आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सण-उत्सव:अक्षय्य तृतीया 26 एप्रिलला, या दिवशी जुळून येतील 6 राजयोग, महादीर्घायु आणि दान योगामुळे खास राहील दिवस

एका वर्षापूर्वीलेखक: विनय भट्ट
  • कॉपी लिंक
  • 6 राजयोग आणि इतर 2 शुभ योगामध्ये साजरी होईल अक्षय्य तृतीया

रविवार 26 एप्रिल रोजी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. काशीचे ज्योतिषाचार्य पं. गणेश मिश्रा यांच्यानुसार यावेळी अक्षय्य तृतीयेला ग्रह-नक्षत्र विशेष शुभ स्थितीमध्ये राहतील. यामुळे 6 राजयोग जुळून येतील. शुभ योगांच्या प्रभावामुळे या सणामध्ये करण्यात आलेल्या स्नान-दान आणि पूजा-पाठचे अक्षय्य फळ मिळेल. याव्यतिरिक्त या दिवशी मंगळ, बृहस्पती आणि शनीमुळे महादीर्घायु आणि दान योगही जुळून येतील. या शुभ योगामध्ये करण्यात आलेल्या दानामुळे रोगनाश  आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. या वर्षीही अक्षय्य तृतीयेला रोहिणी नक्षत्राचा संयोग जुळून येणे शुभ राहील. हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. कारण या दिवशी करण्यात आलेल्या शुभ कामामध्ये यश प्राप्त होते. तिथी आणि नक्षत्राच्या शुभ संयोगामुळे हा सण स्नान, दान आणि इतर मंगलकार्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

पं. मिश्रा यांच्यानुसार यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महामारीमुळे मंगलकार्याचे आयोजन आणि सामूहिक कार्यापासून दूर राहून घरातच पूजा-पाठ करावे. यासोबतच लग्न आणि इतर मंगलकार्य पुढील शुभ मुहूर्तापर्यंत टाळावेत. या सणाच्या दिवशी श्रद्धेनुसार दानाचा संकल्प करून दान देण्यात येणारी सामग्री वेगळी ठेवावी आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दान करावी. पं. मिश्रा यांच्यानुसार बृहस्पती संहितामध्ये सांगण्यात आले आहे की, महामारी, नैसर्गिक संकट आणि आपत्तीकाळात मंगलकार्य करू नयेत आणि पुढील शुभ मुहूर्तापर्यंत टाळावेत.

बृहस्पति संहिता का श्लोक

दिग्दाहे वा महादारुपतने चाम्बुवर्षणे ।

उल्कापाते महावाते महाशनिनिपातने ।।

अनभ्राशनिपाते च भूकम्पे परिवेषयोः । 

ग्रामोत्पाते शिवाशब्दे दुर्निमित्ते नशोभने ।

6 राजयोग आणि 2 इतर शुभ योग

अक्षय्य तृतीयेला सूर्योदयाच्या वेळी शश, रूचक, अमला, पर्वत, शंख आणि नीचभंग राजयोग जुळून येत आहेत. यासोबतच महादीर्घायु आणि दान योगही जुळून येत आहेत. हे सर्व योग मंगळ, सूर्य, बुध, बृहस्पती  आणि शनीमुळे जुळून येत आहेत. या योगाच्या प्रभावाने स्नान, दान आणि पूजेसाठी दिवस आणखी खास होईल. ग्रह-ताऱ्यांच्या विशेष स्थितीमध्ये करण्यात आलेल्या कामाचे संपूर्ण फळ प्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...