आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवळा नवमी आज:हे देवतांचे झाड, याची पूजा केल्याने मिळणारे पुण्य कधीही संपत नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज आवळा नवमी आहे. या तिथीला आवळ्याची पूजा केल्याने मिळणारे पुण्य कधीच संपत नाही. म्हणूनच अक्षय पुण्य देणारे व्रत असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या व्रतामध्ये आवळ्याच्या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.

या दिवशी स्त्रिया उत्तम आरोग्य, मुलांचे सुख आणि समृद्धीसाठी श्रीविष्णू आणि लक्ष्मीची आवळ्याच्या झाडासोबत पूजा करतात. उपवासही ठेवतात. कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तीर्थ स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.

पूजन विधी

  • या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून आवळ्याच्या झाडाभोवती स्वच्छता करावी.
  • झाडाच्या मुळास स्वच्छ पाणी आणि नंतर दूध अर्पण करावे. तेथील माती डोक्याला लावावी.
  • पूजन सामग्री अर्पण करून झाडाची पूजा करावी आणि 11 प्रदक्षिणा घालाव्यात.
  • 108 प्रदक्षिणा देखील करू करतात. पूजेनंतर, झाडाखाली बसून कुटुंब आणि सहकारी महिलांसोबत भोजन करावे.

आवळा पूजन आणि कोहळा दानाची प्रथा
पद्म आणि विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार आवळा नवमीच्या दिवशी भगवान श्रीविष्णूने कुष्मांडक नावाच्या राक्षसाचा वध केला. म्हणून अक्षय नवमीला कोहळा म्हणजेच भोपळ्याची पूजा करून त्याचे दान केले जाते. यामुळे घरात शांती आणि मुलांची वाढ सोबतच दीर्घायुष्यही मिळते. या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते.

एका मान्यतेनुसार, कंसाचा वध करण्यापूर्वी आवळा नवमीला भगवान श्रीकृष्णाने ग्वाल बाल आणि ब्रजवासी यांना एकाच धाग्यात बांधण्यासाठी अक्षय नवमीला तीन वनांची परिक्रमा करून क्रांतीचा प्रकाश जागवला. त्यामुळे आवळा नवमीला अनेक लोक मथुरा-वृंदावनाची प्रदक्षिणा करतात. या तिथीला भगवान राधा-कृष्णाची उपासना केल्याने शांती, सौहार्द, आनंद आणि वंश वृद्धी, पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्तता मिळते.

आवळ्याच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश
पद्म पुराणानुसार आवळा हे भगवान श्रीविष्णूचे रूप आहे. हे श्रीविष्णूला प्रिय झाड आहे. या वृक्षाचे स्मरण करून त्यांची अंत:करणात पूजा केल्यास गोदानाच्या बरोबरीचे फळ मिळते. या झाडाला स्पर्श केल्याने दुप्पट आणि प्रसाद म्हणून खाल्ल्यास तिप्पट पुण्य प्राप्त होते.

या झाडाच्या मुळात भगवान विष्णू, वरती ब्रह्मदेव, देठांमध्ये रुद्र, फांद्यांत मुनि गण, डहाळ्यांत देव, पानांत वसू, फुलांत मरुद्गण आणि फळांत प्रजापती वास करता. म्हणूनच शास्त्रात आवळा वृक्षाला सर्वदेवाय म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...