आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी अमावस्या:घरात गंगाजलाने स्नान केल्याने मिळेल तीर्थस्नानाचे पुण्य, या दिवशी पितरांची पूजा करण्याचाही नियम

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 23 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील अमावस्या आहे. या तिथीला पितरांची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. अमावस्याला पुराणात सण म्हटले आहे. म्हणूनच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा नियम आहे. काही कारणास्तव हे करू शकत नसाल तर घरीच पाण्यात गंगाजल मिसळून पवित्र स्नान केल्याचे पुण्य प्राप्त करू शकता. सकाळी स्नान केल्यानंतर घरात दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.

अशा प्रकारे पितरांची विशेष पूजा करावी
चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी, दूध, जव, तीळ, तांदूळ आणि पांढरी फुले मिसळून घ्या. हे पाणी तळहातात घेऊन अंगठ्याच्या बाजूने पितरांसाठी भांड्यात सोडावे. हे करत असताना 'पितृ देवतभ्यो नमः' या मंत्राचा जप करत राहा. असे पाच किंवा अकरा वेळा करा. त्यानंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.

अन्न आणि वस्त्र दान
कार्तिक महिन्यात अन्नदान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. असे केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. त्यामुळे कार्तिक महिन्यात गरजूंना अन्नदान करावे. तसेच कोणत्याही गरजू व्यक्तीला सामर्थ्यानुसार धन दान करावे. धान्यासोबत वस्त्रांचे दानही करावे. हवामानानुसार उबदार कपडे दान करावेत.

बुधवार आणि अमावस्येचा योग
बुधवार आणि अमावस्येच्या योगात श्रीगणेशाची विशेष पूजा करावी. श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा आणि श्री गणेशाय नमः मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा. श्रीगणेशाला मोदकाचा नैवेद्य दखवावा.

बातम्या आणखी आहेत...