जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद - विधानसभा असो की लोकसभा निवडणूक... भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. विविध प्रचार सभांमध्ये पीएम मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी दावा केला की निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील. काँग्रेसच्या विजयाने पाकिस्तान खुश होईल असे भाजपच्या वतीने सांगितले जाते. परंतु, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याने खरी परिस्थिती याहून उलट असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुद्धा भारतात काँग्रेस...
  April 10, 11:56 AM
 • इस्लामाबाद -भारत १६ ते २० एप्रिल दरम्यान पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत आहे, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी रविवारी केला. पाकिस्तान सरकारला याची विश्वसनीय माहिती मिळाल्याचे कुरेशींचे म्हणणे आहे. मुलतान येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना कुरेशी म्हणाले, ही कारवाई योग्य ठरवण्यासाठी एखादी घटनाही घडवली जाईल. यापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनीही लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार पाकवर आणखी एक हल्ला करू शकते, असे वक्तव्य केले होते. पुलवामा येथे...
  April 8, 09:57 AM
 • इस्लामाबाद -दहशतवादावरून भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर महागाईचे ओझे वाढले आहे. कर्जाचा डोंगर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याची कबुली पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी दिली आहे. सोशल मीडियावरील अर्थव्यवस्थेसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उमर म्हणाले, कर्जाचा मोठा बोजा घेऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जात आहात. ही दरी खूप मोठी आहे. ती भरुन काढावी लागणार आहे. पीएमएल-एन सरकारच्या कार्यकाळात महागाई...
  April 5, 11:11 AM
 • लाहोर - पाकिस्तानात महिलांसोबत किती अमानवीय अत्याचार होतो याचे लाहोर येथील असमा अजीज ही मुलगी एक उदाहरण आहे. असमाने सोशल मीडियावर वीडिओ पोस्ट करत आपली आपबीती सांगितली. तक्रार दाखल दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी मागितले पैसे असमाने पतीच्या मित्रांसमोर नाचण्यास नकार दिल्यामुळे तिचा पती मियाँ फैजलने तिच्या मुंडन केले आणि निर्वस्त्र करून लोखंडाच्या रॉडने मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे गेली असता तक्रार दाखल करण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली. पण असमाचा वीडिओ व्हायरल...
  March 31, 03:17 PM
 • इस्लामाबाद -पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घोडेस्वारांनी मैदानात टेंट पेगिंग महोत्सवात भाग घेतला आहे. त्याचे खानेवाल जिल्ह्यातील तुलुंबा गावात आयोजन करण्यात आले आहे. पोलोसारख्या या खेळाला २४०० वर्षांची परंपरा आहे. या खेळात चेंडूच्या जागी लाकडी ब्लॉक असतो. आयोजनातील स्थानिक नेते शौकत हयात बोसान म्हणाले, हा सामान्य खेळ नाही. हा महागडा व धाेकादायक आहे. तो तरूण खेळतात. यात सहभागी होणाऱ्यास घोडेस्वारीसोबतच तलवारबाजीही यायला हवी. किंबहुना तो त्यात तरबेज असायला हवा. थोडी चूकही कायमचे...
  March 31, 10:14 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानात होळी साजरी होत असतानाच हिंदू समुदायातील दोन तरुणींचे अपहरण करण्यात आले. यानंतर बळजबरी दोघींचे लग्न करून त्यांचा धर्म बदलण्यात आला आहे. यातील एकीचे नाव रवीना असून ती फक्त 13 वर्षांची आहे. तर दुसरीचे नाव रीना असून ती 15 वर्षांची आहे. ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेवर पाकिस्तानातील हिंदू समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच ठिक-ठिकाणी सरकार आणि प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत. पाकिस्तानातील हिंदू समुदाय...
  March 23, 02:07 PM
 • इस्लामाबाद -जिहादी संघटना असतील किंवा जिहादी संस्कृती या दोन्ही गोष्टींना पाकिस्तानात मुळीच थारा नाही. सरकारने राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यावर सर्वच पक्षांची सहमती झाली आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. खरे तर अफगाणिस्तानात सोव्हिएतच्या विरोधातील अमेरिकेच्या युद्धापासूनच प्रदेशात जिहादी संस्कृती व गट सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व तेव्हापासूनचे आहे. अनेक दशकांपासून त्यांच्या कारवाया सुरू आहेत. परंतु आता पाकिस्तानात अशा...
