आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणात काय करू नये:दुधापासून बनवलेले पदार्थ आणि पालेभाज्या खाऊ नयेत, या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करण्याचेही विधान

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

29 जुलैपासून श्रावण मास सुरू झाला आहे. जो 27 ऑगस्टपर्यंत असेल. चातुर्मासाचा पहिला महिना असल्याने श्रावणात पूजा करण्याबरोबरच अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. महिनाभर शिवपूजेसोबतच उपवासही केला जातो. श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रामध्ये राहतो. त्यामुळे या महिन्याचे नाव श्रवण नक्षत्रावरून पडले आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला, श्रवण नक्षत्राच्या संयोगात रक्षाबंधन सण साजरा केला जातो.

श्रावण मासात भगवान विष्णूंच्या पूजेचाही नियम
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, श्रावण महिन्याचे देवता शुक्र आहेत आणि महादेवासोबत या महिन्यात भगवान विष्णूंच्या श्रीधर रूपाची पूजा करण्याचे विधान शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातच व्रत आणि उपवास करण्याचे महत्त्व आहे. या महिन्यात श्रीविष्णूंचा भगवान शंकरासोबत अभिषेक करण्याचेही खूप महत्त्व आहे. श्रावणात शुक्र आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने वैवाहिक सुख वाढते. श्रावणात भगवान शिव, विष्णू आणि शुक्राची पूजा करताना काही नियम देखील लक्षात ठेवावेत.

श्रावणात काय करू नये
महिनाभर पालेभाज्या, तामसिक अन्न खाऊ नये. दूध पिऊ नये आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत. मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नये. या महिन्यात जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. तसेच ब्रह्मचर्याचे नियम पाळावेत. दुपारी झोपू नये. या महिन्यात सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळी अन्न खाऊ नये. एक वेळ फलाहार करावा.

स्कंद पुराणानुसार काय करावे
स्कंद पुराणानुसार, श्रावण महिन्यात एकभुक्त व्रत करावे. म्हणजे एकाच वेळी जेवण करावे. यासोबतच पाण्यात बिल्वपत्र किंवा आवळा टाकून स्नान करावे. यामुळे कळत-नकळत केलेली पापे नष्ट होतात. या महिन्यात भगवान श्रीविष्णू पाण्यामध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे या महिन्यात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. मंदिरात किंवा संतांना वस्त्र दान करावे. यासोबतच चांदीच्या भांड्यात दूध, दही किंवा पंचामृत दान करावे. तांब्याच्या भांड्यात अन्न, फळे किंवा इतर अन्नपदार्थ ठेवून दान करावेत.

बातम्या आणखी आहेत...