आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 3 तारखेला आहे. याला पुराणात अमलकी एकादशी असे म्हटले आहे. या दिवसापासूनच काही वैष्णव तीर्थक्षेत्रांवर 6 दिवसांच्या होळी उत्सवाची सुरुवात झाल्यामुळे तिला रंगभरी एकादशी असेही म्हणतात.
प्रत्येक एकादशीप्रमाणे या दिवशीही भगवान श्रीविष्णूची विशेष पूजा केली जाते. अमलकी एकादशीचे व्रत विधीपूर्वक करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्रीविष्णूची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. यासोबतच मोक्ष प्राप्त होतो.
हिंदू पंचांगातील शेवटचा महिना
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. दर महिन्याला दोन एकादशी असतात. पौर्णिमेनंतर येणार्या एकादशीला कृष्ण पक्षातील एकादशी आणि अमावस्येनंतर येणार्या एकादशीला शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतात. सध्या फाल्गुन मास चालू आहे. जो हिंदू कॅलेंडरचा शेवटचा महिना आहे.
पद्मपुराणात उल्लेख
अमलकी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णूची पूजा केली जाते. अमलाकी म्हणजे आवळा. असे म्हणतात की, भगवान श्रीविष्णूने आवळा हा आदि वृक्ष म्हणून प्रतिष्ठित केला होता. अमलकी एकादशीच्या दिवशी आवळा आणि श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. अमलकी एकादशीचा उल्लेख पद्मपुराणात आढळतो. या पूजेने कुटुंबातही आनंद आणि प्रेमाचे वातावरण राहते.
गरुड पुराण : लक्ष्मीजींच्या अश्रूंपासून बनले आवळ्याचे झाड
गरुड पुराणात असे लिहिले आहे की, या दिवशी देवी लक्ष्मीच्या अश्रूंपासून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. त्रिदेव (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) आवळा वृक्षात राहतात असे मानले जाते. आवळा वृक्षाच्या वरच्या भागात ब्रह्मदेव, मध्यभागी भगवान शिव आणि आवळा वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात.
अमलकी एकादशीच्या दिवशी जे भक्त भगवान विष्णूची आराधना करतात आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करतात त्यांना पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.