आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय पुण्य कमावण्याचा दिवस:वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीया मुहूर्त, या तिथीला परशुराम, नर-नारायण आणि हयग्रीव अवतार झाले

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया 3मे रोजी आहे. याला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी व्रत आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. अक्षय पुण्य म्हणजे असे पुण्य जे कधीही नष्ट होत नाही. अक्षय्य तृतीयेला जल दान अवश्य करावे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, एका वर्षात साडेतीन स्वयंसिद्ध मुहूर्त असतात. या मुहूर्तामध्ये लग्नासारखे सर्व शुभ कार्य शुभ मुहूर्त न पाहता करता येतात.हे साडेतीन शुभ म्हुर्त पुढीलप्रमाणे आहेत- गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत, तर दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.

अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले
अक्षय्य तृतीयेला चिरंजीवी तिथी देखील म्हटले जाते. कारण या तिथीला भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या परशुराम यांचा जन्म झाला होता. परशुराम चिरंजीवी मानले जातात, म्हणजेच ते सदैव जिवंत राहणार. याशिवाय भगवान विष्णूंच्या नर-नारायण, हयग्रीव अवतारही याच तिथीला प्रकट झाले.

अक्षय्य तृतीयेला श्रीविष्णू-देवी लक्ष्मीची करावी विशेष पूजा

  • अक्षय्य तृतीयेला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून देवघरात श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा करावी. यानंतर कच्च्या गाईच्या दुधात केशर मिसळून शंखमध्ये भरून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तींना अभिषेक करा. यानंतर शंखामध्ये गंगाजल भरून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अभिषेक करावा.
  • भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीला चमकदार लाल आणि पिवळे वस्त्र अर्पण करा. हार, फुले, अत्तर इ. अर्पण करा.
  • खीर, पिवळी फळे किंवा पिवळी मिठाई अर्पण करा. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास मानण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.
  • अन्न-पाणी, शूज-चप्पल, कपडे, छत्री कोणत्याही मंदिरात किंवा गरजू लोकांना दान करा.
  • सूर्यास्तानंतर शाळीग्रामसह तुळशीसमोर गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा दिवा लावा.
  • अक्षय्य तृतीयेला एखाद्या सामूहिक विवाहात धन अर्पण करा. अनाथ मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी आर्थिक मदत करा.
बातम्या आणखी आहेत...