  March 23, 10:51 AM
 • इस्लामाबाद - अतिरेकी संघटनांविरुद्ध कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानने जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रऊफ व मुलगा हम्माद अझहरला अटक केली. या दोघांसह पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांतील एकूण ४४ अतिरेक्यांना अटक केली आहे. गृहमंत्री शहरयार खान आफ्रिदी यांनी मंगळवारी सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सोपवलेल्या दस्तऐवजांत रऊफ व हम्माद यांची नावे होती. १९९९ मध्ये मसूदची भारतीय तुरुंगातून सुटका करण्यासाठी रऊफने इंडियन एअरलाइन्सच्या...
  March 6, 09:47 AM
 • नॅशनल डेस्क - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्याशी संबंधित आणखी एक व्हिडिओ सोमवारी समोर आला आहे. यामध्ये पाकिस्तानी सैनिक आणि अधिकारी अभिनंदन यांना फर्स्ट एड करताना दिसून येत आहेत. 26 फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांचे विमान कोसळले आणि त्यांनी एमरजेंसी एक्झिट केले. पाकव्याप्त काश्मीरात लॅन्डिंग झाल्यानंतर ते मॉबच्या हाती लागले होते. त्याच दरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी त्यांची जमावाकडून सुटका केली. यानंतरच अभिनंदन यांच्यावर प्रथमोपचार करत असतानाचा हा व्हिडिओ टिपला आहे. काय...
  March 4, 04:11 PM
 • इस्लामाबाद - भारतात सध्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेला जैश ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर जिवंत आहे असा दावा पाकिस्तानी मीडियाने केला. भारतात काही माध्यमांनी जैशचा प्रमुख ठार झाल्याचे जारी केले होते. भारतीय माध्यमांचा हा दावा पाकिस्तानी मीडियाने फेटाळून लावला आहे. जिओ उर्दू न्यूजने मसूदच्या कौटुंबिक सूत्रांचा दाखला देत तो ठार झालेला नाही असे म्हटले आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर जिवंत आहे किंवा नाही यासंदर्भात पाकिस्तान आणि भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप...
  March 4, 10:38 AM
 • इस्लामाबाद - कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर सध्या पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात आहे. तो रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयात उपचार घेत आहे. मसूद अझरला किडनीचा आजार आहे. तो इतका आजारी आहे की त्याला घराबाहेर सुद्धा पडता येणार नाही. तत्पूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी अझर पाकिस्तानातच असल्याचे सांगितले होते. सोबतच, तो गंभीर आजारी असल्याचे सुद्धा ते म्हणाले होते. भारताने पुरावे द्यावे, कारवाई करू -पाक वृत्तसंस्थेला एका वरिष्ठ...
  March 3, 10:16 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये बुधवारी सर्वात जास्त हालचाली इस्लामाबादच्या रेड झोन एरिया आणि मुजफ्फराबादच्या लष्करी केंद्रात होत्या. रेड झोन एरियात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे कार्यालय आहे. तेथे सकाळी ८.३० वाजेपासून लष्करी अधिकारी आणि मंत्र्यांचे येणे-जाणे सुरू झाले. तेथे मंगळवारपेक्षा जास्त हालचाली होत्या. तेव्हा भारतीय वायुदलाने बालाकोटवर हल्ला केला होता. परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी वगळता इतर कोणाचे वाहन जास्त थांबले नाही. दुसरीकडे, मुजफ्फराबादच्या लष्करी...
  February 28, 10:08 AM
 • इस्लामाबाद - भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान हाणून पाडल्याचे वृत्त पाकिस्तानने फेटाळून लावले. एवढेच नव्हे, तर उलट पाकिस्ताननेच भारताचे दोन विमान हाणून पाडले आहेत असा दावा पाकच्या संरक्षण दलाने केला आहे. भारतात हल्ले करून परत येणाऱ्या विमानांचा भारताच्या लढाऊ विमानांनी पाठलाग केला होता. ते दोन्ही विमान पाकिस्तानने हाणून पाडले. तसेचत्यातील 2 वैमानिक कथितरित्या जिवंत पकडण्यात आले असून एक वैमानिक जखमी आहे असा दावा सुद्धा पाकिस्तानने केला आहे. परंतु, पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा...
