आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत अधिक महिना:अधिक मासात 25 दिवस खरेदीसाठी शुभ; गुंतवणूकही करा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिक महिना, देवाची भक्ती व धार्मिक विधींचेही पूर्ण फळ मिळेल

18 सप्टेंबरपासून अधिक महिना सुरू होत आहे. अधिकस्य अधिक फलम् म्हणजे अधिक महिन्यात चांगल्या कार्याचे फळही अधिक मिळते, असे अधिक महिन्याबाबत शास्त्रात म्हटले आहे. मंगलकार्याशिवाय (विवाह, गृहप्रवेश इत्यादी) इतर कार्यांसाठी अधिक महिना शुभ आहे. पूर्ण महिन्यात २५ दिवस खरेदीसाठी शुभ आहेत. यातील १५ दिवसांचे महत्त्व तर अधिक आहे. अधिक महिना संपत्तीतील गुंतवणुकीसाठीही चांगला आहे. ज्योतिषी आर. एल. त्रिवेदींनुसार, २१, ३० सप्टेंबर, १, ५, आणि १६ ऑक्टोबर वगळता इतर दिवस शुभ असतील. या दिवसांत देवाची भक्ती व धार्मिक विधींचेही पूर्ण फळ मिळेल. तसेच खरेदी आणि इत्यादी कामांसाठी उर्वरित दिवस शुभ असतील. ज्योतिषाचार्य डॉ.अजय भांबींनुसार, कुठल्याही प्रकारच्या खरेदीस मनाई नाही. अधिक महिन्यात सर्वकाही खरेदी करता येते. केवळ स्थावर मालमत्ता खरेदी किंवा बुक करताना कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींकडे लक्ष ठेवायला हवे. दागिने, वाहने, कपड्यांपासून इतर खरेदी करता येईल.

अधिक मासातील हे दिवसही शुभ; मोठ्या व्यावसायिक करारांसाठी लाभदायी
वाहन खरेदीचा मुहूर्त
: सप्टेंबरमध्ये १९, २०, २७, २८, २९ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ४, १० आणि ११ तारखेला वाहन खरेदी किंवा बुक करता येतील.

दागिने खरेदीचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, १९, २२ आणि २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये २, ३, ७, ८ आणि १५ तारखेला दागिने खरेदी करता येतील.

नवे कपडे खरेदी करण्याचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, २२ आणि २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये २, ७, ८ आणि १५ तारखेला नवे कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करता येईल.

यज्ञ, हवन इत्यादींसाठीचे शुभ दिन : २६ सप्टेंबर आणि १, ४, ६, ७, ९, ११, १७ ऑक्टोबरला यज्ञ, हवन विधी करता येतील.

अधिक मासातील हे दिवसही शुभ
सर्वार्थसिद्धि योग :
हा योग प्रत्येक कामात यश देणारा ठरेल. २६ सप्टेंबर आणि १, ४, ६, ७, ९, ११, १७ ऑक्टोबर २०२० ला हा योग असेल.

द्विपुष्कर योग : या काळात केलेल्या कामातून दुप्पट लाभ मिळतो. १९ आणि २७ सप्टेंबरला द्विपुष्कर योग असेल.

अमृतसिद्धी योग : या काळात केलेल्या कामांचा लाभ दीर्घकालीन असतो. २ ऑक्टोबर २०२० ला अमृतसिद्धी योग असेल.

पुष्य नक्षत्र : अधिक मासात दोन दिवस पुष्य नक्षत्रही असेल. १० ऑक्टोबरला रविपुष्य आणि ११ ऑक्टोबरला सोमपुष्य नक्षत्र असेल. या तारखांना कोणतेही आवश्यक शुभ कार्य करता येईल. या महिन्यात नामकरण, यज्ञोपवीत, विवाह आणि सामान्य धार्मिक संस्कार जसे की, गृहप्रवेशासारखे हिंदू धर्माचे विधी केले जात नाहीत.

साखरपुडा, इत्यादी कार्यांचे शुभ मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ७, १५ तारखेला बोलणी, साखरपुडा इत्यादी कार्ये करता येतील.

इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि यंत्रांसाठीचे शुभ मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १९, २०, २७, २८, २९ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ४, १०, ११ तारखेला वाहन खरेदी किंवा बुक करता येईल.

मोठ्या व्यावसायिक कराराचे शुभ मुहूर्त : १९ आणि २७ सप्टेंबरला द्विपुष्कर योगामुळे मोठ्या व्यावसायिक करारांसाठी हे दिवस लाभदायी ठरतील. याशिवाय २१ सप्टेंबर आणि ६ ऑक्टोबरही नव्या व्यावसायिक करारासाठी शुभ असतील.