आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Auspicious Coincidence On Sarvapitru Amavasya: Shraddha In Budhaditya, Sarvarthasiddhi, Amritsiddhi, And Lakshmi Narayan Yoga Will Satisfy The Ancestors For The Whole Year

सर्व पितृ अमावस्येला शुभ संयोग:बुधादित्य, सर्वार्थसिद्धि, अमृतसिद्धि और लक्ष्मीनारायण योगात श्राद्ध केल्याने वर्षभर पितर तृप्त होतात

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्विन महिन्यातील रविवारी सर्वपित्री अमावस्या आहे. यामध्ये तिथी, वार, ग्रह, नक्षत्र असे सात शुभ योग असणार आहे. त्यामुळे हा एक उत्सव असेल. या शुभ योगात स्नान, दान आणि श्राद्ध केल्याने अनेक पटींनी शुभ फल प्राप्त होतात.

काय सांगतात पंडित ?

या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी वृक्षारोपणही करावे, असे ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. असे केल्याने पितृ प्रसन्न होतील. म्हणून अमावस्येला पितृमोक्ष असेही म्हणतात. अश्विन महिन्यातील या अमावास्येला पूजा केल्याने पितर वर्षभर तृप्त होतात, असे पंडित सांगतात.

पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा सांगतात की, या पितृ पक्षात तिथी, वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने शुभ, शुक्ल, मित्र, सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योग तयार होतील. तर सूर्य-बुध संयोगाने बुधादित्य आणि बुध-शुक्र संयोगाने लक्ष्मीनारायण योग तयार होईल. या सर्व योगांमुळे निर्माण झालेल्या शुभ संयोगात केलेले सत्कर्म आणि उपासनेतून मिळणारे पुण्य फळ पितरांकडून प्राप्त होते.

गाईंना गवत, कुत्र्यांना आणि कावळ्यांना पोळी द्या

बुधवारी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. यानंतर पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पूजा करावी. गाई जवळ तुपाचा दिवा लावावा. श्रद्धेनुसार दान करण्याची शपथ घ्या. यानंतर गाईला हिरवे गवत, कुत्र्यांना आणि कावळ्यांना पोळी द्या. अमावस्येला महामृत्युंजय मंत्र किंवा भगवान शिवाच्या नावाचा जप करा. अमावास्येच्या वेळी ब्राह्मण भोजन करू शकतात. शक्य नसल्यास मैदा, तूप, दक्षिणा, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तू कोणत्याही मंदिरात दान करा.

गरजू लोकांना पैसे आणि अन्नधान्य दान करा

पितृमोक्ष अमावस्येला दान आणि परोपकाराचे खूप महत्त्व असल्याचे डॉ मिश्रा सांगतात. या पितृ पक्षाच्या दिवशी घरी पूजा केल्यानंतर गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा. गोठ्यात गवत किंवा पैसे दान करा. असे मानले जाते की, या दिवशी दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळते. तसेच असे देखील सांगण्यात आले आहे की, गाईला या दिवशी गवतही खाऊ घालावे.

बातम्या आणखी आहेत...