आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविड-19 मध्ये सकारात्मक जीवन:सहनशक्ती आणि स्वत:कडे लक्ष देणे हीसुद्धा एक प्रकारची सेवाच

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीके शिवानी, ब्रह्मकुमारी

या संसर्गापासून आपल्याला वाचायचे आहे आणि मनालाही जपायचे आहे. आपण पूर्वी फक्त शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिले. यामुळे लोकांच्या वागण्यात फरक पडेल, याकडे आपण लक्ष दिले नाही. त्यावेळी लोकांच्या मनात भीती होती, आपल्याला किंवा कुटुंबाला काही होऊ नये, याचाच लोक विचार करत होते. लाॅकडाऊन लागल्यानंतर काही दिवसांतच लोकांच्या मनावर याचा वाईट परिणाम होऊ लागला. कुणाला राग येऊ लागला, कुणी चिडचिड करू लागले, ज्याच्या डोक्यात आधीच राग होता तो आणखी रागीट झाला, एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी कौटुंबिक हिंसा वाढली. सध्या नैराश्य वाढल्याचे डाॅक्टर म्हणतात. त्यामुळे स्वत:कडे लक्ष देणेही खूप मोठी सेवा असल्याचा विचार समोर आला. व्यक्तीने जर स्वत:ची काळजी घेतली, व्यवस्थित हात धुतले, मास्क लावला, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले तर त्याचाही बचाव होईल आणि त्याच्यामुळे बरेच लोक संसर्गापासून वाचतील. अशाच प्रकारे व्यक्तीने भावनात्मक, आध्यात्मिक आणि मानसिक रूपाने आपली काळजी घेतली तर अनेक लोक वाचू शकतात. व्यक्तीने त्याच्या मनाची काळजी घेतली, नातेवाईक, कुटुंब आणि टीमसोबत चांगला वागला तर त्यांचीदेखील काळजी घेतल्यासारखीच आहे. 

भगवंत म्हणतात, व्यक्ती स्वत:मध्ये जितका बदल करू शकते, ती तितकीच इतरांमध्येही बदल घडवू शकते. मात्र आपण इतरांमध्येच बदल आणू इच्छित असतो. भगवंत म्हणतात, सेवाभाव म्हणजेच, दुसऱ्यांच्या उणिवा सामावून घेणे यालाही ईश्वरी सेवा भाव म्हणतात. सामावून घेणे म्हणजे त्याचा स्वीकार करणे म्हणजेच त्याच्याविषयी तुमच्या मनात काही चुकीचा विचार येऊ न देणे. हीदेखील एक प्रकारे सेवाच आहे. ज्याप्रकारे डाॅक्टर रुग्णाला बरं करतो, त्याच प्रकारे आपणही इतरांच्या मनाला बरं करू शकतो. त्यांचे संस्कार स्वीकार करून. त्यामुळे सहन करण्याला शक्ती म्हटले जाते. बरेच लोक म्हणतात, किती सहन करावे लागते, आम्ही तर सहन करून-करून मरून जाऊ. भगवंत म्हणतात, मरायचे नाही तर सर्वांच्या मनात प्रेमाने जगाायचे. कितीही कट्टर विरोधक असला तरी, दहा वेळेस सहन करावे लागले तरी... सहनशक्तीचे फळ अविनाशी आणि गोड असते. म्हणजेच समोरचा कितीही चूक करो, आपल्याला जे म्हणायचे आहे, ते आपण म्हणू शकतो, मात्र आपण चांगला विचार ठेवला तर, त्यामुळे त्याच्या नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होणार नाही. समजा, माझ्याशी कुणी चुकीचे वागले आणि मी गप्प राहिले, बोलायचे झाले तर तेही आदरपूर्वक बोलले, मात्र मी त्याच्याविषयी काही वाईट बोलले नाही., असे केले तर आपली शक्ती वाढते. मात्र कुणी काही बोलून गेले आणि त्यानंतर मी दु:खी झाले, उदास झाले, तर यामुळे माझी शक्ती नाहीशी होईल. मी इतके सहन केले, आता त्यालाही करावे लागेल, ही भावनाच मनात येऊ देऊ नये. दीर्घकाळाच्या फळाची इच्छा ठेवायला हवी. यालाच सेवाभाव म्हणतात. नात्यातही सेवा असते, वागणुकीतही सेवा असते. 

दुसऱ्याचे संस्कार स्वीकारणे, सहन करणे, त्यांच्यासाठी चांगला विचार करणे, मग तो कसाही वागो, मन शांत ठेवल्यानेच आपली सहनशक्ती वाढते. भगवंं सांगतात.., तेदेखील बदलतील. मात्र, तुम्ही त्यांची वाट पाहू नका. आपले डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पोलिस, सफाई कर्मचारी स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आपली सेवा करू शकतात तर आपण इतरांची सेवा करण्यासाठी आपला अहंकार बाजूला ठेवून सहन करू शकत नाही का? व्हायरसपासून वाचण्यासाठी आपण फिजिकल डिस्टसिंगचे चांगल्या प्रकारे पालन करू शकतो, तर दुसऱ्याच्या नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी आपण इमोशनल डिस्टन्सिंग करू शकत नाही का ? आपण एकाच घरात असू, सोबत असू, मात्र भावनिकरीत्या आपल्याला थोडा वरचा विचार करावा लागेल. जेणेकरून त्यांच्या नकारात्मक शक्तीचा आपल्यावर परिणाम होणार नाही. अशा प्रकारही हीदेखील एक सेवाच आहे. सहनशक्तीदेखील एक सेवाच आहे, हे आपण सर्वांनीच नेहमी लक्षात ठेवण्याची अत्यंत गरज आहे, हे निश्चित.

बातम्या आणखी आहेत...