आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अध्यात्मिक:ईशस्मरण करताना केवळ कर्म करण्याची शक्ती मागा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जे काही होते ते ईश्वराच्या मर्जीने होते, असा आपण विचार करतो. ते ठीकही आहे. कोण करील? तर तोच करील. म्हणून आपण रोज त्याला म्हणतो की, ईश्वरा, माझी समस्या सोडव. ईश्वर आपली समस्या सोडवू शकतो का? समजा मला एक टेबल उचलायचा आहे, तर मी ईश्वराला टेबल उचलण्यास सांगावे का? टेबल उचलला जाईल? नाही. आपण रोज त्याला हेच सांगतो, आजार बरा कर, मुलाला पास कर, मुलीला चांगले स्थळ मिळवून दे, माझी बदली रद्द कर इ. ईश्वराकडून काय मिळू शकते आणि काय मिळू शकत नाही, हे आपल्याला माहिती असते.

ईश्वर आपले कर्म करणार नाही. तो आपल्याला चांगले कर्म करण्याची शक्ती आणि ज्ञान देईल. उदा. एखाद्या विद्यार्थ्याला गृहपाठ करायचा असेल तर त्याचे आई-वडील तो करू शकत नाहीत, परंतु तो कसा करावा, हे शिकवू शकतात. म्हणून आपण ईशस्मरण करताना माझे हे काम कर, असे न म्हणता मला हे काम करण्याची शक्ती दे, असे म्हणावे. सध्या आपण रोज त्याला म्हणतो की, माझे हे काम कर. पंधरा-वीस दिवस झाले, टेबल उचलले गेले नाही. मग कुणी तरी मला सांगते की, याच्याकडे नव्हे, यांच्याकडे मागा. मग आपण त्याचे स्मरण बंद करून दुसऱ्याची पूजा सुरू करतो.

ईश्वरावर आणि आपल्या आई-वडिलांवर आपला विश्वास असेल तर आपण त्रस्त होणार नाही. जसे कर्म असेल तसेच फळ मिळते. हे स्पष्ट झाले तर कधीही आपले बोट वरही जाणार नाही आणि इतरांकडेही वळणार नाही. मी चांगले वर्तन करत असेन तरीही कणी माझ्याशी वाईट वागत असेल तर त्याचे कारण कोण असेल? कुणी मला धोका देत असेल तर त्याचे कारण कोण असेल? माझी तब्येत नरम-गरम राहत असेल तर त्याचे कारण कोण असेल? माझे मन आनंदी नसेल तर याचे कारण कोण असेल? त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे याचे निवारण कोण करील? जसे कर्म तसे फळ, या वचनावर आपण जीवनात लक्ष केंद्रित केले पाहिजे.

आपण जो विचार करतो, बोलतो, वागतो ते आपले कर्म आहे. जे आपल्याबाबत होते, जीवनात जी परिस्थिती येते, लोक आपल्याशी ज्या प्रकारे वागतात ते असते आपले भाग्य. मी यांच्याशी कसे बोलू, हे आपले कर्म. ते आपल्याशी कसे बोलतील, हे आपले भाग्य. या दोघांमध्ये काय संबंध आहे? जसे कर्म असते तसेच भाग्य बनते. आपण जे कर्म करतो ते आपल्याला दिसत नाही, परंतु भाग्य दिसते. जे आपल्याबाबत होत असते ते दिसत असते.

उदा. माझ्यासमोर एक घड्याळ आहे. मी ते उचलून तुमच्याकडे फेकले. हे आहे माझे कर्म. मी जे दिले तेच परतही येणार आहे. अशाच प्रकारे कुणी मला सर्वांसमोर खूप वाईटसाईट बोलले तर मी म्हणेन की, यांनी माझा अपमान केला. त्यांची बाजू समजून न घेता मी नाराज होईन. तो काळा चेंडू, ते घड्याळ, तो अपमान, तो धोका समोरून येत आहे तर त्याला आपण काय करू शकतो? आपण त्यांना सांगू शकतो की, कृपया असे करू नका. आपल्या सांगण्यामुळे ते थांबू शकतात. परंतु, आपण नाराज होऊ, उदास-त्रस्त होऊ, रडायला सुरुवात करू. समोरून काळा चेंडू येत होता, आपणही काळा चेंडू परत फेकला. अशा प्रकारे हे युग कलियुग झाले.

आता आपल्याला हे सत्ययुग करायचे आहे. समोरून काळा चेंडू येत होता, आपणही काळा चेंडू फेकला, कलियुग झाले. या क्षणी माझ्याकडे पर्याय आहे की, मी त्यांना समजून घेऊन ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारावे. यामुळे माझे मन शांत होईल. माझ्याबाबतीतच वारंवार असे का होते, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होणार नाही. ते असे वागल्यावर आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलू शकतो का? आपण प्रेमाने बोललो तर फायदा कोणाकोणाचा होईल? पहिले म्हणजे माझे मन शांत राहील. दुसरे म्हणजे माझे आरोग्य चांगले राहील. तिसरे म्हणजे त्या ऊर्जेचा आपल्या मनावर परिणाम होणार नाही. चौथे म्हणजे त्यांचेही आरोग्य चांगले राहील. सर्वांचाच फायदा होईल. यातूनच तर सत्ययुग येईल.

बी. के. शिवानी, ब्रह्मकुमारी
awakeningwithbks@gmail.com

बातम्या आणखी आहेत...