  February 27, 01:49 PM
 • नॅशनल डेस्क - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात जैश ए-मोहम्मदच्या तीन ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राइक केल्या आहेत. तत्पूर्वी दहशतवाद्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्ध सामुग्री लपवून ठेवली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, त्यामध्ये 200 रायफल, असंख्य हातबॉम्ब आणि स्फोटकांसह डिटोनेटर्सचा समावेश होता. याच दारुगोळ्यासह हे दहशतवादी भारतात हल्ल्यांच्या तयारीत होते. वृत्तसंस्था एएनआयने त्यापैकीच एका बालाकोट येथील हल्ल्यापूर्वीचे फोटो जारी केले आहेत. यात दहशतवाद्यांचे ठिकाण दिसून येत आहेत....
  February 26, 04:45 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या ऐतिहासिक कारवाईच्या अवघ्या काही तासांपूर्वी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले होते. पाकिस्तानने वारंवार भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. परंतु, त्याच देशाच्या माजी लष्करशहांनी सध्याची खरी परिस्थिती मांडली. माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करशहा परवेज मुशर्रफ म्हणाले, पाकिस्तानने भारतावर एकही अणुबॉम्ब टाकल्यास पाकिस्तानचे नाव...
  February 26, 04:25 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला, तेव्हापासूनच भारतीयांमध्ये पाकिस्तानविरुद्ध संताप आहे. लोक सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट आणि व्हिडिओ अपलोड करून आपला राग व्यक्त करत आहेत. त्यातच भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तेव्हा देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. यानंतर पाकिस्तानी कशा प्रकारे उत्तर देणार यावर विविध प्रकारचे जोक बनवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानी कव्वालाचा एक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. पाकिस्तानच्या या...
  February 26, 03:38 PM
 • अबूधाबी - जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा वाद शिगेला पोहोचला आहे. पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली. त्याचा फटका पाकिस्तानला बसण्यास सुरुवातही झाली आहे. पाकिस्तानने वारंवार भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. परंतु, त्याच देशाच्या माजी लष्करप्रमुखांनी सद्यस्थितीला असलेली खरी परिस्थिती मांडून पाकिस्तानचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करशहा परवेज मुशर्रफ...
  February 25, 12:51 PM
 • इस्लामाबाद - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईपूर्वीच चोख प्रत्युत्तराच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने आता गुडघे टेकले आहेत. भारताने पाकिस्तानला शांततेसाठी केवळ एक संधी देऊन पाहावी. आम्ही आपल्या बोलण्यावर नेहमीच ठाम असतो असे पाकचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले आहेत. इम्रान खान यांची ही प्रतिक्रिया मोदींनी दिलेल्या इशाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आली आहे. राजस्थानात बोलताना, मोदींनी पुलवामा हल्ल्याच्या दोषींना सोडणार नाही असे म्हटले होते. आधी म्हटले होते पाकिस्तान...
  February 25, 12:25 PM
 • कराची - पुलवामा हल्ल्यानंतर केवळ भारतीयच नव्हे, तर पाकिस्तानी सुद्धा पाकिस्तानच्या इज्जतीचा पंचनामा करत आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पसरवला जात आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनलवर लाइव्ह चर्चासत्र सुरू होते. चर्चेचा विषय होता पाकिस्तान विरुद्ध भारताचे संभावित युद्ध... सुरुवातीला काही तज्ज्ञांनी पाकिस्तानचे कौतुक केले. यानंतर त्याच शोमध्ये बसलेल्या एक्सपर्टने पाकिस्तानची भारताविरुद्ध लढण्याची ऐफत नाही असे सांगितले. पाकिस्तानने आपली तुलना भारतासोबत करणे हीच गोष्ट...
  February 23, 04:18 PM
 • इस्लामाबाद - दहशतवादाला आपल्या भूमीत खतपाणी देणाऱ्या पाकिस्तानची जागतिक स्तरावरून सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने पाकिस्तान सरकारने शुक्रवारी बहावलपूर येथील जैश-ए-मोहंमदचे मुख्यालय ताब्यात घेतले. अतिरेकी मसूद अझहरच्या या संघटनेने पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. संयुक्त राष्ट्र संघाच्या पुलवामा येथील घटनेच्या निषेध प्रस्तावात जैश-ए-मोहंमदचा उल्लेख केला होता. पाकिस्तानचे मित्र राष्ट्र चीनसह १५ प्रबळ राष्ट्रे या परिषदेत आहेत. पाकिस्तान सरकारनुसार,...
  February 23, 10:43 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात