आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशोत्सव 2020:मनुष्यातील आठ उणिवा दूर करण्यासाठी दरवर्षी येतात प्रथमपूज्य गणेश

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी सुरक्षेसाठी द्वारपाल गणेशाची पूजा करा...

जीवनाशी संबंधित कथांच्या बाबतीत श्री गणेश अद्वितीय आहेत. त्याची दोन प्रमुख रूपे आहेत- प्रथमपूज्य आणि लोकमंगल. ही दोन्ही रूपे सध्याच्या काळात आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत. ब्रह्माने विश्वाची निर्मिती करण्यापूर्वी आधी वक्रतुंडाची उपासना केली होती. त्यामुळे गणपतीला प्रथम पूजनीय व्हावेच लागले. गणेशाशी संबंधित दोन प्रमुख साहित्य आहेत. - गणेश पुराण आणि मुद्गल पुराण. गणपती बाप्पाच्या आठ प्रमुख अवतारांचे वर्णन मुद्गल पुराणात आहे. या आठही अवतारांत बाप्पाने दुर्गुणांचे प्रतीक असलेल्या असुरांचा विनाश केला होता. मत्सर (ईर्षा), मद, मोह, लोभ, क्रोध, काम, ममता आणि अहं. हे सर्व दुर्गुण तर आहेच, शिवाय राक्षसांची नावेही आहेत. गणेशाच्या आठ अवतारांच्या कथेत जितकी पात्रं आली आहेत ती आपल्यातील दुर्गुणांचे प्रतीकं आहेत. त्यांना गणेशाने जी वागणूक दिली त्यातही मोठा संदेश आहे. या आठही असुरांना त्याने मारले नाही, तर पराक्रमाने शरण आणले. यातून दुर्गुणांना चांगल्या आचरणानेच नियंत्रणात आणता येते हा संदेश मिळतो. संसारात चांगले होईल तसे काही वाईट घटनाही घडतील. मी विवेकाची देवता आहे. तुम्हाला विवेक प्रदान करेल. त्यातून सद्गुण-दुर्गुणांची निवड तुम्हाला करायची आहे. आठही अवतारांमधून चांगल्या-वाईटाची निवड करणे आपल्या हातात असल्याचाही संदेश यातून मिळतो.

यावर्षी उत्सवाचे स्वरूप : लोकमान्य टिळकांनी पुण्यात जेव्हा गणेशोत्सव सुरू केला तेव्हा तो स्वातंत्र्यसंग्रामाचा भाग झाला होता. पण आज तो आमच्या संस्कृतीचा प्रमुख उत्सव आहे. यावर्षी या उत्सवाचे हे १२७ वे वर्ष आहे. कोरोना महामारीमुळे तो संयमित रूपात साजरा करायचा आहे. गणपती बाप्पाच्या लोकमंगल या छबीप्रमाणेच नऊ दिवस नव्या दृष्टिकोनातून तो आपण साजरा करायला हवा.
श्री गणेशाने ८ अवतार घेऊन या विश्वाला ८ दुर्गुणांपासून मुक्त केले. दरवर्षी गणेशोत्सवात याच दुर्गुणांपासून दूर राहण्याचा संकल्प होतो.

जीवन-जीविकाचेे रक्षक गणेश : श्री गणेश आणि हनुमानजी हे शिव परिवाराचे सदस्य आहेत. हनुमानजींबाबत तुलसीदास लिहितात- राम दुआरे तुम रखवारे। होत न आज्ञा बिनु पैसारे। म्हणजे तुम्ही रामाचे द्वारपाल आहात. तसेच गणपती आधी पार्वतीचेे द्वारपाल झाले. कैलास पर्वतावर शिव-पार्वतींना भेटायला परशुराम जात होते तेव्हा द्वारपाल गणेशाने त्यांच्याशी युद्ध केले. परशुरामाने केलेल्या प्रहारात त्याचा एक दात तुटला. त्यामुळे गणपती हे एकदंत झाले. या वर्षी गणेशाची प्रतिष्ठापना करताना ही छबी मनात ठेवावी व सर्वाची रक्षा करा, अशी प्रार्थनाही करावी. तुमच्यापासून प्राप्त झालेला विवेक आम्हा सर्वांचे रक्षण करेल हा भावही ठेवा.