Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • तीन वर्षापूर्वी मुंबईत २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड व अल कायदा या संघटनेशी संबंधित कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी इलियास काश्मिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त लंडनच्या बीबीसी या वाहिनेने दिले आहे.पाकिस्तानातील दक्षिण वझिरीस्तानमध्ये शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात काश्मिरीसह ९ दहशतवादी ठार झाला असल्याचे बीबीसीने म्हटले आहे.अल कायदा प्रमुख व कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या नौदालाच्या जवानांनी अबोटाबाद येथे ठार केले होते....
  June 4, 02:30 PM
 • इस्लामाबाद- तालिबानने पाकिस्तानच्या सैनिकांवर कराचीजवळील मेहरान नौसेना भागात हल्ला केल्यानंतर तालिबानने संपूर्ण पाकिस्तानच नष्ट करु अशी धमकी दिली आहे. तालिबानने म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तान सरकार व सैनिकाविरुध्दची लढाई पुन्हा जोमाने करु. तसेच यापेक्षाही मोठे हल्ले करण्याची आमची योजना असून पाकिस्तानच्या अधिकाऱयांचे अमेरिकेबरोबरच संबंध संपत नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहील.तहरीक-ए-तालिबान या संघटनेचा नेता मैलाना फकीर मोहम्मद याने द न्यूज या वर्तमानपत्रांशी बातचीत करताना ही...
  June 4, 12:34 PM
 • लंडन - अमेरिकेने स्वत: होऊन गळ्यात अडकवून घेतलेले पाकिस्तानचे लोढणे आता त्यांना भलतेच डोईजड झाले आहे. पाकिस्तानशी असलेले संबंध अमेरिकेने लगेच तोडून टाकणे आणि पाकला वा-यावर सोडणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी कमांडरने दिला आहे. पाकला वा:यावर सोडण्यामुळे आशियामध्ये १९९ सारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही या अधिका:याने दिला आहे. पाकिस्तान - अमेरिकेतील संबंधात अतिशय तणाव निर्माण झाला आहे, हे मान्य करून अॅडमिरल माईक मुलन म्हणाले की, आम्ही जर काही वेगळे पाऊल...
  June 4, 05:46 AM
 • इस्लामाबाद - अफगाणिस्तानलगत सीमेवरून पाकिस्तानात घुसलेल्या सुमारे 300 शस्त्र सज्ज अतिरेक्यांविरुद्ध सैनिकांची जोरदार धूमश्चक्री सुरू आहे. यात 25 पाकिस्तानी सैनिक तसेच लष्करी अधिकार्यांनुसार 45 हून अधिक अतिरेकी मारले गेले आहेत. बुधवारी या अतिरेक्यांनी पाकिस्तानी चौकीवर जोरदार हल्ला केला होता. पाकिस्तानी सरकारनेही या कारवाईला पुष्टी दिली असून स्थानिक प्रशासकीय अधिकारी गुलाम मोहम्मद यांनी गुरुवारी सकाळी या कारवाईबाबत माहिती दिली.बुधवारी सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याचे सांगत हे...
  June 2, 04:25 PM
 • वृत्तसंस्था । नवी दिल्ली, पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची विक्री करणा-या अमेरिकेने २00९ मध्ये पाकिस्तानला हार्पून क्षेपणास्त्र देण्यास नकार दिला होता. या क्षेपणास्त्राचा उपयोग पाक भारताविरुद्ध करेल या भीतीपोटी अमेरिकेने पाकला हार्पूनच्या 'रेंज'पासून लांब ठेवल्याचे मानले जात आहे. असे असले तरी अमेरिकेने पाकला एफ-१६ विमाने मोठ्या प्रमाणात दिली आहेत. गोपनीय दस्तऐवजांचा गौप्यस्फोट करणा-या 'विकिलीक्स' वेबसाइटने हा खुलासा केला आहे. दि. १८ मार्च २00९ रोजी पाकमधील अमेरिकेचे...
  June 2, 02:39 AM
 • इस्लामाबाद । पत्रकार सय्यद सलीम शहजाद यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर पाक पत्रकारांना छोटे शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री रेहमान मलिक यांनी बुधवारी दिली. शहजाद यांच्या हत्येमध्ये पाक गुप्तचर संस्था 'आयएसआयचा हात असल्याच्या शक्यतेचीही चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. शहजाद यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांना बोलत होते. परंतु हे प्रकरण वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचे ते म्हणाले. शहजाद यांचे अपहरण आयएसआयने केल्याचा संशय...
  June 2, 02:19 AM
 • इस्लामाबाद । पत्रकार सय्यद सलीम शहजाद यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर पाक पत्रकारांना छोटे शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री रेहमान मलिक यांनी बुधवारी दिली. शहजाद यांच्या हत्येमध्ये पाक गुप्तचर संस्था 'आयएसआयचा हात असल्याच्या शक्यतेचीही चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. शहजाद यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांना बोलत होते. परंतु हे प्रकरण वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचे ते म्हणाले. शहजाद यांचे अपहरण आयएसआयने केल्याचा संशय...
  June 2, 02:18 AM
 • पाकिस्तान देशाच्या सुप्रीम कोर्टाने पाकिस्तान सरकारला चांगलेच फटकारले असून भारतात आपल्या देशातील एक शास्त्रज्ञ गेल्या वीस वर्षापासून खितपत पडला असून त्याच्या सुटकेसाठी तुम्ही काय केले असा प्रश्न करत सरकारला चांगलेच फटकारले.खलील चिश्ती असे भारतीय तुरुगांत असलेल्या ७८ वर्षीय शास्त्रज्ञाचे नाव असून तो गेली २० वर्ष अजमेर येथील तुरुगांत आहे. त्याच्यावर भारतीय व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे. त्याला गेल्यावर्षीच जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे. यासंदर्भात चिश्ती यांची मुलगी शोआ...
  June 1, 10:01 PM
 • पाकिस्तानमधील पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी हलकी व दुय्यम दर्जाची शस्त्रे वापरण्याची परवानगी सरकारने बुधावरी दिली. मंगळवारी आयएसआयने अपहरण केलेल्या सय्यद सलीम शहाजाद या पत्रकाराची हत्या करम्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले.लष्करातील सैनिकाप्रमाणेच सर्व पत्रकारांनाही आपले रक्षण करण्याचा हक्क असून त्यामुळेच हा निर्णय घेतला असून शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात येत आहे. शहाजाद प्रकरणात आयएसआयच्या...
  June 1, 08:32 PM
 • पाकिस्तानमधील पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी हलकी व दुय्यम दर्जाची शस्त्रे वापरण्याची परवानगी सरकारने बुधावरी दिली. मंगळवारी आयएसआयने अपहरण केलेल्या सय्यद सलीम शहाजाद या पत्रकाराची हत्या करम्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले.लष्करातील सैनिकाप्रमाणेच सर्व पत्रकारांनाही आपले रक्षण करण्याचा हक्क असून त्यामुळेच हा निर्णय घेतला असून शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात येत आहे. शहाजाद प्रकरणात आयएसआयच्या...
  June 1, 08:08 PM
 • ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर पाकिस्तानसमोर दशहवाद्यांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दहशतवाद्यांनी एकप्रकारे पाकिस्तानसोबत युद्धच सुरु केले आहे. अफगाणिस्तानच्या उत्तर पश्चिमेकडून सीमेकडून २०० दहशतवाद्यांनी पाकिस्तानवर हल्ला केला. यात एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीमेकडुन घुसखोरी केली आणि सीमेवरच्या एका चौकीवर हल्ला केला. ही चौकी पुर्णपणे उध्वस्त झाली आहे. पाकिस्तानवर हल्ल्याचे सावट घोगावतच होते. गेल्याच आठवड्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी नौदलाच्या...
  June 1, 06:00 PM
 • इस्लामाबाद- पाकिस्तानी सैन्य आणि अल कायदा विरूध्द शोध पत्रकारिता करणारे 'एशिया टाइम्स' चे पाकिस्तान ब्युरो चीप सय्यद सलीम शहजाद यांची हत्या करण्यात आली असून आयएसआयनेच शहजाद यांची हत्या केल्याचा आरोप पाकिस्तानच्या मानवाधिकार संघटनेने केला आहे. हत्या करण्यापूर्वी त्यांना बेदम मारण्यात आली होती, त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. रविवार पासून ते बेपत्ता होते. आयएसआय आणि अतिरेक्यांविरूध्दच्या त्यांच्या शोध पत्रकारितेवर आयएसआय नाराज होती व...
  June 1, 10:17 AM
 • ओसामा बिन लादेनला संपविल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वायु सीमेचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांवर हल्ले केले आहेत. नाटोच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या वायु सीमेत घुसुन उत्तरी वजिरीस्तान भागात हल्ले केले. सुत्रांच्या माहितीनुसार, लादेनवर ज्या पद्धतीने हल्ला केला होता, त्याच पद्धतीचा हा हल्ला होता. नोटोच्या सैनिकांचे दोन हेलिकॉप्टर वजिरीस्तानच्या भागात घुसले. अल कायदाशी निकटचे संबंध असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या ५ दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.लादेनचा खात्मा...
