आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अध्यात्मिक:नेहमी मोहावर नियंत्रण ठेवणेच आपल्या कर्तव्याचे यश आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहाला नियंत्रणात ठेवा. हेच आपल्या कर्तव्याचे यश आहे. आपले कर्तव्य सन्मानाच्या रूपात असावे. आपल्याला याचा गर्व नसावा.

संकटाच्या या काळाने आपल्याला खूप काही शिकवले. यातल्या अनेक गोष्टी आपल्या पूर्वीपासून माहीत आहेत, पण आपण त्या मानत नव्हतो. स्वत:ची काळजी कशी घ्यावी, संयम कसा ठेवावा, कर्तव्याचे महत्त्व काय, दान केव्हा करावे आणि आपले जुने नियम आता कसे उपयोगी पडत आहेत, हे या संकटाने आपल्याला शिकवले.

संकटे आपल्याला सावरणे शिकवतात. माझ्या बालपणची गोष्ट आहे. मी शाळेत जात असताना पावसात मला छत्री मिळायची नाही, कारण माझ्या एका पुस्तके असायची. छोटा मुलगा एका हाताने छत्री कशी सांभाळेल, म्हणून मला पोते दिले जायचे. मुसळधार पाऊस आणि हवेच्या झोतांमुळे छत्री सांभाळणे अवघड असते. मग आमच्या गुरुजींनी आम्हाला दप्तरही दिले आणि छत्रीही. मग हळूहळू आम्ही दोन्ही एकत्र हाताळणे शिकलो. जबाबदारी सावधपणे पेलणे हा हे सांगण्याचा उद्देश आहे. सध्या अशी सावधानता आणि जबाबदारीची आवश्यकता आहे. छत्री आणि दप्तर दोन्हीही वादळात व्यवस्थित सांभाळणे कठीण काम आहे, पण आता ते नीटपणे होते, कारण आम्हाला त्या दोन्ही वस्तू एकाच वेळी मिळाल्या.

मग संयमाची बाब येते. या कठीण काळात काही लोक असे म्हणत आहेत की, सध्या कोणीही या चारित्र्याचे पालन करू शकत नाही. ज्यांना कधी मुनी (सज्जन, संयमी व्यक्ती) व्हायचे नाही आणि कुणाला होऊही द्यायचे नाही. आपण सहसा जास्त काळ आपल्या भावना स्थिर ठेवू शकत नाही. परंतु साधनेचा अर्थ असा आहे की आपण आपल्या भावना स्थिर ठेवल्या पाहिजेत आणि मोक्षमार्गाशी जुळवून घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, धरणात पाणी थांबवले जाते आणि त्याला योग्य दिशा दिली जाते, अन्यथा अनियंत्रित पाणी पुराच्या रूपाने हाहाकार माजवते; त्याच प्रकारे आपल्या जीवनासाठी संयमदेखील आवश्यक आहे. मी आणखी एक उदाहरण देतो. जसे संत्री आणि मोसंबीची साल जाड असते, परंतु आतल्या फोडी मऊ आणि गोड असतात, म्हणून साल असे म्हणते की, तुम्ही सर्व एकत्र राहा, संयम ठेवा, मी तुमचे रक्षण करीन.

त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या कर्तव्यामध्ये गुंतले पाहिजे. उदाहरणार्थ, एखादी रेल्वे रुळांवरून उतरली असेल तर त्यात प्रवासी जरी बसलेले असतील, तर इंजिनदेखील लावलेले असेल, परंतु ती पुढे जाऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे मोक्षमार्गात होते. आपले कर्तव्य करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. कर्म खूप सामर्थ्यवान असते, म्हणून नेहमी मोहाला नियंत्रणात ठेवा. हेच आपल्या कर्तव्याचे यश आहे. आमचे कर्तव्य सन्मानार्थ असावे. याचा आपल्याला कधीही गर्व वाटू नये.

अशा कठीण काळात दान व पुण्याचेही खूप महत्त्व असते. मी नेहमी म्हणतो, अर्थाचे (धन) अर्जन विशेष पुण्याच्या उदयातून होते. परंतु त्या अर्जित अर्थाचा सदुपयोग पुण्योदयाचे नव्हे, तपश्चर्येचे फळ आहे. आपण कितीही छोटे किंवा मोठे दान दिले हे महत्त्वाचे नसते, तर कोणत्या वेळी आणि कोणत्या परिस्थितीत दान केले हे महत्त्वाचे आहे. असे करण्यास कदाचित आपले संपूर्ण आयुष्य लागू शकेल, परंतु ते इतिहासाचे एक अतिशय महत्त्वाचे पान मानले जाईल.

या वेळी आपण सर्वांनी कोरोना संकटातून मिळालेल्या इतर अनेक धड्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोनाने आपल्याला गरम पाणी पिण, पायी चालणे, मेहनत करणे, भजन करणे इ. शिकवले. हे आधीही सांगितले जात होते, पण आता आपल्याला कळले की शाळेसाठी इमारत नव्हे, संस्कार हवे असतात. आहारावर नियंत्रण ठेवल्यास आजारावर अंकुश लावला येतो, हे आता आपण कबूल करतो. शारीरिक अंतर ठेवण्याचा नियमही आता सांगितला जात आहे. आगमामध्ये सांगितले आहे की, गुरूंचे, ईश्वराचे दर्शन कसे करावे? आचार्यांचे ५ हात, उपाध्यायांचे ६ हात आणि साधू-संतांचे ७ हात अंतरावरून दर्शन घ्यावे, असे विधान आहे. कोरोनामुळे आपण हेच करत आहोत. दुरून दर्शन घेण्यातच हित आहे.

- मोहाला नियंत्रणात ठेवा. हेच आपल्या कर्तव्याचे यश आहे. आपले कर्तव्य सन्मानाच्या रूपात असावे. आपल्याला याचा गर्व नसावा.

- कोरोनाने आपल्याला गरम पाणी पिणे, पायी चालणे, मेहनत करणे, भजन करणे इ. शिकवले. हे आधीही सांगितले जात होते, पण आता आपल्याला कळले की शाळेसाठी इमारत नव्हे, संस्कार हवे असतात.

- दान किती छोटे वा मोठे आहे, याला कधीही महत्त्व नसते. केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत दान दिले, हे महत्त्वाचे आहे.

आचार्य श्री विद्यासागरजी महाराज