आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चतुर्थी:आज अंगारक चतुर्थी, या दिवशी श्रीगणेशासोबतच करावी मंगळ ग्रह आणि हनुमानाची पूजा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 2 मार्चला माघ मासातील कृष्ण पक्षातील अंगारक चतुर्थी आहे. मंगळवारी चतुर्थी तिथी असल्यास याला अंगारक चतुर्थी म्हटले जाते. या तिथीला श्रीगणेशासोबतच मंगळ ग्रह आणि हनुमानाची विशेष पूजा करावी.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या तिथीला श्रीगणेशासाठी व्रत-उपवास आणि पूजा-पाठ केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. मंगळवारचा स्वामी मंगळ ग्रह आहे. यामुळे चतुर्थीला मंगळ ग्रहासाठी पूजा केली जाते. मान्यतेनुसार मंगळवारीच बजरंगबलीचा जन्म झाला होता. यामुळे मंगळवार हनुमानाची विशेष पूजा करावी.

श्रीगणेशाच्या 12 नावांचा करावा जप
ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार चतुर्थीला सुख-समृद्धीचे दाता श्रीगणेश यांच्या पूजेमध्ये त्यांच्या 12 नावांच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जप कमीतकमी 108 वेळेस करावा.

ऊँ सुमुखाय नम:, ऊँ एकदंताय नम:, ऊँ कपिलाय नम:, ऊँ गजकर्णाय नम:, ऊँ लंबोदराय नम:, ऊँ विकटाय नम:, ऊँ विघ्ननाशाय नम:, ऊँ विनायकाय नम:, ऊँ धूम्रकेतवे नम:, ऊँ गणाध्यक्षाय नम:, ऊँ भालचंद्राय नम:, ऊँ गजाननाय नम:।

बातम्या आणखी आहेत...