जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

  • दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती तालिबानच्याच एका मोरक्याने अमेरिकेच्या सैनिकाला दिल्याचा दाट संशय आहे. लादेनचा अतिशय विश्वासू सहकारी समजला जाणारा व तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल बरादर यानेच ही माहिती पुरवली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मुल्ला बरादर आणि अमेरिकन प्रशासन यांच्यात याबाबत एक समझौता झाला होता, अशी बातमी इंग्लंडमधील मिररच्या वेबसाइटवर झळकली आहे. त्यानुसार लादेनला ठार मारल्यानंतर किंवा जिवंत पकडल्यानंतर...
    May 30, 06:14 PM
  • लंडन- तालिबानने लादेनच्या मृत्यूचा अमेरिकेशी सौदा केला होता. तालिबानचा सिनिअर कमांडर मुल्ला बरादरने लादेन राहत असलेल्या पाकिस्तान मधील एबटाबाद येथील घराचा पत्ता सांगितला आणि त्याच्या बदल्यात अमेरिकेने तालिबानचा प्रभाव असलेल्या भागातील आपले सैन्य काढून घेईल असे आश्वासन दिले होते असे ब्रिटनमधील एका वृत्तपत्रात म्हटले आहे. मुल्ला बरादर हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा अत्यंत विश्वासू समजला जातो. आतापर्यंत लादेनचा शोध अमेरिकेने कुरियर आणि त्याचा विश्वासू अबु अहमद कुवेतीच्या...
    May 30, 05:51 PM
  • पाकिस्तानचा अणूकार्यक्रम तीव्र गतीने सुरु असल्याची माहिती पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या चवथी अणूभट्टी 2013पर्यंत कार्यरत होईल. तर पाकिस्तानची अण्वस्त्रे पुर्णपणे सुरक्षित असून दहशतवादी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, असा दावा खान यांनी केलाआहे. खान यांच्यावर दुसऱ्या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान विकण्याचा आरोप होता. सरकारने त्यांना नजरकैदेतही ठेवले होते. गेल्या 10 वर्षांपासून ते अणू कार्यक्रमापासून दुर असले तरीही त्यांना त्याबद्दल पुर्ण...
    May 30, 11:44 AM
  • पाकिस्तानला अल कायदापासून धोका आणखी वाढला आहे. पाकिस्तानच्या नौदलामध्ये अल कायदाचे दहशतवादी घुसले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांचे दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी भारतालाही धोका वाढला आहे. आतापर्यंत गुप्तचर संस्था आयएसआयचे दहशतवाद्यांसोबत लागेबांधे असल्याचे आरोप होत होते. आता पाकिस्तानच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या मेहरान तळावर अल कायदाच्याच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. या...
    May 30, 10:27 AM
  • पाकिस्तान हे एकमेव असे मुस्लिम राष्ट्र आहे की ज्याच्याकडे आण्विक शस्त्रसाठा आहे त्यामुळे त्यांच्या आण्विक शस्त्रसाठयावर हल्ला करण्याचा आमची कुठलीही योजना नाही असे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तान मधील अण्वस्त्रे दहशतवादांच्या हाती पडतील अशी भीती सगळया जगातून व्यक्त केली जात आहे. लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तालिबान पाकिस्तानवर आणि त्यांच्या शस्त्रसाठ्यावर हल्ला करेल असे म्हटले जाते.'आण्विक शस्त्रक्षमता असलेले पाकिस्तान हे एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि आमची त्यावर हल्ला...
    May 29, 10:59 PM
  • इस्लामाबाद - सीआयएच्या एका न्यायवैद्यक पथकाने शनिवारी एबोटाबादेत कुख्यात आंतरराष्ट्रीय अतिरेकी ओसामा बीन लादेनच्या अतिरेकी कारवायांच्या ब्लूप्रिंटचा शोध घेण्यासाठी त्याच्या ठिकाणाची सखोल झाडाझडती घेतली.लादेन अनेक वर्षे लपून बसलेल्या तीन मजली हवेलीमध्ये तब्बल सहा तास कसून झडती घेण्यात आली.ही शोध मोहीम सुरू असताना कोणालाही या हवेलीच्या आसपास फिरकण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.मिडियालाही दूरच ठेवण्यात आले. 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार,सीआयएचे हे पथक हेलिकॉप्टरने...
    May 29, 02:54 AM
  • पाकिस्तान आज पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले. उत्तरेकडील बजौर या आदिवासी भागात तालिबानी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्यात 8 जण ठार झाले. तालिबानविरोधी गटातील दोन आदिवासी नेत्यांचाही त्यात समावेश आहे. मलिक मिया जान आणि मलिक तहसिन खान अशी या दोघांची नावे आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. बजौर भागातल्या पशट बाजारात स्फोट घडवण्यात आला. हा भाग तालिबानविरोधी मानला जातो. या दोन्ही नेत्यांनी तालिबानच्या विरोधात कारवाया केल्या होत्या. त्यामुळे हा भाग टार्गेट केल्याचे बोलले...
    May 28, 05:46 PM
  • नवी दिल्ली- पाकिस्तानातील बंदी घातलेली इस्लामिक संघटना लष्कर-ए-तोयबा ही अल कायदा या संघटनेइतकीच धोकादायक असल्याचे मत अमेरिकेच्या गृहमंत्री जेनेट नोपोलिटानो यांनी नवी दिल्लीत व्यक्त केले.नोपोलिटानो सध्या भारत भेटीवर असून, नवी दिल्लीत आल्या असताना भारतीय सुरक्षा मुख्य अधिकाऱयांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई हल्ल्याला लष्कर-ए-तोयबा जबाबदार असून त्यात १६६ निरपराध लोक मारले गेले. मुंबई हल्ल्याची भारताबरोबरच अमेरिकाही चौकशीची माहिती घेत असून, खरी माहिती...
    May 27, 10:50 PM
  • भारताचा सामरिक दृष्टीने मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण विभागाच्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. २0११-२0१२ या वर्षाच्या अर्थसंकल्पात पाकिस्तानने जनकल्याण निधीवर भर देण्यापेक्षा भारताचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण विभागात यंदा १२ टक्क््यांनी वाढ केली आहे. याशिवाय ३४ अरब रुपये पाकिस्तान इतर सुरक्षा रक्षणांसाठी खर्च करणार आहे. पाकिस्तान सध्या अमेरिकेेबरोबरच चीनकडूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र खरेदी करत आहे. पाकिस्तान सुरक्षेसाठी एकून...
    May 27, 05:18 PM
  • शिकागो... पाकिस्तानी वंशाचा अतिरेकी डेव्हिड हेडली म्हणतो की तहव्वूर राणा या पाकिस्तानी मित्राला मुंबई हल्लयाची माहिती देऊन त्याने चूक केली होती.हेडली ऊर्फ दाऊद गिलानी याने शिकागोतील एका न्यायालयात सांगितले की पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर ए तोयबाने दिलेल्या प्रशिक्षणाचे यामुळे उल्लंघन झाले होते.
    May 27, 02:04 PM
  • वॉशिंग्टन... अखेर पाकिस्तान अमेरिकेपुढे झुकले आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएला एबोटाबाद येथील लादेनच्या घराची झडती घ्यायला पाकिस्तानने सहमती दर्शविली आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या पाकिस्तान दौर्याच्या पूर्वी पाकिस्तानने सीआयएला झडतीची परवानगी दिल्याने या घटनेला विशेष महत्त्व आले आहे. आता अमेरिकेची फोरेन्सिक चमू एबोटाबाद येथील लादेनच्या त्या घरात जाऊन आधुनिक उपकरणांच्या मदतीने भिंतीत आणि जमिनीखाली गाढलेल्या गोष्टींचा तपास करणार असल्याचे...
    May 27, 01:09 PM
  • पेशावर - पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला असून, पश्चिम पाकिस्तानमधील हांगू शहरात न्यायालयाच्या परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जण ठार आणि ४० जण जखमी झाले आहेत.या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी उचलली नाही. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख मोहम्मद सिद्दिकी यांनी हा हल्ला स्फोटकांनी वाहनांनी घडवून आणला आहे. मृतांमध्ये पोलिसांसह स्थानिक लोकांचा समावेश आहे.पेशावरमध्ये नुकताच बुधवारी एक मोठा स्फोट झाला होता.
    May 26, 09:36 PM
  • वॉशिंग्टन - अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानमधील एक कट्टर समुदायाचा नाराजीमुळे पाकिस्तान सरकार अडचणीत आले असून, अमेरिकीनाही आपले काही सैन्य मागे घेण्यास सुरवात केली आहे.अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून अमेरिकेने गेल्या दोन आठवड्यांपासून आपले सैन्य कमी करण्यास सुरवात केली आहे. मात्र, पाकिस्तानी सैन्याला अमेरिकन लष्करातील...
