Home >> International >> Pakistan

Pakistan News

 • इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाघा-अटारी सीमेवरील आहे. पाकिस्तानी जवान आणि बीएसएफ जवानांची फ्लॅग-डाउन परेड सेरेमनी सुरू होती. त्यावेळी अचानक हसन अली जवानांच्या बाजूला आला आणि त्यांची नक्कल करण्यास सुरुवात केली. सेरेमनी पाहण्यासाठी पाकिस्तानी संघ देखील उपस्थित होता. तो पाकिस्तानी जवानांची नक्कल उतरवत होता. त्यावर बीएसएफने नाराजी व्यक्त केली आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा, तो व्हिडिओ...
  03:20 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या एका कथित मौलवीला महिलेने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर शेअर होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे. यात मार खाणारा लहान मुला-मुलींना अरबी शिकवणारा मौलवी आहे. तर त्याला काठीने बेदम मारहाण करणारी महिला त्या मौलवीकडे शिकण्यासाठी येणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीची आई आहे. - या व्हिडिओमध्ये एक महिला अचानक एका मदरशात काठी घेऊन शिरते आणि रागात बोलतानाच एका मौलवीची धुलाई सुरू करते. तो माणूस मार खात असतानाही काहीच विरोध करत...
  April 22, 06:34 PM
 • इस्लामाबाद-भारतीय कैदी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तान १७ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला जबाब दाखल करण्याची शक्यता आहे. १७ एप्रिल रोजी भारताने दाखल केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून नवीन शपथपत्र दाखल करणार आहे. भारताकडून दाखल केलेल्या शपथपत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतरच या प्रकरणात काही पावले उचलली जाऊ शकतात, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. डॉनच्या मते, या खटल्यात सुरुवातीला पाकिस्तानची पैरवी करणारे खावर...
  April 20, 06:44 AM
 • स्पेशल डेस्क - कठुआ येथे झालेल्या 8 वर्षीय मुलीवर अमानुष कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विविध ठिकाणी मोर्चे काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पण, त्याच आरोपींच्या समर्थानातही काही लोक मोर्चे काढताना दिसून आले. त्याच समर्थकांपैकी 2 भाजप मंत्र्यांना राजीनामा देखील द्यावा लागला. पाकिस्तानवर इतर मुद्द्यांवर कितीही टीका करण्यात येत असली तरीही बलात्काराच्या एका प्रकरणात आपल्या शेजारील राष्ट्राने एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. पाकिस्तानात एका 7 वर्षीय...
  April 18, 02:10 PM
 • लाहोर- पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इजाज उल एहसान यांच्या निवासस्थानी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काही तासांच्या अंतराने दोन वेळा गोळीबार केला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त डॉन ने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी पनामा गेट प्रकरणाची सुनावणी केली होती त्यात न्यायमूर्ती एहसान यांचा समावेश होता. या पीठाने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरवण्यात आले होते. गोळीबाराबद्दल माहिती...
  April 16, 02:00 AM
 • इस्लामाबाद-भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सार्वजनिक पदासाठी हयातभर अपात्र असल्याचा निवाडा दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या पीठाने सर्वानुमते संविधानातील लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्याचा नियम तहहयात लागू केला जातो, असे न्यायालयाने निकालाद्वारे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा नियम लागू करण्याच्या कालावधीवरून निर्माण झालेला संशय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता संपला आहे, असे...
  April 14, 02:00 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करणाऱ्या गायिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लोक गायिका समीना समून 24 वर्षांची होती. गोळीबार करणाऱ्यांनी सुरुवातीला तिच्यावर पैशांचा पाऊस पाडला. स्टेजवर जाऊन तिला उभे राहून परफॉर्म करण्यास सांगितले. पण, ती वारंवार खाली बसून गात असल्याने तो चिडला. त्याच ठिकाणी सर्वांसमोर तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. 6 महिन्यांची गर्भवती होती समीना - पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिंध प्रांतातील एका...