  May 31, 12:17 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना रावळपिंडी न्यायालयाने आरोपी बनवीत फरारी घोषीत केले आहे. बेनझीर भुट्टो हत्याकांडप्रकरणी तपास पथकाला सहकार्य न केल्याने न्यायालयाकडून हा निर्णय सुनाविण्यात आला आहे.बेनझीर भुट्टो यांची २००७ मध्ये हत्या करण्यात आली होती. रावळपिंडी येथील दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश राणा निसार अहमद यांनी तपास पथकाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय दिला. मुशर्रफ यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल, मात्र त्यांना अटक...
  May 30, 08:18 PM
 • दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती तालिबानच्याच एका मोरक्याने अमेरिकेच्या सैनिकाला दिल्याचा दाट संशय आहे. लादेनचा अतिशय विश्वासू सहकारी समजला जाणारा व तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल बरादर यानेच ही माहिती पुरवली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मुल्ला बरादर आणि अमेरिकन प्रशासन यांच्यात याबाबत एक समझौता झाला होता, अशी बातमी इंग्लंडमधील मिररच्या वेबसाइटवर झळकली आहे. त्यानुसार लादेनला ठार मारल्यानंतर किंवा जिवंत पकडल्यानंतर...
  May 30, 06:14 PM
 • लंडन- तालिबानने लादेनच्या मृत्यूचा अमेरिकेशी सौदा केला होता. तालिबानचा सिनिअर कमांडर मुल्ला बरादरने लादेन राहत असलेल्या पाकिस्तान मधील एबटाबाद येथील घराचा पत्ता सांगितला आणि त्याच्या बदल्यात अमेरिकेने तालिबानचा प्रभाव असलेल्या भागातील आपले सैन्य काढून घेईल असे आश्वासन दिले होते असे ब्रिटनमधील एका वृत्तपत्रात म्हटले आहे. मुल्ला बरादर हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा अत्यंत विश्वासू समजला जातो. आतापर्यंत लादेनचा शोध अमेरिकेने कुरियर आणि त्याचा विश्वासू अबु अहमद कुवेतीच्या...
  May 30, 05:51 PM
 • पाकिस्तानचा अणूकार्यक्रम तीव्र गतीने सुरु असल्याची माहिती पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या चवथी अणूभट्टी 2013पर्यंत कार्यरत होईल. तर पाकिस्तानची अण्वस्त्रे पुर्णपणे सुरक्षित असून दहशतवादी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, असा दावा खान यांनी केलाआहे. खान यांच्यावर दुसऱ्या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान विकण्याचा आरोप होता. सरकारने त्यांना नजरकैदेतही ठेवले होते. गेल्या 10 वर्षांपासून ते अणू कार्यक्रमापासून दुर असले तरीही त्यांना त्याबद्दल पुर्ण...
  May 30, 11:44 AM
 • पाकिस्तानला अल कायदापासून धोका आणखी वाढला आहे. पाकिस्तानच्या नौदलामध्ये अल कायदाचे दहशतवादी घुसले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांचे दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी भारतालाही धोका वाढला आहे. आतापर्यंत गुप्तचर संस्था आयएसआयचे दहशतवाद्यांसोबत लागेबांधे असल्याचे आरोप होत होते. आता पाकिस्तानच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या मेहरान तळावर अल कायदाच्याच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. या...
  May 30, 10:27 AM
 • पाकिस्तान हे एकमेव असे मुस्लिम राष्ट्र आहे की ज्याच्याकडे आण्विक शस्त्रसाठा आहे त्यामुळे त्यांच्या आण्विक शस्त्रसाठयावर हल्ला करण्याचा आमची कुठलीही योजना नाही असे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तान मधील अण्वस्त्रे दहशतवादांच्या हाती पडतील अशी भीती सगळया जगातून व्यक्त केली जात आहे. लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तालिबान पाकिस्तानवर आणि त्यांच्या शस्त्रसाठ्यावर हल्ला करेल असे म्हटले जाते.'आण्विक शस्त्रक्षमता असलेले पाकिस्तान हे एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि आमची त्यावर हल्ला...
  May 29, 10:59 PM
 • इस्लामाबाद - सीआयएच्या एका न्यायवैद्यक पथकाने शनिवारी एबोटाबादेत कुख्यात आंतरराष्ट्रीय अतिरेकी ओसामा बीन लादेनच्या अतिरेकी कारवायांच्या ब्लूप्रिंटचा शोध घेण्यासाठी त्याच्या ठिकाणाची सखोल झाडाझडती घेतली.लादेन अनेक वर्षे लपून बसलेल्या तीन मजली हवेलीमध्ये तब्बल सहा तास कसून झडती घेण्यात आली.ही शोध मोहीम सुरू असताना कोणालाही या हवेलीच्या आसपास फिरकण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.मिडियालाही दूरच ठेवण्यात आले. 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार,सीआयएचे हे पथक हेलिकॉप्टरने...
  May 29, 02:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED