जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद - भारतातील पाक वकिलातीवर हल्ला करण्याचा इशारा अल-कायदाची सहकारी संघटना हुजीने दिला आहे. संघटनेबद्दलची माहिती भारताला पुरविणे थांबविण्याची या संघटनेची मागणी आहे. पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालय आणि परराष्ट्र सचिव कार्यालय उडविण्याची धमकीही संघटनेने दिली आहे. डॉनने हे वृत्त दिले आहे.
  July 11, 04:11 AM
 • अटारी- भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेली राजकीय दरी कमी व्हावी यासाठी भारत-पाकिस्तान या देशांतील काही राजकीय नेत्यांसह पत्रकारांच्या शिष्टमंडळाने एकत्र येऊन बैठक घेतली.यात दोन्ही देशांतील संबंध चांगले कसे बनतील व राहतील याबाबत चर्चा केली. यात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी, भाजपचे राज्यसभेचे खासदार सौरव मित्रा, पत्रकार बरखा दत्त, रुबी ढींगरा, विजय पांडा आदी सहभागी झाले होते.ही बैठक पाच तास चालली. लाहौरमधून परतताना अटारी सीमेवर पत्रकारांशी बोलताना मनिष...
  July 10, 12:50 PM
 • इस्लामाबाद- मुंबई हल्याप्रकरणी भारताने दिलेले पुरावे आज पाकिस्तानी वकीलांनी दहशतवाद विरोधी विशेष न्यायालयात सादर केले. यामध्ये क्रुरकर्मा अजमल कसाबच्या क बुली जबाबाचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या फेडरल तपास संस्थेने (एफआयए) या हल्यातील मृतांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट, जखमींचे वैद्यकीय अहवाल आणि कसाबचा क बुली जबाब असलेला दस्तऐवज न्यायालयात सादर केला.हा दस्तऐवज इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत आहे. दहशतवाद विरोधी न्यायालयात मुंबई हल्याचा मास्टर माइंड लष्कर ए तोयबाचा झकीउर रेहमान लखवी...
  July 10, 01:37 AM
 • कराची- जातीय संघर्षाच्या घटनेत स्थानबद्ध करण्यात आलेल्या शेकडो जणांची सैन्याच्या जवानांनी शनिवारी सुखरूप सुटका केली. या घटनेत गेल्या पाच दिवसांत बळी गेलेल्यांचा आकडा शंभरवर गेला आहे. दोन गटांत गेल्या पाच दिवसांपासून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गटांतील लोक हे सशस्त्र होते. हे गट परस्परांवर सातत्याने गोळीबार तसेच रॉकेटचाही मारा करीत होते. काल रात्रीच्या घटनेत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या १०० वर गेली आहे. ज्या लोकांना स्थानबद्ध करण्यात आले होते...
  July 10, 01:01 AM
 • कराची- पाकिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांपासून हिंसक घटनांच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. या हिंसक घटनेमध्ये आतापर्यंत ठार झालेल्यांची संख्या १०० पर्यंत गेली आहे. शुक्रवारी झालेल्या घटनेत २१ लोक मारले गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे शहरातील तणाव वाढला आहे. सुरक्षेसाठी सरकारने शहरात एक हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. हिंसा करणा-यांना दिसताक्षणीच गोळया घालण्याचे आदेश देण्यात आला आहे. हिंसाचाराच्या या घटनांमुळे लोकांना आपल्या घराच्या बाहेर देखील पडता येईना....
  July 9, 12:48 PM
 • इस्लामाबाद- माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याशी अफेअर असल्याचा इम्रान खानने इन्कार केला आहे. पण माझ्या एका चुलतभावाला बेनझीर आवडायची. तिला तो पसंत होता. दोघांचा विवाहदेखील होणार होता, असे इम्रानने म्हटले आहे. भारतीय लेखक फ्रॅंक हुजूर यांनी इम्रान खान यांच्यावर आत्मचरित्र लिहिले असून त्यात इम्रानने हे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या चुलतभावाची मी बेनझीर यांच्याशी ओळख करून दिली. त्याच्याशी पहिल्या भेटीपासूनच बेनझीरने त्याच्यात रस दाखवण्यास सुरुवात केली होती. प्रेमाचा हा मामला...
  July 9, 05:52 AM
 • कराची- पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या तीन दिवसापासून धुमचक्री चालू असून शहरात मृत्यूचे तांडवच सुरु झाले आहे. गेल्या तीन दिवसात शहरात ७० लोक ठार झाले आहेत. तर, हजारो जखमी झाले आहेत. त्यामुळे शहरात सध्या हजारो जवान तैनात केले असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच आरोपींना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले असून हजारो लोक भीतीने घाबरले असून, अन्न-पाण्याशिवाय राहत असल्याचे चित्र आहे. शहरातील दळणवळण यत्रंणा, तसेच...
  July 8, 07:10 PM
 • लाहोर- एका खटल्यात निर्दोष मुक्तता होऊनही दोन भारतीय महिला पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडल्या आहेत. लाहोर उच्च न्यायालयास या दोन महिलांनी पत्र पाठवून मदत मागितल्यानंतर न्यायालयाने स्यु मोटो कारवाई करीत चौकशीचे आदेश दिले आहेत. परवीन जहान आणि गुल अफरोज अशी या भारतीय महिलांची नावे आहेत. या दोघी कोट लखपत तुरुंगात खितपत पडल्या आहेत. याच तुरुंगात सरबजितसिंगही शिक्षा भोगत आहे. परवीन आणि अफरोज या दोघींनी लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती इजाज अहमद चौधरी यांना पत्र पाठवले होते....
  July 7, 12:10 AM
 • अफगाणिस्तानमधून घुसखारी केलेल्या तालिबानी अतिरेक्यांकडून पाकिस्तानवर हल्ले होत आहेत. शंभर पेक्षा जास्त अतिरेक्यांनी अपरदिर मधील खारा गावावर हल्ला केला. या हल्यात त्यांनी स्थानिक शांतता कमिटीच्या सदस्याची हत्या केली. तसेच एका शाळेला आगही लावली. हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिरेक्यांवर प्रतिहल्ला केला.गेल्या आठवडयातही अफगाणिस्तानच्या उत्तर पश्चिमी सीमेतून ५०० अतिरेक्यांनी घुसखारी केली होती. या हल्यात २७ पाकिस्तानी सैनिक आणि ३ स्थानिक...
  July 6, 01:52 PM
 • इस्लामाबाद- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा बोलतात एक आणि करतात एक याची प्रचिती भारताला पुन्हा एकदा आली. भारताच्या कुरापती काढणा-या पाकिस्तानला मदत करणा-या शक्तींविरूध्द अमेरिका कायम आवाज उठवेल असा शब्द बराक ओबामांनी दिला होता. पाकिस्तानमध्ये उभारल्या जात असलेल्या अणुभटटीला चीनकडून मदत केली जात आहे. त्याच्याविरूध्द अणुपुरवठादार गटाच्या बैठकीत अमेरिकेकडून आवाज उठवण्यात येईल असा विश्वास अमेरिकेने भारताला दिला होता. पण जेव्हा हा विषय मंजूरीसाठी आला तेव्हा अमेरिकेने विरोध केला नाही....
  July 6, 12:25 PM
 • न्यूयॉर्क - पाकिस्तानने जवळपास 14 हजार प्रशिक्षित अतिरेक्यांची फौज राखीव ठेवली आहे. गरज भासेल तेव्हा भारताविरुद्ध त्यांचा वापर करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने एका माजी अतिरेकी कमांडरच्या हवाल्याने ही बाब उजेडात आणली आहे.नाव न छापण्याच्या अटीवर या माजी अतिरेक्याने सांगितले की, पाकिस्तानचे लष्कर काश्मीर व अफगाणिस्तानात कारवाया घडवून आणण्यासाठी अजूनही अतिरेक्यांना प्रशिक्षण देत आहे. दहशतवादी अड्डय़ांमध्ये पाककडे आजमितीला 12 ते 14 हजार प्रशिक्षित...
  July 6, 04:04 AM
 • इस्लामाबाद- पाकिस्तान भारताबरोबर युध्द करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे ते वेगाने अण्वस्त्रे बनवत आहेत तर दुसरीकडे भारतावर हल्ला करण्यासाठी १४ हजार अतिरेक्यांची फौज त्यांनी तयार केली आहे. ते भारतावर कधीही हल्ला करू शकतात असा खुलासा अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. पाकिस्तानच्या एका सक्रिय अतिरेक्याने त्यांना ही माहिती दिली आहे.या अतिरेक्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दहशतवादास प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे असे त्याने...
  July 5, 09:04 AM
 • इस्लामाबाद । पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून स्वित्झर्लंडच्या एका दाम्पत्याचे अपहरण करण्यात आले आहे. लोरालाई जिल्ह्यातील सिरकी या भागात ही घटना घडली. आॅलिव्हर डेव्हीड आणि त्यांची पत्नी डव्ल्यू. ओमेर जंगलातून जात असताना अचानक काही बंदूकधा-यानी त्यांची गाडी अडवली आणि बंदुकीचा धाक दाखवून त्याचे अपहरण करण्यात आले.त्यांची गाडी लोरालाई जवळील किली निगाह येथे सापडली.दांम्पत्याचा कसून शोध सुरु आहे.असे पोलीसांनी सांगितले. स्वीस दाम्पत्याने लोरालाईतप्रवेश केल्यानंतर पोलीस ठाण्यात...