  April 12, 04:48 PM
 • इस्लामाबाद- मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद आणि त्याच्या जमात-उद-दावा या संघटनेसह गृह मंत्रालयाच्या निगराणी यादीतील सर्व दहशतवादी गट आणि दहशतवाद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा विचार पाकिस्तान करत आहे. त्यासाठी एका विधेयकाच्या आराखड्यावर काम सुरू आहे. पाकिस्तानच्या अध्यक्षांनी अध्यादेश जारी करून गृह मंत्रालयाच्या निगराणी यादीतील प्रतिबंधित संघटना आणि व्यक्तींवर बंदी घातली आहे. आता हे विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल, असे वृत्त द डॉन या वृत्तपत्राने दिले आहे....
  April 9, 12:30 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खानला झालेल्या शिक्षेवरुन मुक्ताफळे उधळली आहेत. पाकचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, सलमानला 5 वर्षांची शिक्षा झाली, कारण तो अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजाचा आहे. भारतातील भेदभाव यातून दिसून येतो. जिओ न्यूजच्या शो कॅपिटलला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले, ज्या समाजाची भारतात सत्ता आहे त्या समाजाचा सलमान असता तर कदाचित त्याला एवढी कडक शिक्षा झाली नसती, कोर्टाने त्याचा सहानुभूतीपुर्वक विचार केला असता. त्यांनी...
  April 6, 10:08 AM
 • लाहोर- पाकिस्तानातील उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला थेट समाजसुधारकच संबोधले आहे. त्याच्या जमात-उद-दावा, फलाह -ए-इन्सानियत फाउंडेशन या लोककल्याणकारी संघटना व संस्था आहेत. मात्र, पाक सरकारने त्यांच्यावर निर्बंध लादून त्यांना सेवेपासून वंचित केले आहे, असे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाक सरकार हकनाक त्याला रोखत असून समाजकार्यापासून विचलित करत असल्याची टिप्पणी कोर्टाने केली. पाक सरकारने हाफिज सईदला त्रास देऊ नये. मंगळवारी कोर्टाने यासंंबंधीचे...
  April 6, 01:00 AM
 • इस्लामाबाद- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने अतिरेकी व अतिरेेकी संघटनांची नवी यादी जारी केली. त्यात मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेसह १३९ नावे पाकिस्तानमधील आहेत. भारताचा मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या नावाचाही यादीत समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार, दाऊदकडे अनेक नावांनी पाकिस्तानी पासपोर्ट आहेत. हे पासपोर्ट रावळपिंडी व कराचीतून जारी झाले आहेत. पाकिस्तानमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर अयमान अल...
  April 5, 02:00 AM
 • इस्लामाबाद - तालिबानी हल्ला झाल्याच्या 6 वर्षांनंतर प्रथमच मलाला पाकिस्तान दौऱ्यावर आहे. यात ती खैबर-पख्तूनख्वा प्रांतात स्वात जिल्ह्यातील मिंगोरा गावात पोहोचली आहे. याच ठिकाणी मलालाचे जुने घर होते. हीच ती जागा होती, ज्या ठिकाणी तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तासह तिला हेलिकॉप्टरने इस्लामाबादहून या गावात आणण्यात आले. लंडनमध्ये स्थायिक झालेली मलाला 2 एप्रिल पर्यंत पाकिस्तानातच राहणार आहे. काय म्हणाली... मलालाने पंतप्रधान...
  March 31, 04:22 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सीमारेषा ओढल्याने किंवा देशाची फाळणी झाल्यानंतरही त्याचा इतिहास बदलत नाही असे म्हटले जाते. पाकिस्तानात आजही हिंदूंची अनेक ऐतिहासिक मंदिर त्याचीच उदाहरणे आहेत. कराची येथील 1500 वर्षे जुने पंचमुखी हनुमान मंदिर त्यापैकीच एक आहे. या मंदिरातील हनुमान मूर्ती हजारो वर्षे प्राचीन आहे. या ठिकाणी एकेकाळी स्वयं भगवान श्री राम यांचे एकदा आगमन झाले होते अशी अख्यायिका आहे. यामुळे खास आहे मंदिर... - या मंदिरातील पंचमुखी हनुमान मूर्ती काही सामान्य मूर्ती नाही. कारण, यामध्ये हनुमानाची...
