशातून तालिबानने हा इशारा दिला आहे. तालिबानचा भस्मासुर पाकिस्तानवरच उलटला असून, मेहरान तळावरील हल्लाही तालिबाननेच केला होता.तहरिक-ए-तालिबानचे नेते मौलाना फकिर मोहमद यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला आहे. एखाद्या दहशतवादी संघटनेने आपल्या रणनीतीविषयी...
  June 5, 01:17 AM
 • इस्लामाबाद- तालिबानने पाकिस्तानच्या सैनिकांवर कराचीजवळील मेहरान नौसेना भागात हल्ला केल्यानंतर तालिबानने संपूर्ण पाकिस्तानच नष्ट करु अशी धमकी दिली आहे. तालिबानने म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तान सरकार व सैनिकाविरुध्दची लढाई पुन्हा जोमाने करु. तसेच यापेक्षाही मोठे हल्ले करण्याची आमची योजना असून पाकिस्तानच्या अधिकाऱयांचे अमेरिकेबरोबरच संबंध संपत नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहील.तहरीक-ए-तालिबान या संघटनेचा नेता मैलाना फकीर मोहम्मद याने द न्यूज या वर्तमानपत्रांशी बातचीत करताना ही...
  June 4, 02:57 PM
 • तीन वर्षापूर्वी मुंबईत २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड व अल कायदा या संघटनेशी संबंधित कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी इलियास काश्मिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त लंडनच्या बीबीसी या वाहिनेने दिले आहे.पाकिस्तानातील दक्षिण वझिरीस्तानमध्ये शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात काश्मिरीसह ९ दहशतवादी ठार झाला असल्याचे बीबीसीने म्हटले आहे.अल कायदा प्रमुख व कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या नौदालाच्या जवानांनी अबोटाबाद येथे ठार केले होते....
  June 4, 02:30 PM
 
जाहिरात

RECOMMENDED