आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीया विशेष:याच दिवशी चिरंजीव परशुरामांचा जन्म, कृष्णाने सुदामाला समृद्धीचे वरदान दिले, त्यामुळे दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळवण्याचा, मदतीचा हा दिवस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजच्या दिवशी केलेल्या शुभकार्याचे फळ नेहमी मिळते, कधी नष्ट होत नाही

भारतीय कालगणनेनुसार, वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. आजची हीच अक्षय्य तिथी आहे. ज्याचा कधी क्षय नाही झाला, जो स्थायी आहे तो अक्षय्य म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी दान, पूजन, हवनासह इतर पुण्यकार्य केल्यास त्याचे अक्षय फळ मिळते. शुभकार्यासाठी आजचा दिवस सर्वात चांगला मानला गेला आहे. कारण आजचा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. परशुराम चिरंजीव आहेत. त्यांच्या जीवनाचा क्षय नाही झाला. याच कारणाने अक्षय्य तृतीयेला चिरंजीव तिथी म्हटले जाते. त्यामुळेच आजचा दिवस सर्वांसाठी अक्षय्य आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी वरदान मिळवण्याचा आहे. चारही युगांमध्ये त्रेतायुगाचा आरंभ याच तिथीपासून झाला. त्यामुळे याला युगादितिथीही संबोधले जाते. म्हणजेच आज शुभारंभाचा दिवस आहे.

दानाचे महत्त्व : कृष्णाने सुदामाला समृद्धी दिली
अक्षय्य तृतीया समृद्धीच्या आशीर्वादाचा दिवस. कारण याच दिवशी श्रीकृष्णाने बालमित्र सुदामाला तांदळाच्या विनम्र भेटीच्या बदल्यात अमर्याद समृद्धी दिली

त्यामुळे या वर्षी संकटात रुग्णांना उपचाराची सामग्री, औषधी दान करता येऊ शकते. गरजूंना वेळेवर जे दान केले जाते त्याला श्रेष्ठ मानले गेले आहे. यंदा लॉकडाऊन असल्याने बाहेर जाऊन दान-पुण्य-स्नान केले जाऊ शकत नाही. पण जे काही दान करायचे आहे त्याचा संकल्प करा आणि नंतर ते दान केले जाऊ शकते. तसेच या दिवशी पाण्याने भरलेला कलश, पादत्राणे, छत्री, गोवंश, भूमी, स्वर्णपात्र दान करणे कधीही उत्तम असते. याशिवाय समृद्धीसाठी सुवर्ण खरेदी शुभ मानली जाते.

शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस नव्या हंगामाचा
महाभारताच्या काळात अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच युधिष्ठिराला वनवासात अक्षय्य पात्र मिळाले. या पात्रातील अन्न कधीही संपत नव्हते

अक्षय्य तृतीया हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कृषीच्या नव्या चक्राची सुरुवात याच दिवशी होते. ओडिसा व पंजाबमध्ये हा व्यापक रूपात शेतीशी निगडित सण आहे. शेतकरी नव्या पिकाच्या तयारीला लागतात. अक्षय्य तृतीयेपासूनच ऋतू परिवर्तनही म्हटले जाते. वसंत ऋतूची समाप्ती व ग्रीष्माच्या सुरुवातीचा दिवसही मानला जातो. मेनंतरच्या महिन्यात खरीप हंगामात पेरणी व कापणी केली जाते. पेरणीच्या कामाची तयारीही अक्षय्य तृतीयेनंतरच सुरू होते.

पंडित मनीष शर्मा

बातम्या आणखी आहेत...