    May 26, 08:56 PM
  • इस्लामाबाद - तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमधील अणुबॉम्बवर ताबा घेण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रिट जनरल' ने तालिबानच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तालिबानची पाकिस्तानच्या अणुभट्टांवर हल्ला करण्याची कोणतीही योजना नसून, पाकिस्तानच्या पूर्ण अणु हत्यारे ताब्यात घेण्याची योजना आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या संबंधांतील वृत्तपत्र असलेल्या द नेशन या वृत्तपत्राने ही माहिती जाहिर केली आहे. कराचीतील वायुदलाच्या तळावर...
    May 26, 07:43 PM
  • शिकागो - मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या डायरीमध्ये पाकिस्तानी लष्करातील मेजर श्रेणीतील दोन अधिकाऱयांचे दूरध्वनी क्रमांक मिळाले आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि तेथील दहशतवादी संघटना जमात-उद-दवा यांच्यामध्ये संबंध असल्याचे या डायरीमुळे स्पष्ट झाले आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी मदत करणाऱया अन्य काही व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांकही हेडलीच्या डायरीत मिळाले आहेत. मुंबईवरील हल्ल्यात आपला हात होता, अशी कबुली डेव्हिड हेडलीने याआधीच शिकागोमधील...
    May 25, 11:06 AM
  • पेशावर - पाकिस्तानातील पेशावर शहरातील एका पोलिस ठाण्यावर बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यात आतापर्यंत दोन जण मारले गेल्याची माहिती आहे. मात्र पोलिस ठाणे उदधवस्त करण्यात आल्यामुळे त्याखाली अनेकजण सापडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडे ३०० किलोग्रॅमची स्फोटके होती. आत्मघाती दहशतवाद्याने या पोलिस ठाण्यावर स्फोटकांसह हल्ला चढविला.स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे आसपासच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले. या ठाण्याजवळ...
    May 25, 11:03 AM
  • इस्लामाबाद - अमेरिकेने आदिवासी पट्ट्यात ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर पाकिस्तान त्याला जशास तसे प्रत्त्युत्तर देईल अशी धमकी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली आहे. अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचे उपसंचालक मायकेल मॉरेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाशा यांनी हा इशारा दिला आहे. तुम्ही ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर आम्हालाही प्रत्त्युत्तर देण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा शब्दात पाशा यांनी मॉरेल यांना सांगितल्याचे वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्युन ने...
    May 23, 03:03 PM
  • इस्लामाबाद - तुरूंगातील महिलांच्या मन:शांतीसाठी त्यांना योगाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न एक पाकिस्तानी महिला करत आहे. आशा छपरा यांनी समाज कार्यामध्ये पदवी प्राप्त केली असून महिलांच्या मन:शांतीसाठी त्यांना योगाचे शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी कॅनडातून परत येण्यापूर्वी दोन वर्षापूर्वीच घेतला होता.तुरूंगात असणाऱ्या महिलांना योग शिकवण्यासाठी तुरूंगाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ईमेल करून परवानगी मागितली होती. गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगातील 30 ते 40 महिलांना त्यांनी योगाचे शिक्षण...
    May 23, 02:48 PM
  • कराची - पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात आल्याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदही भयभीत झाला आहे. पाकिस्तानमध्ये आश्रयास असलेल्या दाऊदने आपल्या मुलाचा लग्नाचा समारंभ रद्द केला असून, पाकिस्तानी सरकारकडून सैनिकांना त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.दाऊद हा भारतातील मोस्ट वॉन्टेड यादीत पहिल्या स्थानावर असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. दाऊद इब्राहिमने आपला मुलगा मोईन याच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी रद्द केली. दाऊद स्वतःच्या बचावासाठी प्रय़त्न करीत असून, पाकिस्तान सरकारही...
    May 23, 10:40 AM
  • कराची - अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या हत्येचा बदला घेण्यास तालिबानकडून सुरवात झाली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी कराचीतील पाकिस्तानी वायुसेनेच्या तळावर हल्ला करून 10 नागरिकांना ठार मारले. तर या हल्ल्यात पाच दहशतवादी सुद्धा ठार झाले आहेत.दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु असून, शहराह-ए-फैसल या वायुसेनेच्या तळावर आणखी नागरिक अडकले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी विदेशी नागरिकांनाही ओलिस ठेवले आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात अमेरिकेकडून...
    May 23, 09:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात