आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विठुराया, सारं दैन्य संपू दे:सुन्या सुन्या पंढरीत माझ्या। तुझेच मी गीत गात आहे॥

एका वर्षापूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

आज आषाढी. ‘पाऊले चालती पंढरीची वाट'', असा हा सोहळा. कानाकोपऱ्यातून माणसं चालू लागतात विठुरायाच्या ओढीनं. चालताना भान उरत नाही, धावताना तहानभूक लागत नाही. कसली आहे ही ओढ, याचं उत्तर मात्र गवसत नाही. आज ‘कोरोना''मुळं विठुमाऊलीनंही स्वतःला ‘लॉकडाऊन''मध्ये ठेवलं आहे. कारण, माऊलीला चिंता आहे तिच्या लेकरांची. लेकुरवाळा विठू आज एकटा आहे. हे एकटेपण तो सोसतो आहे, लेकरांसाठीच. जात नि धर्म, लिंग वा वर्ग याच्या पल्याडची भक्ती सांगणारा लेकुरवाळा विठुराया आज तिथे एकटा आहे आणि आपण इथे एकटे आहोत. पण, विठ्ठलाची मूर्त तर आपल्या मनात आहे. डोळ्यांना विठुराया दिसतो, कानांना त्याचं भजन ऐकू येतं. सगळी इंद्रियं विठ्ठलाचा गजर करत असतात. त्यामुळं ना विठुराया एकटा आहे ना आपण.

घेई घेई माझे वाचे । 

गोड नाम विठोबाचे ॥ 

तुम्ही घ्या रे डोळे सुख । 

पाहा विठोबाचे मुख ॥ 

तुम्ही ऐका रे कान । 

माझ्या विठोबाचे गुण ॥ 

मना तेथे धाव घेई । 

राहे विठोबाचे पायी ॥ 

तुका म्हणे जीवा । 

नको सोडू या केशवा ॥

भेदाभेद भ्रम अमंगळ मानणारा वारकरी पंढरीच्या वाटेवर पाऊल ठेवतो, तेव्हाच तो खराखुरा ‘माणूस'' होतो.आज हे माणूसपण वर्धिष्णू करायचं म्हणजे विठ्ठलाची पूजा बांधायची. काळ तर कठीण आहेच, पण आपलं माणूसपण वर्धिष्णू करणं हेच तर उत्तर आहे त्यावरचं. आज विठुरायाला साकडं एवढंच, आम्हाला माणूस कर, विठ्ठला. विषाणू मारून टाक कोरोनाचा आणि विषमतेचाही. देव ओळखण्याची आणखी दुसरी खूण तरी कोणती? हे विठुराया, सारं दैन्य संपू दे. आभाळ बरसू दे. जमीन फळू दे, फुलू दे. घरा-घरांत चैतन्यवस्तीला येऊ दे. माय-माऊलीला जिंकू दे. लेकराबाळांना हसू दे. घरा-घरांत तुझागजर होऊ दे,विठ्ठला! 

संजय आवटे

बातम्या आणखी आहेत...