आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, अकोल्याचे ह.प.भ. अविनाश महाराज परळीकर यांचे कीर्तन 

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ह.प.भ. अविनाश महाराज परळीकर यांचा जन्म १९५४ साली झाला. ते दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कारंजा येथील गुरु मंदिराचे सेवेकरी आहेत. या ठिकाणी त्यांचे भजन मंडळ असून, दर गुरुवारी ते भजनाची सेवा अर्पण करतात. या मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. 

ह.प.भ. अविनाश महाराज परळीकर यांनी १९७६मध्ये माध्यम क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी मुद्रित व इलेक्ट्राॅनिक मिडीयाच्या माध्यमातून पत्रकारिता केली. जिल्ह्यात त्यांनी पहिले इलेक्ट्रानिक मिडीयामध्ये संपादक म्हणूनही कारकिर्द गाजवली आहे.

मूळ गायक असलेले ह.प.भ. अविनाश महाराज परळीकर यांनी संगीत विषयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी रामटेक येथील कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठातून किर्तन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच त्यांनी वाणिज्य विषयातरही पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

ह.प.भ. अविनाश महाराज परळीकर यांनी २०००पासून किर्तनाला प्रारंभ केला. पारंपरिक किर्तनाला फाटा स्वनिर्मित आख्यान हे त्यांच्या किर्तनाचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गाेेवा, आंध्रप्रदेशासह जपान व दुबई येथेही त्यांनी किर्तनाची सेवा केली. २ हजारांपेक्षा जास्त किर्तने त्यांनी केली आहेत. आतापर्यंत त्यांनी राज्यस्तरीय किर्तन महाेत्सवांमध्ये त्यांनी सहभाग नाेंदवला आहे. 

0