आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अधिक मास म्हणजे मुख्यत्वे भक्तीचा महिना. हिंदू ग्रंथ धर्मसिंधू आणि निर्णयसिंधूमध्ये अधिक महिन्याशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. उज्जैन येथील पाणिनी संस्कृत विद्यापीठाचे आचार्य डॉ. उपेंद्र भार्गव यांच्यानुसार, अधिक महिन्यात नित्य, नैमित्तिक व काम्य तिन्ही प्रकारची कर्मे करता येतात. आश्विन महिना असल्याने या अधिक महिन्याचे महत्त्व अनेक पट वाढते. कोणत्याही कामाचा समारोप करू नये. विवाह, मंुडण, गृहप्रवेश, यज्ञोपवीत ही मंगल कार्ये वगळता उर्वरित नैमित्तिक (विशिष्ट हेतूसाठी), काम्य (आवश्यक) व नित्य कामे करता येतात.
टोकन देऊन मोठा करार करू शकता, अंतिम व्यवहार मुहूर्त बघून करा
- या पूर्ण महिन्यात व्रत, तीर्थस्नान, भागवत पुराण, ग्रंथांचे अध्ययन, विष्णू यज्ञ इत्यादी करू शकता. जी कामे आधीच सुरू झाली आहेत ती सुरू ठेवता येतील.
- संततीच्या जन्मासाठी गर्भाधान, पुंसवन, सीमंत आदी संस्कार करू शकता.
- एखाद्या मंगलकार्याला सुरुवात झाली असेल तर ते कार्य करता येईल.
- विवाह करता येणार नाही, मात्र स्थळ बघता येईल, साखरपुडा करता येईल.
- गृहप्रवेश करता येणार नाही, मात्र नव्या घराचे बुकिंग, मालमत्ता घेऊ शकता.
- मोठा व्यवहार टोकन देऊन करता येईल. अंतिम करार मुहूर्त बघूनच करा.
- या महिन्यात प्राणप्रतिष्ठा, स्थापना, विवाह, मुंडण, यज्ञोपवीत होऊ शकत नाही.
- नववधू गृहप्रवेश, नामकरण, अष्टका, श्राद्ध यासारखे िवधी करू नये.
अशी होते अधिक महिन्याची गणना
कालगणनेच्या दोन पद्धती आहेत. पहिली सूर्याच्या गतीनुसार आणि दुसरी चंद्राच्या गतीनुसार. सूर्याच्या गतीवर सौर वर्ष आधारित असते, तर चांद्र वर्ष चंद्राच्या गतीवर. एक राशी पार करण्यासाठी सूर्य ३०.४४ दिवस घेतो. या प्रकारे सूर्याला १२ राशी पार करण्यासाठी म्हणजे सौर वर्ष पूर्ण करण्यास ३६५.२५ दिवस लागतात, तर ३५४.३६ दिवसांत चंद्राचे एक वर्ष पूर्ण होते. जवळपास प्रत्येक तीन वर्षांनंतर (३२ महिने, १४ दिवस, ४ तास) चंद्राचे हे दिवस जवळपास एक महिन्याच्या बरोबरीचे होतात. यामुळे ज्योतिषीय गणना योग्य ठेवण्यासाठी तीन वर्षांनंतर चांद्रमासामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक महिना म्हटले जाते.
लीप वर्षाचा अनोखा संगम | २०२० मध्ये लीप वर्ष व आश्विन महिना एकत्र आले आहेत. आश्विनचा अधिक महिना २००१ मध्ये आला होता. मात्र, लीप वर्षासोबत आश्विनमध्ये अधिक महिना १६० वर्षांपूर्वी २ सप्टेंबर १८६० रोजी आला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.