आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 4 जानेवारी 2023 रोजी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव पडेल. व्यवसायात आज आवक मनासारखी राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारावी लागेल.
वृषभ | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : १
आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट असेल. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्च कराल.फारच सडेतोड बोलून कुणाच्या भावना दुखावू नका.
मिथुन | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ३
काहींना तातडीचे दूरचे प्रवास घडतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे.
कर्क | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : १
व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकीयांत तुमच्या शब्दास किंमत राहील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.
सिंह | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : २
आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांना फक्त दुरूनच रामराम करा.
कन्या | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ४
उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल दिवस असून नाेकरीतही वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड होईल.नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील.
तूळ | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ८
आज धाडसाची कामे टाळावीत. झटपट लाभाचा मोह तर नकोच. विवाहविषयक बोलणी आज नकोत. जास्त लाभाच्या आशेने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.
वृश्चिक | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावाखाली राहील. पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.
धनु | शुभ रंग:क्रीम, शुभ अंक : ८
नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.
मकर | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ६
तरुण वर्गाचा आज मौजमजा करण्याकडे कल असेल. स्वत:ची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वत:साठी वेळ काढतील. प्रकृती धडधाकट राहील.
कुंभ | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ७
नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. गृहिणींना थोडा थकवा जाणवेल.
मीन | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ९
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. गृहिणी शेजारधर्म जपतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.