आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगारक चतुर्थी 13 सप्टेंबरला:मंगळवारी सर्वार्थसिद्धी योगासह पितृपक्षाची चतुर्थी, श्रीगणेश आणि मंगळाची करावी पूजा

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी अंगारक गणेश चतुर्थी आहे. सध्या पितृपक्ष सुरू असून या पक्षाच्या चतुर्थीचे महत्त्व खूप आहे. 13 तारखेला मंगळ ग्रह, श्रीगणेशाची पूजा करून पितरांचे श्राद्ध कर्म करावे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग राहील. या योगात केलेली शुभ कर्मे लवकर सिद्ध होतात.

उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते, जेव्हा ही तारीख मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक गणेश चतुर्थी म्हणतात. चतुर्थीला गणेशाचा उपवास केला जातो. सकाळी आणि संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा केली जाते.

मंगळवारी मंगळ ग्रहाची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. या ग्रहाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते. उज्जैन हे मंगळ देवाचे जन्मस्थान आहे.

पितृपक्षाच्या चतुर्थीला अशा लोकांचे श्राद्ध, पिंडदान, तर्पण आणि धूप-ध्यान करावे, ज्यांचा मृत्यू कोणत्याही महिन्यातील चतुर्थी तिथीला झाला असेल.

मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ

  • मंगळ, मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. अंगारक चतुर्थीला सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी, त्यानंतर मंगळ ग्रहाला लाल फुले अर्पण करावीत. शिवलिंगावर तांब्याच्या भांड्याने जल अर्पण करावे, बेलाच्या पानांसह लाल फुले, लाल गुलाल, मसूर डाळ अर्पण करा.
  • मंगळाची भात पूजा करावी. या पूजेमध्ये शिवलिंगाचा शिजवलेल्या भाताने शृंगार करावा. भात म्हणजेच तांदळाने सजवल्यानंतर पूजा करावी. पूजेमध्ये ऊँ अं अंगारकाय नम: मंत्राचा जप करावा.

अशाप्रकारे तुम्ही श्रीगणेशाची पूजा करू शकता

  • अंगारक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून श्रीगणेशाचा अभिषेक करावा. गुलाल, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, प्रसाद आणि पूजेचे साहित्य अर्पण करून धूप-दीप लावा.
  • श्रीगणेशासमोर व्रत करण्याचा संकल्प करावा. श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत राहा. आरती करावी.
  • जर तुम्ही उपवास करत असाल तर दिवसभर अन्न खाऊ नका. फळे खाऊ शकता, पाणी, दूध, फळांचा रस पिऊ शकता.

अशा प्रकारे तुम्ही पितरांसाठी धूप-ध्यान करू शकता

  • पितृपक्षामध्ये पितरांसाठी दररोज दुपारी बाराच्या सुमारास धूप-ध्यान करावे. यासाठी खीर-पुरी, मिठाई इत्यादी गोष्टी बनवा.
  • गाईच्या शेणाची गोवरी जाळून निखाऱ्यावर गूळ-तुपासह, भोजन टाकावे. त्यानंतर अन्न गाय, कुत्रा आणि कावळे यांना खाऊ घाला. पितृपक्षात धन आणि अन्नधान्य गरजू लोकांना दान करावे.
बातम्या आणखी आहेत...