Home >> International >> Pakistan

Pakistan News

  • - 2014 मध्ये मोदींनी शपथविधी सोहळ्यासाटी नवाज शरीफ यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. - सीमेवर फायरिंग आणि दहशतवादी हल्ल्यांच्या कारणामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा बंद आहे. लाहोर - पाकिस्तानचे नेते इम्रान खान हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करू शकतात. इम्रान यांचा पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्ष या सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याच्या विचारात आहे. इम्रान सोमवारी म्हणाले...
    July 31, 04:14 PM
  • पेशावर- आपण ११ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहोत, असे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान यांनी म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतीय सभेच्या सदस्यांना संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे. सदस्यांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, मी खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित केले असून त्याबाबतची घोषणा पुढील ४८ तासांत होईल. याबाबत मी जे काही ठरवले असेल ते लोकांच्याच हिताचे असेल. सिंधच्या...
    July 31, 09:26 AM
  • इस्लामाबाद- पाकिस्तानचे बलाढ्य नेते म्हणून उदयाला आलेले इम्रान खान यांना १४ ऑगस्टपूर्वी सत्ता स्थापन करून पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतील. सध्या सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे रविवारी पीटीआयने स्पष्ट केले. तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. ६५ वर्षीय इम्रान खान यांच्या पक्षाने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला सर्व गृहपाठ पूर्ण केला आहे. त्यामुळेच १४ ऑगस्टपूर्वी इम्रान यांच्याकडे सूत्रे असतील, असे पक्षाचे नेते नाइनूल...
    July 30, 08:28 AM
  • इस्लामाबाद- पाकिस्तानात २५ जुलै रोजी झालेल्या संसदेच्या निवडणुकीत पक्षपातीपणा झाल्याचे युरोपियन युनियन(ईयू )च्या निगराणी दलाने शुक्रवारी म्हटले. ईयूच्या निगराणी दलाने म्हटले, निवडणूक मोहिमेत सर्वांना योग्य संधी देण्यात आलेली नाही. ईयूचे पाकिस्तानातील निवडणूक पर्यवेक्षण मोहिमेचे मुख्य पर्यवेक्षक मायकेल गहलर यांनी मतदानाच्या प्रारंभिक मूल्यांकनाच्या आधारावर म्हटले, निवडणुकीत सर्वांना समान संधी देण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या होत्या. परंतु यात सर्वांना समान आणि...
    July 28, 08:28 AM
  • - नवाझ शरीफ यांच्या पक्षाला कमी समजणे इम्रान यांची घोडचूक ठरेल. - देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारणे डोकेदुखी ठरण्याची शक्यता. इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा - सर्वसाधारण निवडणुकीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता फक्त बाहेरून थोडीशी मदत मिळाली की, पीटीआय प्रमुख इम्रान यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे. परंतु, येथून इम्रान यांचा प्रवास खडतरच असेल. ज्या न्यू पाकिस्तानचे वचन इम्रान यांनी जनतेला दिले...
    July 27, 05:24 PM
  • इस्लामाबाद- क्रिकेटपटू ते राजकीय नेता असा प्रवास केलेले इम्रान खान पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान असतील. त्यांचा पीटीआय हा पक्ष पाक निवडणुकीत १२० जागांवर पुढे आहे. अंतिम निकाल यायचा आहे. दुसरीकडे पीएमएल-एन, पीपीपी या पक्षांनी निवडणूक आयोग आणि लष्करावर हेराफेरीचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, लष्कराने इम्रानला जिंकवण्यासाठी निवडणुकीत घोटाळा केला आहे. पीएमएल-एनचे प्रमुख शाहबाज शरीफ यांनी पत्रपरिषद बोलावून निकाल मानण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही निकाल पूर्णपणे फेटाळत आहोत. लष्कराने...
    July 27, 08:57 AM
  • इस्लामाबाद- पाकिस्तानी किकेटपटू ते राजकीय नेता झालेल्या इम्रान खानने गुरुवारी आपल्या पक्षाच्या विजयाची घोषणा केली. मतमोजणी सुरू असतानाच टीव्हीवर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्याने आपले सरकार गरिबांचे असेल, असे सांगत चीनशी सलोखा कायम ठेवण्याचे संकेत दिले. भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जातील, असेही तो म्हणाले. सध्या पाकमध्ये ११९ जागा घेत इम्रानचा पक्ष पीटीआय आघाडीवर आहे. नवाज शरीफ यांचा पीएमएल-एन ६२ जागांवर तर बिलावल भुत्तोंचा पीपीपी ४४ जागांवर आघाडी घेऊन आहे....
    July 27, 06:31 AM
  • लंडन - इंग्लंडच्या एका न्यायालयाने आपल्या मुलीवर बलात्कार करून 3 मुले जन्माला घालायला लावणाऱ्या 81 वर्षीय बापाला 4 वर्षे 6 महिन्यांची कैद सुनावली आहे. अशरफ खान असे त्या नराधमाचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानी आहे. निकाल देताना कोर्टाने आरोपीला अतिशय दुष्ट आणि नीच म्हटले आहे. या प्रकरणाचा खुलासा पीडित तरुणी मरताना झाला. तिने आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या पतीला यासंदर्भात सांगितले होते. मरताना सांगितली आपबिती... इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायर येथील ब्रॅडफोर्ड शहरात राहणारा अशरफ खान...
    July 27, 12:14 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या निवडणुकीत पाकिस्तान तहरीक ए-इंसाफ सर्वात मोठा पक्ष आणि त्याचे प्रमुख इम्रान खान सर्वात मोठे नेते ठरले आहेत. एकेकाळी इम्रान यांचे नाव जगातील सर्वात प्रसिद्ध महिला राजकीय नेत्यांपैकी एक आणि पाकिस्तानच्या दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांच्याशी देखील जोडण्यात आले होते. पाकच्या राजकीय घराण्यात जन्मलेल्या भुत्तो माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांच्या कन्या होत्या. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्या देखील पाकच्या पंतप्रधान बनल्या. त्या पाकिस्तानच्या...
    July 27, 12:02 AM
  • ही निवडणूक नवा पाकिस्तान मुद्द्यावर लढण्यात आली. सर्व सर्व्हेंमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफला यश मिळणार असल्याचे दाखवण्यात आले होते. पीएमएल-एन, पीपीपी आणि हाफिझ सईदने निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. इस्लामाबादहून सय्यद मसरूर शहा आणि मोना आलम -पाकिस्तानात बुधवारी 272 जागांसाठी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांवरून इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) हा सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ गेलेला दिसत आहे. पक्ष 115 जागा मिळवून सर्वात...
    July 26, 06:04 PM
  • लंडन/कराची - माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानतहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (65) पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला आहे. त्यांची पहिली घटस्फोटीत पत्नी आणि ब्रिटिश जर्नलिस्ट जेमिमा गोल्डस्मिथनेही ट्वीटरवर इम्रानला शुभेच्छा दिल्या. त्यात तिने इम्रानला तिच्या मुलांचा पिता असे संबोधले. तर दुसरी पत्नी रेहम खानने टोमणा मारला आहे. जेमिमाने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले, अपमान, अडथळे आणि बलिदानाच्या 22 वर्षांनंतर माझ्या मुलांचे पिता...
    July 26, 05:28 PM
  • इम्रानने निवडणूक प्रचारात मोदी आणि काश्मीरविरोधी वक्तव्ये केली. एका सभेत इम्रान म्हणाला होता- मोदीला कसे उत्तर द्यायचे, ते मी नवाझला दाखवून देईन. इस्लामाबाद - पाकिस्तानात तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख इम्रान खान (65) हा देशाचा नवा वजीर-ए-आझम (पंतप्रधान) बनणे निश्चित असल्याचे मानले जात आहे. शेजारी देशातील सत्तेतील हा बदल भारतासाठी कसा राहील? यावर पी टीव्हीच्या राजकीय पत्रकार मोना आलम सांगतात की, हा विजय मिळवूनही इम्रानवर लष्कराचा दबाव राहील. यामुळे भारताविषयी त्याची नकारात्मक भावना राहण्याचा...
    July 26, 04:37 PM
  • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाला आणि एकूणच त्यांना मिळालेल्या यशाची अनेक कारणे आहेत. इम्रान खान यांनी अगदी व्यवस्थित व्यूहरचना करून पाकिस्तानच्या राजकारणात हे यश संपादन केले आहे. पाकिस्तानी जनतेकडून इम्रान खान यांना मिळालेला हा पाठिंबा म्हणजे, भ्रष्टाचाराच्या विरोधात विकासाला निवडले असल्याचे म्हटले जात आहे. जगात प्रथमच एखादा क्रिकेटपटून एका देशाचा प्रमुख बनणार आहे. पण त्यासाठी इम्रान खान यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. नेमकी त्यांनी पाकिस्तानी जनतेवर काय...
    July 26, 02:58 PM
  • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर असलेले इम्रान खान आपल्या मालकीची एकही कार नाही असे दावा करतात. त्यांनी निवडणुकीच्या कागदपत्रांमध्ये कारचा उल्लेख केला नाही. तो रकाना रिकामाच ठेवला आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्याकडे कारचे अख्खे कलेक्शन आहे. कार चालवण्याचे शौकीन असलेले इम्रान खान यांच्या ताफ्यात अशीही एक कार आहे जिच्या सध्या चर्चा आहेत. ही कार टोयोटा लॅन्ड क्रूझर प्राडो अशी आहे. पीटीआय प्रमुख खान यांची आवडती कार असलेली प्राडो जितकी शक्तीशाली आहे, तितकीच...
    July 26, 12:57 PM
  • इस्लामाबाद - क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास केलेला पाकिस्तानच्या तहरीके इन्साफ पाकिस्तान पक्षाचा प्रमुख इम्रान खान पाकची सत्ता ताब्यात घेणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा पक्ष आघाडीवर असून इम्रान पंतप्रधान बनणार हे निश्चित समजले जात आहे. पण इम्रान खानचे खासगी आयुष्य अत्यंत वादग्रस्त ठरलेले आहे. जाणून घेऊयात त्याच्या बाबतीत काही खास गोष्टी. राजकारणात उतरण्यापूर्वी क्रिकेटर असलेल्या इम्रानने पाकिस्तानला 1992 मध्ये वर्ल्ड कप विजेता बनवले होते. ऑस्ट्रेलिया आणि...
    July 26, 12:33 PM
  • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी क्रिकेटर आणि पीटीआयचे इम्रान खान सर्वात मोठे नेते म्हणून समोर आले आहेत. त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए-इन्साफ सद्यस्थितीला सर्वातम मोठा पक्ष आहे. क्रिकेटर ते पाकिस्तानचे पंतप्रधान पदाच्या मार्गावर असलेले इम्रान यांनी नुकतेच आपल्या संपत्तीचा दाखला निवडणूक आयोगाकडे जमा केला होता. त्यानुसार, पाकिस्तानच्या भावी पंतप्रधानांकडे 3.8 कोटी पाकिस्तानी रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांनी ही माहिती निवडणुकीत उमेदवारी अर्जासह दाखल केली...
    July 26, 12:23 PM
  • इस्लामाबाद- पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक फेरीत माजी क्रिकेटपटू इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष १०३ जागी आघाडीवर आहे, तर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाला ५९ जागांवर आघाडी मिळाली आहे. २७२ पैकी २०९ जागांचे कल रात्री उशिरा हाती आले. माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पक्ष ३४ जागांवर आघाडी घेऊन किंगमेकर ठरू शकतो. अपक्ष उमेदवारही १८ जागांवर आघाडीवर आहेत. पाक नॅशनल असेंब्लीत एकूण ३४२ सदस्य असून यातील २७२ सदस्य जनतेतून निवडले जातात. ६० जागा महिलांसाठी...
    July 26, 10:35 AM
  • क्वेटा - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे झालेल्या आत्मघातकी स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 30 हून अधिक लोक जखमी असून त्यापैकी अनेक गंभीर असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. क्वेटा येथील एका मतदान केंद्राच्या बाहेर हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघातकी हल्लेखोराला मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा होता....
    July 25, 05:46 PM
  • लाहाेर - पाकिस्तानात बुधवारी नवीन सरकारसाठी मतदान होणार आहे. पाकिस्तानच्या सात दशकांच्या इतिहासात लोकशाही पद्धतीने सत्तेची हस्तांतरण प्रक्रिया राबवली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले, हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद, फैसलाबाद यासारख्या शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढली आहे. चारही राज्यांच्या राजधानीत २५ पोलिस अधीक्षक, ५० पोलिस उपअधीक्षक,...
    July 25, 10:02 AM
  • लाहोर- पाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच निवडणूक प्रचार थांबला. आता बुधवारी नव्या सरकारसाठी मतदान होईल. या वेळी राजकीय पक्षांच्या सभांत डीजेचा नवा ट्रेंड दिसला. पक्षांनी यंदा देशातील प्रख्यात डीजेंना सभांत गाण्यांसाठी बोलावले होते. पक्षांनी थीम साँगही बनवले. डीजेद्वारे गर्दी जमवली जावी आणि समर्थकांत उत्साह यावा हा हेतू. विशेष म्हणजे या सभांत भारतीय गाणीही वाजली. त्यात मेरे रश्क-ए-कमर, साड्डी गली भूल के भी आया करो..वरील रिमिक्स पाकिस्तानी गाणीही होती. पाकिस्तानात १९८० च्या...
    July 24, 09:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED