आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अनंत चतुर्दशी:गणेश पूजन आणि मूर्ती विसर्जनाचे 3 शुभ मुहूर्त, घरातच या सहजप्रकारे करा गणेश मूर्तीचे विसर्जन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज (19 सप्टेंबर) अनंत चतुर्दशी आहे. या तिथीला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि गणेशोत्सव संपतो. कोणत्याही नदी किंवा तलावात मूर्तीचे विसर्जन टाळावे, कारण असे केल्याने नदी-तलावातील अस्वच्छता वाढते आणि मूर्ती घाणीत विसर्जित केल्याचा भक्ताला दोष लागतो. म्हणूनच मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन घरीच करणे चांगले.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन शुभ मुहूर्त- सकाळी 9 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत. दुपारी 1.30 पासून 3 पर्यंत. संध्याकाळी 6 पासून सूर्यास्तापर्यंत. लक्षात ठेवा, मूर्ती सूर्यास्तापूर्वी विसर्जित केली पाहिजे, जर सूर्यास्तापर्यंत मूर्तीचे विसर्जन करता येत नसेल तर दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे. विसर्जनापूर्वी गणपतीची पूजा करा.

पूजन विधी
विसर्जनापूर्वी स्थापित गणेश मूर्तीचा संकल्प मंत्र घेऊन गणेशाची पंचोपचार पूजा करावी. गणेशाच्या मूर्तीवर अक्षता, गुलाल, लाल फुल, दुर्वा इ. पूजन सामग्री अर्पण करावी. श्रीगणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...

ऊँ गं गणपतये नम:

गणपतीला दुर्वा अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ गणाधिपतयै नम:
ऊँ उमापुत्राय नम:
ऊँ विघ्ननाशनाय नम:
ऊँ विनायकाय नम:
ऊँ ईशपुत्राय नम:
ऊँ सर्वसिद्धप्रदाय नम:
ऊँ एकदन्ताय नम:
ऊँ इभवक्त्राय नम:
ऊँ मूषकवाहनाय नम:
ऊँ कुमारगुरवे नम:

त्यानंतर श्रीगणेशाची आरती करून घरातच गणेश मूर्तीचे विसर्जन करून खालील मंत्राचा उच्चार करावा

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम् ।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

थोड्यावेळाने हे पवित्र पाणी घरातील झाडांना टाकावे. अशाप्रकारे गणेश विसर्जन केल्यास गणेशाची कृपा कुटुंबावर राहील.

बातम्या आणखी आहेत...