आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अध्यात्म:या क्षणी आपली विचारसरणी फक्त सकारात्मकच असावी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मन वास्तव आणि कल्पनेत फरक करत नाही, म्हणूनच मनात चांगले विचार येऊ द्यावेत

सृष्टीची निर्मिती संकल्पातून हाेते. जेव्हा आपण एकच विचार मनात सतत घाेळवत राहताे, तेव्हा ताे सिद्ध हाेताे. सध्या आपल्या मनात असंख्य विचार येत असतात. त्यास आपण ‘अफर्मेशन’ म्हणताे, म्हणजे एखाद्या गाेष्टीवर पुन्हा-पुन्हा विचार करत राहताे. उदा. मंत्र जप. मंत्र जप करताना आपण एक उच्च ऊर्जा असणारा शब्द घेताे आणि वारंवार पुनरुक्ती करत राहताे. तेव्हा आपली स्पंदने उच्च क्षमतेची हाेतात. वातावरण शुद्ध हाेऊ लागते. हे आपण जाणीवपूर्वक पाच मिनिटे, १० मिनिटे किंवा तासभर करू लागताे. जेव्हा आपण कमी ऊर्जा असणारा शब्द घाेकत राहताे तेव्हा आपली स्पंदने घटत जातात. शारीरिक आराेग्य बिघडते, वातावरण अशुद्ध हाेते. परंतु त्याकडे आपण लक्ष देत नाही. म्हणूनच आपल्याला सचेतन राहून सकारात्मक ‘अफर्मेशन’ केले पाहिजे. आज आपल्या शब्दावलीत २००० अज्ञात नकारात्मक अफर्मेशन आहेत.

नकारात्मक अफर्मेशन संपुष्टात आणण्यासाठी सकारात्मक अफर्मेशन घ्यावे लागतील. आपला दृष्टिकाेन आपाेआप बदलणार नाही. आपण बदल करण्याचा प्रयत्न करू तरीही वातावरण खेचून नेईल; म्हणूनच तर सकारात्मक अफर्मेशन निर्माण करावे लागतील. अफर्मेशनसाेबत जी दुसरी शक्ती असते ती आहे ‘पाॅवर आॅफ व्हिज्युअलायझेशन.’ जाे विचार आपण करत आहात, ताे व्हिज्युअलाइज करा. आजकाल लाेक याचा वैयक्तिक प्रदर्शनासाठी वापर करतात. हा एक प्रशिक्षणाचा भाग आहे. त्याचे निष्कर्षदेखील धक्कादायक असू शकतात. राेज सकाळी उठल्यावर केवळ आपल्या मनात डाेकावून पाहा आणि मी हे करू शकताे असा निश्चय करा. हे हाेत आहे, असे व्हिज्युअलाइज करा. मग जे काही तुम्ही खेळण्यास, करण्यास जाल तेव्हा ते काम करणे अतिशय सुलभ हाेते.

एक सुंदर असा अभ्यास अलीकडेच झाला, त्यात दाेन गट तयार करण्यात आले होते. दाेन्ही गट काेअर स्टडी ग्रुप हाेते. एका गटास सांगण्यात आले की, तुम्हाला राेज दाेन तास पियानाे वाजवायचा आहे. दुसऱ्या गटाने राेज दाेन तास आपल्या मनात पियानाे वाजवायचा आहे. ते व्हिज्युअलाइज करत असतात की, पियानो वाजवायचा आहे. एक आठवड्यात दाेन तास दरराेज दाेन्ही गटांनी असेच केले. नंतर दाेन्ही गटांच्या ब्रेन पॅटर्नचा अभ्यास करण्यात आला. दाेन्हींचे ब्रेन पॅटर्न जवळपास सारखेच हाेते. मन वास्तव आणि कल्पना यात फरक करत नाही, त्यामुळे प्रभाव ताेच हाेताे. जेव्हा आपण काळजी करीत असताे की, एखादी गाेष्ट अजून झालीच नाही, याचा अर्थ आपण कल्पना करत असताे. आपल्या घरात काेणीही आजारी नाही, स्वत: आजारी नाहीत, सर्व सुरक्षित आहेत; परंतु आपण कल्पना करत आहात, व्हिज्युअलाइज करत आहात. जेव्हा आपण कल्पना करत असताे आणि व्हिज्युअलाइज करत असताे तेव्हा मनावर तितकाच परिणाम हाेताे. परंतु जेव्हा अंत:करणापासून सकारात्मक विचार करू लागताे आणि सकारात्मक व्हिज्युअलाइज करत असताे तेव्हा आपले मन आणि शरीरावर जादुई परिणाम हाेत असताे. या वेळी आपणास ‘अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन’च्या शक्तीचा वापर केला पाहिजे. 

वस्तुत: हे मेडिटेशन आहे. मेडिटेशनमध्ये आपण काय करताे- एक विचार निर्माण करताे, त्यास व्हिज्युअलाइज करताे. जर सकारात्मक विचार बाळगला तर चांगले निष्कर्ष हाती येतात. जर याचसाेबत व्हिज्युअलाइज करू लागलाे तर त्याचा फायदा आणखी वाढताे. कारण तुम्ही अंत:करणापासून विचार करत असता. काही वेळा काही विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, तेव्हा ते बाेलताे. प्रार्थना आपण माेठ्याने म्हणताे. मंत्रपठण माेठ्याने करताे. ज्यांनी पूर्वी कधी ध्यानाभ्यास केला नाही, जर त्यांना घबराट जाणवत असेल तर त्यांनी केवळ मनाेमन विचार करावा. कदाचित पहिल्याच दिवशी ध्यानाभ्यास जमणार नाही. तत्काळ परिणामांविषयी अंत:करणापासून बाेला, तुम्ही अफर्मेशनचा केवळ विचार करू नका, ते बाेला. बाेलता बाेलता हळूहळू मन:स्थिती खंबीर हाेईल तेव्हा बाेलण्याची गरज भासणार नाही. हीच बाब तुमच्या विचारात परिवर्तित हाेईल. सरावाने विचार करण्याची प्रवृत्ती मग नैसर्गिक हाेईल. आठवडाभरात तुम्हाला परिणाम जाणवतील. एखादे कार्य जर निसर्ग नियमानुसार केले तर ते सिद्धीस जाणारच. प्रत्येकाने आपली स्थिती, कुटुंब, कामाचे गणित यानुसार संकल्प निश्चित करावेत. सध्याच्या घडीला आपण इतकाच विचार केला पाहिजे, की आपण स्वस्थ आहाेत, स्वस्थ राहू इच्छिताे. या अफर्मेशनमध्ये व्हायरस या शब्दाचा वापर करू नका. नकारात्मक शब्द चुकूनही यायला नको.

बी. के. शिवानी, ब्रह्माकुमारी

awakeningwithbks@gmail.com

बातम्या आणखी आहेत...