आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परोपकाराचा सण:अक्षय्य तृतीयेला थोडेसे केलेल्या दानाचे सुद्धा मिळते 10 पट पुण्य, जाणून घ्या कोणत्या गोष्टी दान करू शकता

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अक्षय्य तृतीया सण आहे. या दिवशी केलेले दान 10 पट फळ देते आणि ते पुण्य अक्षय होते. म्हणजेच ते कधीही संपत नाही. म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हणतात. वैशाख महिन्याची देवता भगवान श्रीविष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात तीर्थक्षेत्राच्या पाण्यात स्नान, त्यानंतर उपवास, दान, पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्याची परंपरा आहे. वेद आणि उपनिषदांमध्ये तसेच अनेक पुराण आणि महाभारतात दानाचे महत्त्व सांगितले आहे. कोणत्या प्रकारचे दान केल्याने कोणते फळ मिळते हे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे.

पौराणिक कथांमध्ये दान
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्या मते महादानाचे महत्त्व स्कंद पुराणातील प्रभाखंडात सांगण्यात आले आहे. यामध्ये गाय, सोने, चांदी, रत्न, ज्ञान, तीळ, कन्या, हत्ती, घोडा, पलंग, वस्त्र, जमीन, अन्न, दूध आणि आवश्यक गोष्टींसोबत घराचे दान करावे. याशिवाय अग्नि पुराणानुसार सोने, अश्व (घोडा), तीळ, हत्ती, रथ, जमीन, घर, कन्या आणि कपिला गाय यांचे दान करावे.

गरुड पुराणानुसार दान न केल्याने प्राणी गरीब होतो आणि गरीब झाल्यावर पाप करतो. श्रीमद भागवत पुराणात असे म्हटले आहे की जीवनासाठी आवश्यक असलेली संपत्ती, वस्तू आणि पैसा ठेवावा. इतर गोष्टींचे दान करावे. मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेण्यापेक्षा दान करणे चांगले असल्याचे महाभारतात सांगितले आहे.

वेद आणि उपनिषदांमध्ये दान
वेदांमध्येही दानधर्माचा उल्लेख असल्याचे डॉ मिश्र सांगतात. धर्माच्या उन्नतीसाठी दिलेले दान हे सर्वश्रेष्ठ आहे. याशिवाय प्रसिद्धी किंवा स्वार्थासाठी केलेले दान मध्यम असते. शुक्ल यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदानुसार ब्रह्मदेवाने मानवांना उपदेश करताना 'द' अक्षर म्हटले. मग लोकांनी त्याचा अर्थ दान करा असा घेतला. यावर ब्रह्मदेव म्हणाले की, तुम्ही बरोबर समजले. याशिवाय तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे की, श्रद्धेने, लज्जा किंवा भीतीच्या भावनेने केलेले दानही फळ देते.

दानाचे फळ
धार्मिक ग्रंथानुसार काही दानाचे फळ या जन्मात मिळते तर काहींचे फळ पुढील जन्मात मिळते. त्यामुळे आयुष्यात अचानक मोठे बदल घडतात. गरुड पुराणात सांगितले आहे की, जल दान केल्याने तृप्ती मिळते. अन्नदान केल्याने अक्षय सुख मिळू शकते, तीळ दान केल्याने संतानसुख, भूमी दान केल्याने इच्छित वस्तू मिळू शकते. सोने दान केल्याने दीर्घायुष्य मिळते. घर दान केल्याने उत्तम भवन मिळते आणि चांदीचे दान केल्याने चांगले स्वरूप प्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...