आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सकारात्मक:मनाची स्वच्छता करून जीवन बदलण्याची ही संधी आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निसर्गाचे आभार माना. एवढे घडत आहे, पण तू अगदी स्वस्थ आहेस, असे म्हणत शरीराचे आभार माना. मनाची फ्रिक्वेन्सीच वर ठेवायची आहे.

आपण बस, रेल्वे, विमानाने प्रवास करतो तेव्हा असे दिसते की अनेक लोकांना थोडा वेळ रिकामा मिळाला की ते झोपतात. म्हणजे त्यांची झोप अपुरी होते. आता असे दिवसा १० वाजता किंवा सायंकाळी ५ वाजता कोण झोपू शकतो? जिची झोप पूर्ण होत नाही अशीच व्यक्ती, त्याला स्लीप डिप्राइव्ह्ड म्हणतात. आज आपल्यापैकी बहुतांश जण स्लीप डिप्राइव्ह्ड झालेले आहेत. एक तर आपली झोपेची वेळ योग्य नाही आणि दुसरे म्हणजे आपली झोप चांगली नाही. कारण आपण रात्री १२-१ पर्यंत जागत राहतो. नंतर काम करता-करता लॅपटॉप बंद करून झोपतो तेव्हा आपले मनही बंद होईल, असे आपल्याला वाटते. पण, तसे होत नाही. आपण मनाला काम दिले आहे, ते कसे झोपू शकते? जेव्हा आपण ५-६ तास झोपून उठतो तेव्हा शरीराला विश्रांती तर मिळते, पण मन थकलेले असते. त्यामुळे सकाळी-सकाळी फ्रेश वाटत नाही. सकाळी-सकाळी लोकांचे चेहरे पाहा, ट्रॅफिक जाममध्ये लोकांचे चेहरे पाहा. ते थकलेले दिसतात, चेहऱ्यावर ताजेपणाच नाही. तसेच गाडी चालवत आहेत, आयुष्य चाललेले आहे, हा काळ तर जीवनाला रीसेट करणारा आहे. हा काळ सर्वोत्तम काळ आहे. आपण स्वत:शी कधी संवाद साधला, हेच आपल्याला आठवत नाही. साधनांवर अवलंबून राहिल्याने सध्या अनेकांना आत्मसंवाद साधणे कठीण होत आहे.

आपले २०-३० वर्षांपूर्वीचे आयुष्य पाहा. तेव्हा आपण शाळेत किंवा महाविद्यालयात होतो. सुटी लागायची तेव्हा आपल्याकडे करण्यासाठी काहीच नसायचे. मग खूप वेळ नुसते बसून राहायचो. आई-वडील म्हणायचे, काही हरकत नाही, दोन महिने सुटी आहे, बोअर होऊ शकतो. तेव्हाही आपण काही ना काही करतच असायचो. पण, आता आपण सुट्यांतही मुलांना मोकळे सोडत नाही. ट्रॅफिक सिग्नलवर लोकांना ४० ते ५० सेकंद मिळतात, तेवढ्या वेळातही ते फोनवरील मेसेज तपासतात. म्हणजे आपण ५० सेकंदही रिकामे बसू शकत नाही. याचाच अर्थ असा की, मन पूर्णपणे इतर गोष्टींवर अवलंबून राहिलेले आहे. आपण स्वत:शी संवाद साधतो, तेव्हा ते आपल्याला त्रस्त करते. कारण मनात अनेक विचार आहेत, ते आपण दाबून ठेवले आहेत. आता ते बाहेर येण्यास सुरुवात होते. हा का‌ळ आत्मसंवादाचा आहे. सुरुवातीला थोडे कठीण वाटेल. हात-पाय इकडे तिकडे हलू लागतील, कशाचा तरी शोध घ्याल. शरीराचे हलणे-डुलणे तीन-चार दिवसांत संपेल आणि तुम्ही आरामात बसणे शिकाल. मनाची स्वच्छता करून घेण्यासाठीही हा वेळ मिळालेला आहे. आपले मन खूप मजबूत नाही हे परिस्थितीने आपल्याला शिकवले आहे. एक गोष्ट आली आणि आपण सर्व जण एवढे घाबरलो. स्वत:ला ताकदवान बनवण्यासाठी मन स्वच्छ करण्याची गरज आहे. त्यात खूप काही साठवलेले आहे. घर आणि मन स्वच्छ करण्यासाठीही वेळ मिळत आहे.

आपण आता निसर्गाचे आभार मानू. शरीराचे आभार यासाठी की, एवढे सर्व होत आहे, पण तू अगदी स्वस्थ आहेस. म्हणजे आपल्या मनाची फ्रिक्वेन्सी वरच ठेवायची आहे. बऱ्याच सवयी बदलण्याचा विचार आपण करत होतो. उदा. काम करण्याची, पद्धत, स्वच्छता ठेवण्याची पद्धत, बागकाम आदी. हा जो वेळ मिळाला आहे, तो असाच गमवायचा नाही. तोही आपल्याला काही करण्यासाठी, बदलण्यासाठी मिळाला आहे, तसाच काही शिकण्यासाठीही.

घरात बसल्याने पूर्वीपेक्षा जास्त तणाव वाटू शकतो. कारण मन असे डिस्टर्ब राहिले तर मग संबंधांत तणाव जास्त राहील. तुम्ही रोज सकाळी ध्यान करून मन सकारात्मक संकल्पांनी भरले तर नात्यात असलेला तणाव ठीक होईल. सध्या परस्परांना समजून घेण्यासाठी चांगला वेळ मिळाला आहे. जागतिक महामारीमुळे जो वेळ मिळाला आहे, त्याकडे वेगळ्या नजरेने पाहा, म्हणजे माझ्या नशिबाने मला जो सोनेरी काळ दिला आहे, त्यामुळे मी संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. ‘मी जे शिकणे आवश्यक होते असे धडे तू शिकवले आहे, आता तू जाऊ शकतो... बाय... बाय... ’असे म्हणत त्या विषाणूचेही आभार माना.

बी.के. शिवानी
ब्रह्मकुमारी
awakeningwithbks@gmail.com