आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीची रूपे:अष्टलक्ष्मी : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सुख-समृद्धीची 8 रूपे; जीवनात अशाप्रकारे उत्साह, धैर्य, समृद्धी आणि आनंद देते अष्टलक्ष्मी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज दिवाळीच्या निमित्ताने वाचा - जीवनात समृद्धी आणणाऱ्या अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांबद्दल

१) आदिलक्ष्मी
या देवीला मूळलक्ष्मी, महालक्ष्मी असेही म्हणतात. श्रीमद् देवी भागवत पुराणानुसार आदिलक्ष्मीने विश्वाची निर्मिती केली. तिच्यातूनच त्रिदेव आणि महाकाली, लक्ष्मी आणि महासरस्वती प्रकट झाल्या. या जगाचे पालन आणि संचालनासाठी तिने विष्णूशी लग्न केले. महालक्ष्मी जीवन निर्माण करते. सुख आणि समृद्धी देते.

२) धैर्यलक्ष्मी
या देवीला वीरलक्ष्मी असेही म्हणतात. भौतिक आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेतील अडथळे ही दूर करते. ती अकाली मृत्यूपासून वाचवतात. तिला महिषासुराचा वध करणाऱ्या आई कात्यायनीचे रूपही मानले जाते. धैर्यलक्ष्मी युद्धामध्ये विजय मिळवून देते. ती वीरांचे रक्षण करते.

३) संतानलक्ष्मी
या रूपातील देवीची स्कंदमातेच्या रूपातही पूजा केली जाते. काही स्वरूपांत तिला चार हात, तर काहींमध्ये आठ हात दाखवले आहेत. त्यापैकी एक अभय व एक वरद मुद्रेत राहतो. ती गुणवान व निरोगी अपत्याचा आशीर्वाद देते. संतानलक्ष्मी हे मुलाबद्दलच्या स्नेहाचे प्रतीक आहे. ती वडिलांना कर्तव्य व आईला सुख प्रदान करते.

४) विद्यालक्ष्मी
ही शिक्षण, ज्ञान आणि विवेकाची देवी आहे. ती बुद्धी आणि ज्ञानाचे बळ देते. विद्यालक्ष्मी आत्म-शंका आणि असुरक्षितता दूर करते, आत्मविश्वास देते. विद्यार्थ्यांनी लक्ष्मीच्या या रूपाचे ध्यान करावे. ही आध्यात्मिक जीवन जगण्यासही मदत करते. विद्यालक्ष्मी व्यक्तीची क्षमता आणि प्रतिभा उजळते.

५) धान्यलक्ष्मी
लक्ष्मीचे हे रूप निसर्गाच्या चमत्काराचे प्रतीक आहे. ती समानतेची शिकवण देते, कारण निसर्ग सर्वांसाठी समान आहे. अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही. धान्य लक्ष्मीला ८ हात आहेत, त्यात कृषी उत्पादनेही असतात. हे अन्नपूर्णेचे रूप आहे. धान्यलक्ष्मी ही धान्य व पोषणाची देवी आहे. तिंच्या कृपेने घरात धान्य टिकून राहते.

६) गजलक्ष्मी
ही जमिनीच्या सुपीकतेची देवी आहे. या स्वरूपात हत्ती तिच्यावर दोन्ही बाजूंनी पाण्याचा वर्षाव करतात. कमळावर विराजमान गजलक्ष्मीला चार हात आहेत, त्यात तिने कमळ फूल, अमृत कलश, बेल व शंख धारण केला आहे. ही पशुधन देणारी देवी आहे. गजलक्ष्मी पशुधनातून समृद्धी देते. ती प्राण्यांपासून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे.

७) विजयलक्ष्मी
या देवीला जयलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. तिला आठ हात आहेत, ते अभय देतात. कोर्ट-कचेरीच्या चिंतेपासून मुक्ती आणि विजयासाठी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते. ही कठीण परिस्थितीत धैर्य राखण्याची प्रेरणा देते. विजयलक्ष्मी प्रत्येक संकटात विजय मिळवून देते. हिंमत देते.

८) धनलक्ष्मी
भगवान व्यंकटेश (विष्णू) यांनी कुबेराकडून कर्ज घेतले तेव्हा लक्ष्मीने कर्जातून मुक्त होण्यासाठी हे रूप धारण केले होते. कर्जमुक्तीसाठी या स्वरूपाची पूजा केली जाते. तिला सहा हात आहेत. धनलक्ष्मी पैसा, सोने, संपत्तीसह इच्छाशक्ती, धैर्य, दृढनिश्चय, उत्साहसुद्धा देते.

बातम्या आणखी आहेत...