  July 4, 01:09 AM
 • लाहोर- पाकिस्तानमधील कट्टरपंथीय आता शैक्षणिक क्षेत्रातही घुसखोरी करत आहेत. पाकिस्तानमधील महाविद्यालयांमध्ये आता अल कायदाचा मृत म्होरक्या ओसामा बिन लादेनचे कौतुक केले जात आहे. लाहोर मधील एका विद्यापीठाने तर लादेनच्या जीवनावर एक निंबध स्पर्धा आयोजित केली आहे, व जाहिरातीद्वारे लोकांना त्यासाठी आवाहन करण्यात आले.पंजाब विद्यापीठात ही स्पर्धा आयोजित करणा-याने आपली ओळख जाहीर केलेली नाही. कट्टरपंथीय इस्लामी संघटना विद्यापीठामध्ये धार्मिक आणि रूढीवादी विचार बळजबरीने लादण्याचा प्रयत्न...
  July 3, 05:43 PM
 • इस्लामाबाद-पाकिस्तानमध्ये बेरोजगार युवकांना आता आकर्षक पगार देऊन दहशतवादी त्यांच्या गटामध्ये सहभागी करून घेत आहेत. खैबर पश्तून प्रांतातील अनेक बेरोजगार युवकांना दहशतवादी संघटना महिना ४० हजार पगारावर त्यांना भरती करून घेत आहेत.खैबर पश्तून या भागात अनेक दहशतवादी संघटना युवकांना अमिषे दाखवून त्यांची भरती करून घेत आहेत. त्यांना महिना ४० हजार रूपये वेतन देखील देण्यात येत आहे, असे अवामी नॅशनल पार्टी चे खासदार जाहीद अली यांनी सांगितले जंग या उर्दु वृत्तपत्राच्या अहवालात ही बाब समोर...
  July 3, 05:02 PM
 • लाहोर- काश्मीरला राजकीय आणि नैतिक पाठिंबा सुरूच राहील, असे स्पष्ट करून काश्मीरचा मुद्दा जागतिक पातळीवर मांडण्यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला पाठबळ द्यावे, असे आवाहन पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी केले आहे. पाकव्याप्त काश्मिरात गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पीपीपीने ३६ पैकी १९ जागा जिंकल्या. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, विरोधी पक्षांनी आपला सपशेल पराभव आता मान्य करावा आणि काश्मीरच्या मुद्यावर सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा. तरच हा प्रश्न जागतिक...
  July 3, 12:36 AM
 • इस्लामाबाद । सरकारी संस्थेतील अब्जावधीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तीन निवृत्त लष्करी जनरलवर कारवाई करण्याचे निर्देश संसदीय समितीने दिले आहेत. या घोटाळ्यासंदर्भात लष्कराला तपास करून आपला अहवाल देता आला नाही. त्यामुळे अखेर संसदीय समितीने या जनरल विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असे म्हटले आहे. पाकिस्तानच्या लोकलेखा समितीने या विषयी संरक्षण विभागाला आदेश दिले आहेत. हे प्रकरण राष्ट्रीय जाबदायित्व मंडळाकडेही पाठविण्यात आले आहे. खालिद मुनीर खान, मोहमद अफजल मुझफ्फर आणि झहिर अख्तर...
  July 3, 12:30 AM
 • लाहोर -पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खानच्या क्रिकेटपटू ते राजकारणी या जीवनप्रवासावर चित्रपट तयार करण्यात आला असून, तो या वर्षात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये पाकचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या संघर्षासोबत इम्रान खानची तुलना करण्यात आली आहे. एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खानच्या क्रिकेट कारकीर्दीनंतरचा काळ कप्तान या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. 1992ची विश्वकप क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर इम्रान खानने जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती...
  July 2, 04:04 PM
 • वॉशिंग्टन- पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' दहशतवाद्यांना मदत, सुरक्षित जागा देण्याबरोबरच त्यांना लढण्यासाठी प्रशिक्षण, गुप्तचर माहिती व स्फोटके पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेतील संरक्षण विभागातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱयांने केल्याने खळबळ माजली आहे.पेंटागनमधील एक माजी अधिकाऱयांने सांगितले की, अमेरिका सैनिकांवर होणारे ८० टक्के हल्ले हे पाकिस्तानमधील अमोनियम नायट्रेट या स्फोटकावरुन होतात. जनरल (निवृत्त) जैक कीन यांनी म्हटले आहे की, आयएसआयचे प्रमुख अशफाक परवेज कयानी यांची...
  July 1, 04:22 PM
 • नवी दिल्ली- पाकिस्तान जगात सर्वात जास्त अण्वस्त्रे बनवत आहे असे एका अभ्यासात आढळून आले आहे. हाच वेग त्यांनी कायम ठेवला तर येत्या दशकात त्यांच्याकडे २०० च्या आसपास अण्वस्त्रे असतील. अमेरिकेमध्ये झालेल्या या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. पाकिस्तान दोन नवीन अणुभट्टी तयार करत आहे असे या अहवालात म्हटले आहे. या अणूभट्टीच्या मदतीने ते अण्वस्त्रे बनवणार आहेत. पाकिस्तानकडे सध्या १०० पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडे सद्यस्थितीत ८० ते १०० पर्यंत अण्वस्त्रे आहेत असे सांगितले जाते.
  July 1, 09:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात