आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाध्या पद्धतीने गृहप्रवेश
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गृहप्रवेश शुभ मानला जातो. यंदा लॉकडाऊन असल्याने साध्या पद्धतीने गृहप्रवेश केला पाहिजे. गृहप्रवेश करण्याआधी तेथे दूध उकळून घ्यावे. दूध उकळल्यानंतर ते खाली सांडल्यानंतर घरामध्ये वास्तव्याला जायला हवे. याशिवाय गणेश पूजन करून गणरायाच्या मूर्तीची घरात स्थापना करायला हवी.
अभिजित मुहूर्त
अभिजित मुहूर्त दुपारी- 11: 56 ते 12:49 पर्यंत असेल.
शुभ मुहूर्त - सकाळी 7:25 ते 10:44 पर्यंत
दुपारी 12:23 ते 2:02 पर्यंत.
राहू काळ- सकाळी 10:44 ते 12:23 पर्यंत.
या वेळेत श्रीदुर्गासप्तशतीच्या चतुर्थ अध्यायाचे पठण केल्याने शत्रू, रोगाचा नाश होता.
आरोग्य, समृद्धीसाठी राशीनुसार काय करावे?
मेष - घरात शिवलिंगावर दूधमिश्रित पाण्याने जलाभिषेक करावा. ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
वृषभ - विष्णूच्या कुठल्याही रूपाचे पूजन करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा.
मिथुन - श्रीकृष्णाच्या नावाचा जप करा.
कर्क - श्रीरामाच्या नावाने मंत्रजप करा.
सिंह - श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे.
कन्या - श्री विष्णुसहस्रनामाचे पठण करावे.
तूळ - श्री गोपाल सहस्रनामाचे पठण करावे.
वृश्चिक - श्री शिव चालिसाचे पठण करा.
धनू - श्री विष्णुसहस्रनामाचे पठण करा.
मकर - श्रीदुर्गा चालिसा या सप्तशतीचे पठण करावे.
कुंभ - श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे.
मीन - श्री विष्णुसहस्रनामाचे पठण करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.