जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इस्लामाबाद- तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लाच्या बदल्यात डॉ. शकील आफ्रिदी यांची सुटका करून त्यांना अमेरिकेकडे सोपवण्यात यावे, असा सल्ला पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानला दिला आहे. आेसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या लष्करी मोहिमेमध्ये आफ्रिदी यांचीही भूमिका होती. ७४ वर्षीय मुशर्रफ यांनी वॉशिंग्टनमधील ग्रेटा व्हॅन सुस्टिरिनला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केल्याचे डॉन ने म्हटले आहे. तुम्ही राष्ट्राध्यक्ष असता तर...
  May 27, 07:23 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक गल्ली क्रिकेट मॅचचा सीन तूफान व्हायरल होत आहे. या बॉलर एक चेंडू टाकतो. पण, तो बॉलही असा की टप घेऊन उचकतच नाही. बॅट्समननेही अगदी झाडूसारखी बॅट धरली आहे. बॉलकडे जाऊन बॅट्समन वाकतो आणि जमीनीला बॅट टेकवून झाडू लावल्यासारखे शॉट मारण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात अचानक मेलेल्या बॉलमध्ये जणू प्राण येतो आणि बॅट्समनला चकवा देत चेंडू थेट स्टम्पवर (विटा) धडकतो. तेवढ्यात बॅट्समन घोषित करतो आउट.... पण, फलंदाज पठ्ठ्या काही ऐकायला तयार नाही. देवाशप्पथ मी आऊट नाही असा...
  May 24, 11:22 AM
 • इस्लामाबाद-सोशल मीडियावर पाकिस्तानच्या जियो टीव्ही चॅनलच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिअाे सध्या व्हायरल होत अाहे. त्यात पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते नईम-उल हक यांनी कुठल्या तरी मुद्द्यावर संतप्त हाेत केंद्रीय मंत्री दानियाल अजीज यांच्या कानशिलात लगावल्याचे दिसून येत अाहे. हा प्रकार मंगळवारी घडला असून हक व अजीज हे संबंधित चॅनलच्या अापस की बात कार्यक्रमात चर्चेसाठी गेले हाेते. हक यांनी पीटीअाय पक्षाला चोर म्हटल्याचे समजते.
  May 24, 03:56 AM
 • कराची-सूर्य आग आेकत असल्याचा अनुभव कराचीतील नागरिक घेत आहेत. गेल्या तीन दिवसांत ६५ जणांना उष्माघातामुळे प्राण गमावावे लागले आहेत. शहरात काही दिवसांपासून तापमान ४० ते ४४ अंश सेल्सियसदरम्यान आहे. वास्तविक मे महिन्यात कराचीत सामान्य तापमान ३५ अंश सेल्सियस असते. मात्र, संपूर्ण आठवडा तापलेलाच राहील, असे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे. त्यात ऐन पवित्र रमजान महिन्यात वीज कपातीमुळे अडचणींत भर पडली आहे. शवागार चालवणारे इधी फाउंडेशनचे फैजल म्हणाले, तीन दिवसांत रस्त्यांवर १४९ मृतदेह आढळले....
  May 23, 04:49 AM
 • अमेरिकेवर 9-11 चा हल्ला करणारा दहशतवादी अल कायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने 2 मे 2011 मध्ये अबोटाबाद येथे एक मोहीम राबवत ठार केले होते. पण या ऑपरेशनबाबत नेहमीच संशय व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेने लादेनला शोधले की, पाकिस्ताननेच लादेनचा पत्ता अमेरिकेला सांगितला असेही म्हटले जाते. त्यात आता पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख अशफाक कयानी यांच्यावर एक आरोप होत आहे. कयानी यांनी अमेरिकेला लादेन याचा पत्ता सांगितल्याचा दावा एका हेराने केला आहे. अबोटाबाद येथे झालेल्या...
  May 22, 02:45 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने रावळपिंडीतील कृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा निधी मंदिरात पूजा आणि हिंदू उत्सवांच्या अनुरूप करण्यासाठी वापरला जाणार आहे. 2 शहरांत एकच मंदिर कृष्ण मंदिर रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये एकमात्र हिंदू मंदिर आहे. येथे नियमित पूजा केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळा आरती केली जाते. यात 6 ते 7 जणांचा समावेश असतो. लवकरच कामाला सुरुवात - डॉनच्या...
