आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक:जीवनाच्या गुणवत्तेतच दडलाय खरा आनंद

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजही जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची आपल्याला कल्पना नाही. तसे पाहता ईश्वराचीही अनेक रहस्ये आहेत. त्याविषयी आपण जागरूक नाही आणि तेही ईश्वराच्या नावातच सारे स्पष्ट असताना. ईश्वराला जाणणे ही एक गोष्ट आहे आणि त्याने जे काही सांगितले ते जाणून घेणे, ही दुसरी गोष्ट. आता दोन्ही गोष्टी आपल्यासमोर यायला पाहिजेत. ही काळाची गरज आहे.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, हे आपण जाणतो. एखादी गोष्ट वेळेवर मिळाली की जीवनात बदल घडून येतो. आज प्रत्येक जण शोधात आहे. कधी तरी आपल्या सांगितले गेले की ईश्वर आहे. आता ईश्वराचा वेधच जीवनाचे लक्ष्य झाले आहे. शांती, प्रेम, खरी माया, सुख हे सगळं आम्ही शोधत होतो. यातील सर्वांत मोठा शोध म्हणजे ‘मी कोण?’ खरं तर याविषयी इतके लिहून झाले आहे, तरीही आपला शोध सुरूच आहे. सर्वांना वाटते, शोधत राहणे हेच जीवनाचे लक्ष्य आहे. आपण हा शोध घेतच राहणार आहोत का, हे स्वत:ला विचारा. किती जन्मांपासून त्याला शोधत आहोत? आयुष्य केवळ शोध घेण्यासाठीच मिळते का? आणि शोध घेत घेतच या जगाचा निरोप घेणार.

स्वत:ला, ईश्वराला आणि जीवनाच्या इतर अनंत प्रश्नांचा शोध घेण्याची आपली यात्रा आता संपली आहे. कारण ज्याला कित्येक जन्मांपासून शोधत होतो, तो या पृथ्वीवर आला आहे. आता तो स्वत:च आला आहे, तर त्याला शोधण्याची गरज नाही. आता तर ही एक सुरूवात आहे. आतापर्यंत आम्ही ईश्वराला शोधत होतो. एक बाळ त्याच्या वडिलांना शोधते तसे. मग ते किती काळ शोधत राहील? स्वत:ला पाहा, जणू एक बाळ स्वत:लाच विसरले आहे. पहिली गोष्ट ही की आम्ही स्वत:ला विसरलो आहोत; आपली माता-पित्यांपासून ताटातूट झाली आहे. आपण घरापासून दूर गेलो आहोत. आम्ही कोण? कुणाची संतती? आणि आम्ही रहिवासी कुठले? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत नाहीत. विचार करा, जत्रेत हरवलेल्या मुलाला कुणी प्रश्न विचारले, की तू कोण आहेस? कुठे राहतो? कुणाचा मुलगा आहेस? त्याला हे माहिती नाही. लोकांना त्याला घरी पोहोचवायचे असले, तरी ते पोचवू शकणार नाहीत. महत्त्वाचं हेच आहे, की आपण सगळे भटकत होतो. आता विचार करा, या तिन्ही प्रश्नांची उत्तरे त्या मुलाला सापडली तर स्थिती काय असेल?

शोधातील जीवन ही एक गोष्ट आणि ते गवसल्यानंतरचे जीवन ही दुसरी गोष्ट. ती वेळ आली आहे. शोधण्याचे काम संपले आहे. आता आपण त्याला भेटूयात. भेटल्यानंतर त्याच्याशी एक सुंदर आणि छानसे नाते निर्माण करा. मग ते जीवन कसे असेल? आताच्या जीवनात आपल्याला तेवढ्या आनंद, सुख व समाधानाचा अनुभव मिळत नाही; तर मग आपले जीवन संघर्षातच व्यतीत होईल. आनंद मिळणार नाही. चेहऱ्यांवर मेहनत दिसते, म्हणून आनंदी राहण्यासाठी खूप काही करावे लागते. या आनंदात सातत्य नाही.

आपल्या जीवनाकडे पाहिले तर, त्याचा दर्जा काय दिसतो? स्वत:चा, व्यावसायिक जीवनाचा, कौटुंबिक जीवनाचा दर्जा काय? नात्यातील गोडवा कुठे आहे? जीवनात काही बदल घडवून आणायचा असेल, तर आपल्याला काही क्षण थांबून विचार करावा लागेल, की आपण काय बदल करू शकतो? मग खूप काही दिसेल बदलण्यासारखे. नात्यांमध्ये दुरावा आलाय, मला ते सुरळीत करायचे आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतून गैरसमज आणि त्यातून दुरावा येतो आहे. व्यावसायिक जीवनाचा आनंद घ्यायचाय, पण त्यात ताण-तणाव, निराशा असे शब्द सामान्य झाले आहेत. त्यांचा आम्ही स्वीकार केला आहे. आम्ही सर्व काही करत आहोत. पण ज्या पद्धतीचे, ज्या दर्जाचे जीवन हवे ते तसे नाही. त्यात उणीव आहे. जे करत आहोत, त्यात जो आनंद, गोडवा, जी सहजता हवी ती नाही.

शिवानी दीदी
ब्रह्मकुमारी
awakeningwithbks@gmail.com

बातम्या आणखी आहेत...