आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्मिक:भय व चिंतेच्या वातावरणात सेवा देईल समाधानाची ऊर्जा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवा करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे देणे. त्यामुळे बालपणापासूनच एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, असे शिकवले जाते. याचा अर्थ लोकांसमोर आपले दातृत्व दाखवण्यासाठी अथवा स्वार्थी हेतू मनात ठेवून आपण सेवा करत नाही. तेव्हाच आपल्याला सेवेची ऊर्जा मिळते. गुप्त सेवा म्हणजे नि:स्वार्थ सेवा. आपण दातृत्व भाव, निर्माण भाव आणि निर्मळ वाणीने सेवा केली तर यामुळे आपले आत्मबल वाढेल आणि ज्यांची सेवा करत आहोत, त्यांचीही ऊर्जा वाढेल. केवळ जेवू घालणे, घरातील कामे करणे वा घराबाहेर पडून इतरांना भोजन देण्याने सेवा होत नसते, तर जेवू घालतानाही समाधान आणि ऊर्जा देण्याने सेवा घडते. तुम्ही नि:स्वार्थ भावनेने दिले तर तुमची मनोइच्छा तुमच्या भोजनासोबत समोरच्याला मिळते. तुम्ही दिलेल्या धनातून काही साहित्य जरूर येते. परंतु तुमचा निर्मळ भाव आत्मबल वाढवतो. म्हणजे यामुळे दोन गोष्टी साेबत चालत आहेत. पहिली म्हणजे आपण बाह्य स्वरूपात करतो ती आणि दुसरी म्हणजे ज्या भावनेने करतो ती. आज आपण चिंता आणि भयाच्या वातावरणात जगतो आहोत. तेव्हा आपणास भोजनासोबत त्यांना समाधानाची ऊर्जासुद्धा द्यायची आहे. तुम्ही लोकांना भोजन वाढत असाल तर जणू परमेश्वराचा प्रसाद वाढतो आहोत, अशा भावनेने वाढा.

चिंताक्रांत राहू नका, कारण यामुळे सेवेची िवरुद्ध ऊर्जा निघून जाते. आपल्याला समाजाची भीती व चिंता नाहीशी करायची आहे. उद्या पीठ कसे मिळेल, पैसा कोठून येईल, याची काळजी दात्याच्या मनात कधीच नसते. तुम्ही फक्त एवढेच म्हणा, मी परमेश्वराचा निमित्तमात्र सेवेकरी आहे. तो कोणाला ना कोणाला पाठवून देईलच आणि सेवाही घडेल. जेव्हा आपली मनोइच्छा चांगली असते, तेव्हा कोठून-कोठून लोक येतात आणि सेवा कशी घडते, कळतही नाही.

आजकाल छोटी-छोटी मुलेसुद्धा स्वयंपाक आणि सेवा करत आहेत. याच लहान-लहान मुलांना त्यांचे पालक हे तर काहीच काम करत नाहीत, असे म्हणत होते. तीच मुले आज कणीक मळतात, पोळ्या करतात. केक तयार करतात. घरात झाडणे-पुसणे अशी कामे करत आहेत. बागकाम करत आहेत. वेळ येते तेव्हा आपल्यात सर्व सहनशक्ती, स्वत:मध्ये बदल करवून घेण्याची शक्ती येते. या सर्व शक्ती आपल्यात असतात, याचाच हा पुरावा आहे. केवळ आपण त्यांचा वापर करत नव्हतो. आज ही मुले इतकी सेवा करताहेत, कारण आजच्या हवेत सेवेच्या लहरी आहेत.

मुले सर्व प्रकारच्या सेवा केवळ खेळण्याचा आनंद मिळतो म्हणून करत आहेत. त्यात अहंभाव नाही. त्या मुलांनी आपल्या आयुष्यात अजून काही मिळवलेले नसते. ते पावित्र्य आणि विनम्रता त्यांना अहंहीन करते. ही मुले या वयात पालकांची जी सेवा करताहेत, त्याचा हा पुरावाच आहे, म्हणून आपणास मुलांना जे काही शिकवायचे आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे आहेत, ते सर्व मुलांना सर्वकाही आतापासून शिकवण्यास सुरुवात केली पाहिजे, हेच खूप सोपे आहे.

अनेकदा पालक सांगतात, मुले ध्यान करत नाहीत, योग करत नाहीत. त्यांना शिकवण्याची खूप सोपी पद्धत म्हणजे तुम्ही आजुबाजूच्या लोकांनी त्याची सुरुवात केली तर मुले तुमचे पाहून आपोआप त्याची सुरुवात करतील. कारण त्यांचे हे संस्कारक्षम वय आहे. दुसरी गोष्ट, मुलांमध्ये मोठ्यांच्या तुलनेत सर्वकाही जुळवून घेण्याची तयारी अधिक असते. कारण त्यांच्यावर होणारे संस्कार खूप लवचिक असतात. त्यात कसेही त्यांना बसवू शकता. मुलांमध्ये कोणतेही बदल घडवणे खूप सहज आणि सोपे असते. घरकामात मदत करणे हीसुद्धा एक सेवाच आहे.

आईच्या गर्भात मूल अथवा असते, त्यावर पालकांच्या संवेदनेचा सर्वाधिक प्रभाव पडतो. मुले मोठ्यांच्या संवेदना खूप लवकर आत्मसात करतात. त्यामुळे पालकांनी या काळात मुलांवर प्रभाव पडतील अशी भीती, चिंता आदी कोणतेही विचार मनात आणू नयेत. तुम्ही खूप सुंदर जगात येणार आहात, याच संवेदना त्यांच्याकडे पाठवा. सगळे एकमेकांसाठी आहोत, आपल्यामध्ये सेवाभाव ठासून भरलेला आहे, प्रत्येक जण परमेश्वराचा दूत आहे. तुम्हीसुद्धा परमेश्वराचे दूतच आहात. असाच विचार करा. मग जगात येणारे अपत्य या सृष्टीसाठी एक दूत म्हणूनच येईल.

बी. के. शिवानी
ब्रह्मकुमारी

बातम्या आणखी आहेत...