  May 21, 11:28 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात सध्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या महिला पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा त्यांच्या कामामुळे नव्हे तर सौंदर्यामुळे होत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर सध्या त्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लेडी पोलिस ऑफिसरचे नाव डॉ. अनूश मसूद चौधरी आहे. त्या पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पहिल्या महिला ASP (असिस्टेंट सुप्रिटेंडंट ऑफ पोलिस) आहेत. सध्या त्या लाहोरमध्ये एसपी म्हणून...
  May 20, 01:59 PM
 • - मलीहा लोधी म्हणाल्या, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने काश्मीरमध्ये त्यांचे प्रस्ताव पूर्णपणे सादर करावे. - काश्मीरमधील हिंसाचार आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन असे मुद्दे पाकिस्तानकडून उचलले जातात. न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या प्रस्तावांनुसार पॅलिस्टीनी आणि काश्मीर वाद सोडवणे गरजेचे आहे. न्यायाशिवाय शांतता शक्य नाही. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय शांतता विषयावरील...
  May 20, 01:42 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यासंदर्भात कबुली दिल्याच्या 2 दिवसांनंतर घुमजाव केला आहे. शरीफांनी 12 मे रोजी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता अशी कबुली दिली होती. आम्ही दहशतवाद्यांना सीमेपलिकडे जाऊ द्यायचं का? 150 जणांचा बळी घेऊ द्यायचं का? एवढेच नव्हे, तर पाकिस्तानात 3-3 समांतर सरकार चालतात असेही ते म्हणाले होते. या वक्तव्याची पाकिस्तानच्या लष्कराने गंभीर दखल घेतली. तसेच सोमवारी या प्रकरणी तातडीची बैठक...
  May 14, 11:54 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दैनिकाला दिलेली मुलाखत पाकसह भारतातही चर्चेत आहे. मुंबई दहशतवादी हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला याची कबुली त्यांनी दिली आहे. आपल्या पदावरून दूर झाल्याच्या 9 महिन्यांनंतर त्यांनी केलेले हे सर्वात मोठे विधान आहे. पाकिस्तानी मीडियावर यासंदर्भात चर्चासत्र सुरू झाले आहेत. फॅक्टवर नजर ठेवणाऱ्या मोजक्या पाकिस्तानी पत्रकारांनी याबाबतीत भारताचे समर्थन केले. पाकिस्तानी मीडियाने यापूर्वी अनेक मुद्यांवर भारतातील...
  May 13, 03:09 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानने शनिवारी रस्ते अपघातातील आरोपी अमेरिकेचे राजनयिक कर्नल जोसेफ इम्यॅनुएल हॉल यांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेने आपल्या राजनियक अधिकाऱ्यासाठी विमान पाठवले होते, मात्र पाकिस्तान प्रशासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. हॉल यांच्यावर आरोप आहे की 7 एप्रिल रोजी त्यांनी सिग्नल तोडून एका बाइकला धडक दिली होती. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. नशेत गाडी चालवण्याचा आरोप - पाक मीडियातील वृत्तानुसार,...
  May 13, 02:07 PM
 • इस्लामाबाद -भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदावरून बडतर्फ झालेले नवाझ शरीफ यांनी प्रथमच पाक दहशतवाद्यांना अभय देत असल्याचे मान्य केले आहे. तसेच २६/११ चा मुंबई हल्ला पाकिस्तानातून गेलेल्या अतिरेक्यांनीच केल्याचेही कबूल केले. २००८ मध्ये झालेल्याया हल्ल्यात १६६ लोक मृत्युमुखी पडले होते. एका मुलाखतीत नवाझ शरीफ म्हणाले की, दहशतवादाला मदत केल्यामुळेच पाकिस्तान जगात एकटा पडला आहे. देशात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. भलेही ते पाकिस्तानी नसतील, परंतु त्यांना मुंबईत...
  May 13, 01:24 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानने म्हटले आहे की अलीगड मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) मोहम्मद अली जीन्ना यांच्या तस्वीरीवरुन सुरु असलेला वाद दाखवतो की भारतात मुस्लिम आणि पाकिस्तानबद्दल किती असहिष्णू आणि पूर्वग्रहदुषित वातावरण आहे. एएमयूमधील जिन्ना यांचा फोटो काढावा यासाठी हिंदू संघटना आणि उजव्या विजारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी आग्रह धरला आहे. त्यावरुन वादही झाला होता. जिन्ना यांची तस्वीर 1938 पासून - पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी म्हटले आहे, की...
  May 11, 10:47 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. - 2012 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना समान नागरी अधिकार देण्याचे आदेश जारी केले. - त्यांना...
  May 9, 02:01 PM
 • इस्लामाबाद- पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतात अब्जावधी रुपयांचा काळा पैसा जमा केल्याचा आरोप होत आहे. जिओ न्यूजनुसार नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने स्थानिक माध्यमातील बातमीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. वृत्तानुसार शरीफ व इतरांनी भारतात कथितरीत्या सुमारे ३२ हजार कोटी रुपये अवैधरीत्या दडवले आहेत. ही रक्कम चक्क भारताच्या अर्थ मंत्रालयात जमा करण्यात आली आहे. यामुळे भारताची परकीय चलन गंगाजळी प्रचंड प्रमाणात वाढली. तसेच पाकिस्तानला यामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागले,...
  May 9, 05:16 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे केंद्रीय गृहमंत्री एहसान इकबाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याचे वय फक्त 22 वर्षे असून त्याने केंद्रीय मंत्र्यांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. तरीही या हल्ल्यामागे मास्टरमाइंड कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. केंद्रीय मंत्री एहसान इकबाल आपला मतदार संघ नरोवल येथे एका सभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांना...
  May 7, 11:39 AM
 • क्वेटा - पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात खाणकाम सुरू असताना अचानक गॅस ब्लास्ट झाला. या स्फोटात 18 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तसेच अनेक मजूर जखमी झाले आहेत. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, क्वेटा शहरातील मारवार परिसरात शनिवारी खाणकाम सुरू होते. त्यावेळी मुख्य खाणीत मिथेन वायूची गळती झाली आणि इतर खाणींमध्ये पोहोचली. त्यामुळे येथील खाणीत स्फोट झाला. ब्लास्टच्या वेळी आतमध्ये मजूर काम करत होते. याच परिसरात असलेल्या दुसऱ्या खाणीत दरळ कोसळली. त्यामुळे दोन्ही खाणींमध्ये झालेल्या...
  May 6, 04:21 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात दोन खाणींमध्ये झालेल्या स्फोट आणि दरडकोसळीच्या घटनेत किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडा 18 असला तरीही 27 जणांचा यात बळी गेल्याचे सांगितले जात आहेत. पाकिस्तानात खाणकामगारांचे आयुष्य नरकयातनांपेक्षा कमी नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस जणू जगण्यासाठीचा संघर्ष असतो. खाणकाम करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे तंत्रज्ञान नाही. हातांनी वापरल्या जाणाऱ्या फावडा, कुडाळ आणि कुऱ्हाडांचा ते वापर करतात. त्यातून मिळणारी कमाई सुद्धा इतकी कमी की दोन...
  May 6, 02:05 PM
 • इस्लामाबाद - लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडिओ करून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पाकिस्तानात भांडाफोड झाला आहे. ही टोळी पाकिस्तानातील गरीब मुलींशी विवाह करून त्यांच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. पीडित तरुणींनी पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रिटनमध्ये राहणारे पाकिस्तानी पुरुष लग्नासाठी पाकिस्तानी मुलींना अडकवत होते. त्यांनी कित्येक पाकिस्तानी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. - पत्रकार परिषदेत आलेल्या बहुतांश पीडित...
  May 6, 11:08 AM
 • पेशावर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात कुटुंबियांच्या मर्जीनेच एका तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पंजाब प्रांतातील टोबा टेक सिंग शहरात 21 मार्च रोजी घडला असून नुकताच समोर आला. आपल्याच कुटुंबातील मुलीवर दुसऱ्याने बलात्कार करायचा हा निर्णय गावातील 12 लोकांनी चर्चा करून घेतला. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेल्या या कृत्याला पाकिस्तानात न्याय म्हटले जात आहे. काय आहे प्रकरण? - 20 मार्च 2018 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका तरुणीवर...
  May 6, 10:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात