आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषदुसरा श्रावण सोमवार:महादेवाला अर्पण करावी तिळाची शिवामूठ, अशाप्रकारे करावे शिव पूजन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्रावण महिना सुरु असून (8 अगस्स्ट) दुसरा श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक आहे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. यानिमित्ताने औरंगाबादचे वेदमूर्ती अनंत पांडव यांच्याकडून आम्ही दिव्यमराठीच्या वाचकांसाठी श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा विधिवत नेमकी कशी करावी हे सविस्तरपणे जाणून घेतले आहे. वरील व्हिडिओवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सोमवारी महादेवाची पूजा करण्याचा आणि महिलांनी शिवमूठ वाहण्याचा सामान्य विधी...

असे करावे महादेवाचे पूजन
सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर घरातच व्रत करण्याचा संकल्प करावा. या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे. दिवसा फलाहार तसेच दुध घेऊ शकता.

संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचे दुध अर्पण करावे. त्यानंतर फुल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करावे. या सर्व गोष्टी अर्पण करताना शिव मंत्र - ऊँ महाशिवाय सोमाय नम: किंवा ऊँ नम: शिवाय। या मंत्राचा जप करा.

जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते. या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करू शकता.

प्रत्येक महिलेने वाहावी शिवमूठ
दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ वाहायची. ती वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा ही, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. या दिवशी सायंकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून देवास बेल वाहावा. अशा प्रकारे व्रत पार पाडतात.

बातम्या आणखी आहेत...