  March 31, 11:03 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मातली जिल्ह्यात 25 मार्च रोजी 500 हिंदूंना बळजबरी मुसलमान बनवण्यात आले. धर्म परिवर्तनचा हा खेळ खेळला पाकचा माजी राष्ट्रपती- लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ याचा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगने. व्यासपीठावर मुख्तयार जान सरहदी, पीर सज्जाद जान सरहदी आणि पीर साकिब जान सरहदी यांनी कलमा पढला आणि समोर उभ्या 500 हिंदूंना पुनरुच्चार करायला सांगितले. त्यांनी पुनरुच्चार केल्यानंतर त्यांना मुसलमान घोषित करण्यात आले. या आयोजनावर असेच म्हणण्यात आले होते की, या...
  March 30, 04:28 PM
 • इस्लामाबाद - मलाला युसूफझाई हिचे पाकिस्तानमध्ये आगमन झाले असून पाकिस्तान सरकारने तिचे सहर्ष स्वागत केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने पुढाकार घेतला होता. त्यामुळे तिला तालिबानी दहशतवाद्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. तालिबान्यांच्या हल्ल्यातून बचावल्यानंतर तिने परदेशात आश्रय घेतला होता. मलाला युसूफझाई ही सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती आहे. पाकिस्तानात आगमन झाल्यानंतर मानवी हक्क कार्यकर्ती मलालाने पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींची भेट घेतली. अब्बासींच्या...
  March 30, 03:39 AM
 • पेशावर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात कुटुंबियांच्या मर्जीनेच एका तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पंजाब प्रांतातील टोबा टेक सिंग शहरात 21 मार्च रोजी घडला असून नुकताच समोर आला. आपल्याच कुटुंबातील मुलीवर दुसऱ्याने बलात्कार करायचा हा निर्णय गावातील 12 लोकांनी चर्चा करून घेतला. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेल्या या कृत्याला पाकिस्तानात न्याय म्हटले जात आहे. काय आहे प्रकरण? - 20 मार्च 2018 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका तरुणीवर...
  March 28, 11:48 AM
 • न्यूयॉर्क - येथील जॉन एफ केनडी एअरपोर्टवर सुरक्षेच्या नावावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान यांची झडती घेण्यात आली. पाकिस्तान मीडियाने हा दावा केला आहे. ही एक रुटीन प्रोसेस असल्याचे सांगितले जात आहे. पण पाकिस्तानातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार प्रोटोकॉलच्या विरोधी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. खासगी दौरा असल्याने घेतली झडती? - असे सांगितले जात आहे की, काही दिवसांपूर्वी खाकान त्यांच्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. हा त्यांचा खासगी दौरा होता. पण या...
  March 28, 10:31 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात प्रथमच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले आहे. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. - 2012 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना समान नागरी अधिकार देण्याचे आदेश जारी केले. -...
  March 26, 05:02 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात प्रथमच ट्रान्सजेंडर महिलेने न्यूज बुलेटिन वाचले आहे. खासगी वृत्तवाहिनी कोहिनूर न्यूज चॅनलने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिची अँकर म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामिक देशात समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांविषयी नेहमीच दुर्लक्ष केले जाते. अशात कोहिनूर न्यूज चॅनलने मार्वियाला अँकर करून एक नवे उदाहरण प्रस्तुत केले आहे. वृत्तवाहिनीच्या या निर्णयाचे जगभरात कौतुक केले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानच्या संसदेत याच...
  March 26, 03:08 PM
 • भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास भगतसिंहांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना या वीर सुपूत्राने हसत-हसत फासावर जाणे स्वीकारले होते. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना ब्रिटीश शासनाने फासावर लटकवले होते. या घटनेला आता 87 वर्षे होत आहे. मात्र आजही आमच्या मनात आणि स्मरणात भगतसिंह आहे. भगतसिंहांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, आणि जिथे त्यांचे बालपण गेले ते घर आजही आहे. ते घर आता पाकिस्तानात आहेत. - भगतसिंहांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी...
  March 23, 08:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED